Bundi Modak Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविले जातात. त्यात तांदळाच्या उकडीचे मोदक घरोघरी आवर्जून बनवले जातात. पण, आज आम्ही तुम्हाला बुंदीचा मोदक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

बुंदीचा मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी बेसन पीठ
  • ३ वाटी साखर
  • १ वाटी ड्राय फ्रुट्स
  • तेल आवश्यतकतेनुसार
  • मोदकाचा साचा

बुंदीचा मोदक बनवण्याची कृती:

हेही वाचा: Modak Recipe: एक वाटी गव्हाच्या पीठात झटपट बनवा उकडीचे मोदक; तांदळाच्या मोदकांपेक्षा लागतील भारी

  • सर्वप्रथम बेसन पीठात पाणी ओतून या मिश्रणाची बारीक बुंदी गरम तेलात पाडून घ्या.
  • तळलेली बुंदी आता एका ताटात काढून घ्या.
  • आता दुसरीकडे एका पातेल्यात पाणी आणि साखर घालून त्याचा पाक तयार करुन घ्या.
  • या पाकामध्ये तयार केलेली बुंदी घाला आणि हे मिश्रण एकजीव करा.
  • आता या मिश्रणामध्ये ड्रायफ्रुट्स घालून त्याचे मोदक साचाच्या सहाय्याने मोदक बनवून घ्या.