scorecardresearch

Photos: गणपतीबाप्पाचं आधार कार्ड सापडलं! घरचा पत्ता कैलास पर्वत, जन्मतारीख …

Viral Photos: झारखंड मधील व्हायरल झालेल्या गणेश मंडळाने चक्क बाप्पाचे आधारकार्डच बनवले आहे.

Photos: गणपतीबाप्पाचं आधार कार्ड सापडलं! घरचा पत्ता कैलास पर्वत, जन्मतारीख …
गणपती बाप्पांचं आधार कार्ड सापडलं (फोटो: ट्विटर)

Ganesh Chaturthi 2022: जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे गणेशभक्त आहेत, तिथे सध्या जल्लोषाचे उत्साहाचे वातावरण दिसून येतेय. गणेश चतुर्थी पासून सोशल मीडिया तर बाप्पाच्या सुंदर मनमोहक फोटोंनी ओसंडून वाहत आहे. या व्हायरल फोटो व व्हिडीओजमधून ठिकठिकाणच्या मंडळाच्या राजांचे हटके देखावे पाहायला मिळत आहेत. बाप्पाच्या सजावटीसाठी सोन्या-चांदीचे दागदागिने, नानाविध कलाकुसरीच्या वस्तूंनी तर काही ठिकाणी केवळ फुलापानांनी साकारलेली आरास पाहून मन तृप्त होते. झारखंडमधील एका मंडळाने साकारलेला बाप्पांचा असाच एक देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पारंपरिक सजावटीपेक्षा अगदी भन्नाट अशी कल्पना या मंडळाने देखाव्यातून मांडली आहे.

झारखंड मधील व्हायरल झालेल्या गणेश मंडळाने चक्क बाप्पाचे आधारकार्डच बनवले आहे. सोशल मीडियावर सध्या या हटके सजावटीचे फोटो पाहायला मिळत आहेत. झारखंड राज्यातील जमशेदपूरमध्ये, आधार कार्डची एक मोठ्या आकाराची कट- आउट बनवून त्यात फोटोच्या जागी बाप्पाना विराजमान झाले आहेत. यामध्ये अगदी खऱ्या आधारकार्ड प्रमाणे सर्व तपशील दिसत आहेत. कैलास पर्वतातील भगवान गणेशाचा पत्ता आणि 6 व्या शतकातील त्यांची जन्मतारीख पाहून तुम्ही या मंडळाच्या अभ्यासाचा अंदाज लावू शकता.

(Ganesh Chaturthi 2022: चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा राजासह मुंबईतील प्रमुख मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घ्या एका क्लिकवर)

विशेष म्हणजे, या सजावटीच्या एका बाजूला असलेला बारकोड स्कॅन केल्यावर, स्क्रीनवर गणपतीच्या प्रतिमांसाठी गूगल लिंक उघडते. आधारकार्ड वरील गणपतीचा पत्ता- श्री गणेश एस/ओ ​​महादेव, कैलास पर्वत, वरचा मजला, जवळ, मानसरोवर, तलाव, कैलास पिनकोड- 000001 आणि जन्म वर्ष ०१/०१/६००CE असे लिहिलेले आहे.

पाहा बाप्पाचे आधारकार्ड

आधारकार्डात बाप्पाना विराजमान करणाऱ्या या मंडळाचे अध्यक्ष, सारव कुमार यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथे फेसबुक थीम पॅंडल बनवलेल्या एका ठिकाणी भेट दिल्यानंतर त्यांना हे आधार कार्ड-थीम पंडाल बनवण्याची कल्पना सुचली. जेव्हा देवाकडे आधार कार्ड असू शकते तेव्हा कदाचित ज्या लोकांनी ते बनवलेले नाही त्यांना प्रेरणा मिळू शकेल असा आपल्या सजावटीमागे हेतू असल्याचे कुमार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२२ ( Ganeshutsav ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Photo ganpati aadhaar card issued home address kailash parvat and date of birth check jharkhand ganesh pandal decoration svs

ताज्या बातम्या