scorecardresearch

‘फास्टॅग’ने कापलेला टोल गणेशभक्तांना पुन्हा मिळणार ;वाहनचालकांच्या तक्रारींनंतर परिवहन विभाग प्रयत्नशील

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

fastag , Passengers going to Konkan for Ganeshotsav will get the toll deducted by fastag again
‘फास्टॅग’ने कापलेला टोल गणेशभक्तांना पुन्हा मिळणार ;वाहनचालकांच्या तक्रारींनंतर परिवहन विभाग प्रयत्नशील( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. मात्र टोलनाक्यावर बसवलेल्या फास्टॅगमधून वाहनचालकांची टोलची रक्कम वजा होत आहे.

वाहनचालकांमध्ये याबाबत संताप आहे. त्यामुळे फास्टॅगमधून कापून घेतलेली रक्कम वाहनचालकांना परत मिळण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्न करत आहे. टोलनाक्यावर अनेक गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्टॅगमधून रक्कम कापली जात आहे. पास असूनही पैसे कापले जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. याबाबतच्या तक्रारी आल्या असून त्याबाबतची माहिती परिवहन विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार आहे.

amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
us intelligence agencies given evidence to canada of hardeep singh nijjar murder
निज्जरच्या हत्येचे पुरावे अमेरिकेकडूनच; अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वृत्त 

हेही वाचा >>>कोकणच्या एसटी फेऱ्यांवर शिंदे पितापुत्रांची छाप; ठाणे विभागातून एक हजार बसगाडय़ांची नोंदणी

प्राप्त झालेल्या तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहनचालकांना त्यांची रक्कम परत मिळेल, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-09-2023 at 06:17 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×