गणेशोत्सवात महत्त्वाच्या रस्त्यांवर एकेरी वाहतूक

वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी २ ते ७ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी पाच वाजल्यापासून टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि गणेश रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी शहर आणि बाहेरून मोठय़ाप्रमणात नागरिक येत असतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी २ ते ७ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी पाच वाजल्यापासून टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि गणेश रस्त्यावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे.
या कालावधीत रस्त्यावर नागरिकांची गर्दी होणार असल्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक दरम्यानची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील  पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावर मराठा चेंबर ते हिराबाग चौक, घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज ते राष्ट्रभूषण, हिराबाग चौक, सणस रस्त्यावरील गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, कोहिनूर चौक ते बाबाजान चौक या ठिकाणचे रस्ते सायंकाळी पाचनंतर बंद केले जाणार आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
शहरात जुलै महिन्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून डेक्कन परिसरातील खालील रस्त्यावर २ ते ७ सप्टेंबर दरम्यान वाहने लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.  त्यामध्ये नटराज चौक, मॅकडोनॉल्ड पासून खंडोजीबाबा चौक, खंडोजीबाबा चौक ते गुडलक चौक, खंडोजीबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण पूल आणि शेलारमामा चौक ते सह्य़ाद्री हॉस्पिटल चौक या ठिकाणी वाहने लावण्यास दोन्ही बाजूने बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ganesh utsav parking traffic police

ताज्या बातम्या