scorecardresearch

Premium

यंदा गणेशोत्सवात सहा दिवस ‘आव्वाज’; सातव्या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ अन्वये सण-उत्सव कालावधीसाठी १५ दिवसांसाठी ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.

Permission to use loudspeakers and amplifiers in Ganeshotsav 2023 pune
यंदा गणेशोत्सवात सहा दिवस ‘आव्वाज’; सातव्या दिवशीही रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदूषणासंबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवात ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रसृत केला.

केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ अन्वये सण-उत्सव कालावधीसाठी १५ दिवसांसाठी ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या आदेशानुसार सन २०२३ च्या सण उत्सवासाठी १३ दिवस निश्चित करुन दोन दिवस राखीव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये गणेशोत्सवाकरीता पाच दिवस निश्चित करण्यात आले होते. मात्र, विविध लोकप्रतीनिधी, गणेश मंडळांनी शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक गणपती उत्सवामधील सातव्या दिवशी गणपती विसर्जन केले जात असल्याने या दिवशीही विशेष बाब म्हणून ध्वनिक्षेपकाला परवानगी वाढवून मिळण्याबाबत विनंती केली होती. याबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षकांनीही परवानगी देण्यात हरकत नसल्याचे कळविले आहे. त्यानुसार राखीव दोन दिवसांपैकी एक दिवस गणेशोत्सवासाठी (गणेशोत्सवातील सातवा दिवस) सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रसृत केले आहेत.

Water supply to Pimpri-Chinchwad will be closed
पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
allotment JNPT developed plots, Project victims instructed CIDCO Bhawan documents
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रकिया ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार; सिडको भवनात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कागदपत्रे स्वीकारणार
Mhada Konkan Mandal Lottery
म्हाडा कोकण मंडळ सोडत नोव्हेंबर २०२३ : आतापर्यंत अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज
1 lakh 15 thousand applications for 377 different posts in panvel municipal corporation
पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक

हेही वाचा >>>चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची क्षमा मागितली, असं का केलं त्यांनी?

दरम्यान, गणेशोत्सवासाठी यापूर्वीच्या आदेशानुसार शनिवार २३ सप्टेंबर (पाचवा दिवस- गौरी विसर्जन), रविवार २४ सप्टेंबर (सहावा दिवस), मंगळवार २६ सप्टेंबर (आठवा दिवस), बुधवार २७ सप्टेंबर (नववा दिवस), गुरुवार २८ सप्टेंबर (दहावा दिवस- अनंत चतुर्दशी) असे पाच दिवस ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता नव्याने सोमवार २५ सप्टेंबर २०२३ (सातवा दिवस) सह एकूण सहा दिवस नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धकाचा रात्री बारा वाजेपर्यंत वापर करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Permission to use loudspeakers and amplifiers in ganeshotsav 2023 pune print news psg 17 amy

First published on: 21-09-2023 at 20:05 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×