Lalbaugcha Raja Ganeshotsav Mandal : नवसाला पावणारा गणपती बाप्पा अशी 'लालबागचा राजा'ची ( Lalbaugcha Raja ) ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. तसंच अनेक सेलिब्रिटी, राजकारणी बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात. देश-विदेशातले व्ही-व्हीआयपीही उपस्थित राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेतात. 'लालबागचा राजा' गणेश उत्सव मंडळाच्या एका मानाच्या पदी अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनंत अंबानी यांची कुठल्या पदी निवड? लालबागचा राजा ( Lalbaugcha Raja ) हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकारिणी मंडळात अनंत अंबानी यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला अशी माहिती मिळते आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली योगदानाची दखल घेऊन लालबाग राजा ( Lalbaugcha Raja ) मंडळाने हा निर्णय घेतला ही माहितीही समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत लालबागच्या राजाच्या प्रसिद्धीत उल्लेखनिय भर पडली आहे. आणि परिणामी मंडळाची प्रतिष्ठा देखील वाढली आहे. अशा प्रतिष्ठित मंडळाच्या कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून निवड होणं, हे अत्यंत प्रतिष्ठेचं मानलं जातं. अनंत अंबानी यांच्या नियुक्तीमुळे मंडळाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा आणखी वाढण्यास मदत होईल, असं बोललं जात आहे. हे पण वाचा- Ganeshotsav 2024: ‘असे’ पार पडले लालबागच्या राजाचे ‘श्री गणेश मुहूर्त पूजन’; पाहा खास फोटो अनंत अंबानी यांचं रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी योगदान जगभरातील श्रीमंतांच्या यादीत समावेश होणारे मुकेश अंबानी यांच्या कुटुंबानं लालबागचा राजा गणेश मंडळाला रुग्ण सहाय्य निधी योजनेसाठी योगदान दिलं. त्याचप्रमाणे रिलायन्स फाउंडेशननं २४ डायलिसिस मशीन देखील 'लालबागचा राजा' ( Lalbaugcha Raja ) मंडळाला दिल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी मंडळाच्या कार्यात अंबानी कुटुंबीयांनी मोठा हातभार लावला आहे. अंबानी कुटुंबाच्या याच कामाची दखल म्हणून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं अनंत अंबानी यांची प्रमुख मानद सदस्य म्हणून कार्यकारी समितीत नेमणूक केली आहे. मुंबईतील 'लालबागचा राजा' म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनंत अंबानी यांची विश्वस्त पदावर नियुक्त लालबाग राजाच्या चरणी अंबानी कुटुंबीयांकडून कोट्यवधींचं दान दिलं जातं. अशातच गेल्यावर्षी स्वतः अनंत अंबानी यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दान देखील केला होता. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानीचं लग्न झालं. हा विवाह सोहळा चर्चेत राहिला. अनंत अंबानीने राधिका मर्चंट यांचा विवाह शाही विवाह सोहळा पार पडला. आता लग्नानंतर अनंत अंबानी यांनी यावर्षीसुद्धा लालाबाग राजाला मोठी देणगी दिल्याची चर्चा आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सव काळात मिळालेल्या दानातून समाजकार्य केली जातात. आता या लालबाग गणेश उत्सव कार्यकारिणी समितीच्या विश्वस्तपदी अनंत अंबानींची निवड केली गेली आहे. मिड-डे ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.