scorecardresearch

Premium

हे फक्त कोकणातच पाहायला मिळेल! वयाचे भान विसरून आजीने लुटला फुगड्या खेळण्याचा आनंद; पाहा Video

Ganpati Special fugadi Video : कोकणातील अनेक गावांमध्ये तुम्हाला गौराईच्या आगमनादिवशी स्त्रिया रात्र जागवत अशाप्रकारे फुगड्या घालताना दिसतात. यावेळी अनेक महिला एकत्र येत हसत खेळत पारंपारिक नृत्ये करतात.

ganesh chaturthi 2023 konkani traditional fugdi grandmother enjoy konkani folk dance fugadi Ganpati Special fugadi Vide
हे फक्त कोकणातच पाहायला मिळेल! वयाचे भान विसरुन आजीने लुटला फुगड्या खेळण्याचा आनंद; पाहा Video (Loveankush_gawade instagram)

कोकणात सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. गावा-गावात नमन, भजन, फुगडी, शक्ती-तुरा, पारंपरिक नृत्य अशा कला सादर करून बाप्पाचा गजर केला जात आहे. गणेशोत्सवात कोकणातील अनेक गावागावांत महिला गौरी आगमनाच्या रात्री फुगड्या खेळण्याचा आनंद घेतात. अनेक महिला, तरुण मुली गौराईसमोर एकत्र येत पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतात. कोकणात फुगड्या खेळण्यात वृद्ध महिलांचा हात कोणी धरू शकत नाही. अशाच प्रकारे एक वृद्ध आजी वयाचे भान विसरून फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहे,; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौराईच्या आगमनानिमित्ताने काही महिला पारंपरिक गाणी म्हणत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटत आहेत. त्यात एक आजी अगदी जोशात फुगडी घालताना दिसत आहे. या आजींचे वय साधारण ७० च्या वर असेल; पण याही वयात त्यांच्या उत्साहाला तोड नाहीए. नऊवारीत आजीबाई मस्त फुगड्या एन्जॉय करीत आहेत.

Konkan Traditional fugadi video viral
‘तुझा फु, माझा फु…’ कोकणामध्ये गणेशोत्सवात रंगली महिलांच्या फुगडीची जुगलबंदी; पाहा मजेशीर Video
sacrificing animals in public Video Viral
माणुसकीला काळीमा! सर्वांसमोर देत होता मुक्या प्राण्याचा बळी, महिलेने अडवताच दिली धमकी, धक्कादायक VIDEO व्हायरल
Nagpur marbat
नागपूरची प्रसिद्ध काळी, पिवळी मारबत कशी तयार होते? ३० फूट उंच, बांबू, खरडे आणि बरेच काही..
ukadiche modak recipe in marathi
Modak Recipe Tips: उकडीचे मोदक बनवताना कळ्या तुटतायत? मग चमचाची ‘ही’ सोप्पी ट्रिक एकदा करुन पाहाच

हे फक्त कोकणातच होऊ शकते

कोकणातील आजीचा फुगड्या खेळतानाचा हा व्हिडीओ Loveankush_gawade नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘हे फक्त कोकणातच होऊ शकते’ असे लिहिले आहे. आजींनी घातलेल्या या फुगड्या सोशल मीडिया युजर्सनाही फार आवडल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, अप्रतिम आजी… कोकण जबरदस्त! तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय की, खूप अप्रतिम! असे नृत्य बघायला मिळत नाही, जुनं ते सोनं. तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, आजी १ नंबर वाह वाह…!

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ganesh chaturthi 2023 konkani traditional fugdi grandmother enjoy konkani folk dance fugadi sjr

First published on: 22-09-2023 at 13:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×