Ganesh Chaturthi Stunning Outfit Ideas: आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आता काहीच दिवसांत होणार आहे. देशभरात बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे, परंतु या स्त्रियांचं अजूनही काही ठरतंच नाही. या गणेशोत्सवात नेमकं काय घालायचं याचं गोंधळात आपल्या काही बहिणी आणि मैत्रिणी आहेत. काहीतरी हटके, पण पारंपरिक असा लूक जर तुम्हाला या गणेशोत्सवात करायचा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. तर लाडक्या बहिणींनो यावर्षी गणरायाच्या उत्सवात मॉडर्न टच देऊन तुम्ही हे खालील आउटफिट्स नक्कीच ट्राय करू शकता. १. साडी (Saree) साडी हा भारतीय महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. कोणताही सणवार असो, साडीची फॅशन कधीच जुनी होऊ शकत नाही. गणेशोत्सवाच्या या भक्तीमय वातावरणात तुम्ही नक्कीच साडीची निवड करू शकता. सिल्क साडी किंवा रेशमी साडी सिल्क साडी किंवा रेशमी साडीचा ट्रेंड कधीही जुना होत नाही. गुलाबी, लाल, निळ्या रंगाचे ब्राईट कलर्स, त्यात बुट्टीची डिझाईन आणि भरलेला काठ अशी सुंदर काठापदराची साडी या उत्सवात अगदी शोभून दिसेल. हा लूक पूर्ण करण्यासाठी स्टेटमेंट ज्वेलरीची निवड करा. २. अनारकली ड्रेस (Anarkali Dress) अनारकली हा एक टाइमलेस ड्रेस आहे, जो कित्येक वर्षे ट्रेंडमध्ये असूनही तितकाच शोभून दिसतो. जर तुम्ही अजूनही गोंधळात असाल तर हा पर्याय तुमच्यासाठीच आहे. सध्या पेस्टल रंगाचा ट्रेंड असल्याने तुम्ही तसे अनारकली सूट निवडू शकता. मिनिमल वर्क असलेल्या अनारकलीवर नेकलेस परिधान न करता हेवी इयरिंग्सची निवड केली तर लूक परिपूर्ण दिसण्यास मदत होईल. हेही वाचा. तरुणाच्या कलाकारीला तोड नाही! अवघ्या सेकंदांत १६ ठिपक्यांपासून साकारले गणपती बाप्पाचे सुरेख चित्र ३. लेहेंगा चोळी (Lehenga Choli) अगदी जुना असलेला लेहेंगा-चोळीचा ट्रेंड सध्या भारतात परत आला असून गेल्या काही दिवसांपासून तो वाढत चालला आहे. कोणताही सणवार असो, कोणाचं लग्न असो किंवा कोणतंही फंक्शन असो, हल्ली मुली लेहेंगा चोळीची निवड आवर्जून करतात. यामध्ये तुम्ही कलरफूल असा लेहेंगा परिधान करू शकता. मिरर वर्क किंवा सिक्वेन्स वर्क असलेला लेहेंगा तुम्ही निवडू शकता. ज्वेलरीमध्ये मांग टिक्का, नेकलेस किंवा चोकर तुमचा लूक पूर्ण करण्यास मदत करेल. ४. कुर्ता प्लाझो सेट (Kurta Palazzo Set) कुर्ता प्लाझो म्हणजे अनेकींसाठी कंफर्ट आउटफिट. प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडरी कुर्ता विथ कॉन्ट्रास्ट प्लाझो हा पर्याय गणेशोत्सवासाठी सर्वोत्तम ठरेल. स्टाईलिश प्लस कंफर्ट हवा असणाऱ्या महिलांसाठी हा उत्तम पर्याय आहे. यावर मिनिमल मेकअप, झुमके आणि बॅंगल्स घालून लूक पूर्ण करू शकता. हेही वाचा. दिव्यांग भक्ताने पायाने रेखाटलं ‘लालबागच्या राजा’चं चित्र, VIDEO पाहून कराल कौतुक ५. इंडो-वेस्टर्न, फ्यूजन (Indo-Western, Fusion) आजकाल पारंपरिक पोशाखासह त्याला मॉडर्न टच देऊन स्त्रिया आधुनिक लूकला प्राधान्य देतात. सध्या फ्यूजन ट्रेंडिंग आहे, त्यामुळे अनेक सेलिब्रिटीज सणासुदीत अशा मॉडर्न येट ट्रेडिशनल पोशाखात दिसतात. यात क्रॉप टॉप आणि त्याखाली प्लाझो किंवा धोती स्कर्ट परिधान करून हा लूक क्रिएट करू शकता. यात वन शोल्डर ड्रेस, मॅक्सी ड्रेस, ब्लेझर विथ प्लाझो, तसेच ट्रेडिशनल प्रिंटेड को-ऑर्ड सेट्स अशा प्रकारच्या आउटफिट्सची तुम्ही निवड करू शकता.