Famous Ganpati in Mumbai : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. ढोल-ताशा वादकांपासून सजावट व रंगकाम करणाऱ्यांपर्यंत सर्व जण गणरायाचे स्वागत करण्याच्या तयारीत मग्न आहेत. प्रत्येकाच्या घरी गणपतीला दर दिवशी कोणत्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा, याचे बेत आखले जात आहेत. तर, काही लोक यंदा गणेशोत्सवात कुठे फिरायला जायचे, कोणत्या मंडळांच्या प्रसिद्ध गणेशमूर्ती बघायच्या, याची योजना तयार करीत आहेत. तुम्ही जर गणपती बघण्यासाठी मुंबईला जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण- आज आपण मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींविषयी जाणून घेणार आहोत.

मुंबईचा राजा

Ganesha Aarti Mistakes to Avoid| Mistakes to Avoid while saying Ganesha Aarti
भक्तांनो, लाडक्या बाप्पाची आरती म्हणताना तुम्ही ‘या’ चुका करू नका!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024 History : गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? काय आहे त्यामागील कथा, जाणून घ्या गणेश चतुर्थीचे महत्त्व
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
Shikhandi Transgender Dhol Tasha Pathak Pune marathi news
‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच
dagadushet ganpati agman sohla
Ganesh Utsav 2024 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे थाटात आगमन! सिंह रथातून निघाली मिरवणूक, ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचे स्वागत, पाहा Viral Video
Morya goasavi and ganesh
गणपती बाप्पा म्हटल्यानंतर ‘मोरया’ का म्हणतात? मोरया गोसावी यांच्याशी काय आहे संबंध? जाणून घ्या..

मुंबईतील गणेशमूर्ती बघताना सर्वांत आधी मुंबईचा राजा म्हणून ओळखली जाणारी लालबागमधील गणेश गल्लीतील गणेशमूर्ती व सजावट पाहायला जा आणि गजाननाचे दर्शन घ्या. १९२८ साली गणेश गल्लीत लालबाग-परळमधील गिरणी कामगारांनी गणपती बसवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९७७ साली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ व गणेश गल्ली मंडळाने येथे २२ फूट उंचीची गणेशमूर्ती बसवली. तेव्हापासून दरवर्षी येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.

लालबागचा राजा

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची गणेशमूर्ती सर्वत्र ओळखली जाते. तेथे दर्शनासाठी देशभरातून लाखो लोक येतात. या लालबागच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी ही मूर्ती विराजमान असते, त्याच ठिकाणी ती साकारली जाते. मूर्ती साकारण्यापूर्वी त्या ठिकाणी विधिवत पूजा केली जाते, असे म्हणतात. १९३१ रोजी पेरू चाळीतील बाजारपेठ बंद पडली होती,त्यावेळी तेथील स्थानिक मच्छीमार आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाली तर गणपती बसवू, असा नवस केला आणि त्याप्रमाणे १९३४ साली लालबाग बाजारपेठेत गणपती बसविण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा : ‘शिखंडी!’ पुण्यात उभारले पहिले तृतीयपंथी ढोल-ताशा पथक, तुम्ही ऐकले का त्यांचे वादन, Viral Video एकदा पाहाच

चिंचपोकळीचा चिंतामणी

चिंचपोकळीचा चिंतामणी ही गणेशमूर्ती ही मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तींपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाकडून १९२० मध्ये पहिल्यांदा चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे मंडळ मुंबईतील जुन्या गणेश मंडळांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी येतात.

परळचा राजा (नरे पार्क)

परळचा राजा हा मुंबईतील एक मानाचा गणपती मानला जातो. ज्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी म्हणजेच १९४७ साली या गणपती मंडळाची स्थापना झाली आणि येथे गणपती बसवण्यात आला. या गणेशमूर्तीला नरे पार्कचा राजा किंवा परळचा राजा म्हणूनसुद्धा ओळखले जाते.

जीएसबी गणपती, किंग्ज सर्कल

माटुंगा येथील जीएसबीच्या गणेशमूर्तीला सर्वांत धनाढ्य गणपती म्हणून ओळखले जाते. जीएसबी सेवा गणेश मंडळाचा हा गणपतीही मुंबईतील मानाचा गणपती आहे. १९५५ मध्ये कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. या गणेशमूर्तीला शुद्ध सोन्याची आभूषणे घातली जातात. गणपतीची ही मूर्ती साकारतानासुद्धा सोन्याचा वापर केला जातो. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी ही मूर्ती सजवली जाते.

केशवजी नाईक चाळ, गिरगाव

मुंबईतील सर्वांत जुन्या गणेश मंडळांपैकी एक म्हणजे केशवजी नाईक चाळीतील गणपती मंडळ. अत्यंत पारंपरिक आणि साधेपणाने या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीचे आगमन नेहमी पालखीतूनच होते आणि विसर्जनासाठीही पालखीच वापरली जाते. हे मंडळ पर्यावरणानुकूल उत्सव साजरा करतात. कित्येक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा जपून ठेवली आहे.

तेजुकाया मेन्शन गणपती

१९४७ साली तेजुकाया मेन्शन गणपती मंडळाची स्थापना झाली या मंडळाकडून दरवर्षी पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते. विशेष म्हणजे या गणेशमूर्तीवर कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे अनेक जण गणरायाची ही मूर्ती पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात.