गणेशोत्सव हा सण संपूर्ण देशात अगदी उत्साहात साजरा केला जातो. यंदा ३१ ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. महाराष्ट्रात तर या उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोच. मात्र इतर राज्यातही अगदी धुमधड्याक्यात हा सण साजरा केला जातो. या दहा दिवसांच्या कालावधीत ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. गुजरात राज्यातील सुरत येथेही अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातच्या सुरतमध्ये गणेश चतुर्थीच्या उत्सवादरम्यान धोकादायक स्टंट करत असताना एका व्यक्तीने चुकून स्वतःला पेटवून घेतले. सुरतच्या पर्वत पाटिया भागात बुधवारी ही घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक माणूस आगीने धोकादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तो ज्वलनशील पदार्थ तोंडातून बाहेर फेकून आगीच्या ज्वाळा काढण्याचा प्रयत्न करत होता.

Mahindra Bolero मधून दारूची तस्करी करणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांनी सुनावलं; म्हणाले, “दुर्दैवाने हे लोक…”

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की तो माणूस गर्दीसमोर एक स्टंट करत आहे तर दुसरा माणूस त्याचा स्टंट कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत आहे. स्टंट करणारा माणूस त्याच्या तोंडात टाकलेला ज्वलनशील पदार्थ बाहेर थुंकतो पण चुकून ते त्याच्या अंगावर पडते आणि त्याच्या कपड्यांना आग लागते. त्याच्या शेजारी उभा असलेला दुसरा माणूस पटकन त्याच्या बचावासाठी येतो. पेटलेला टीशर्ट पटकन काढण्यासाठी त्याला इतर लोक मदत करतात.

गणपती बाप्पासाठी तयार केले २४ कॅरेट सोन्याचे मोदक; एका मोदकाची किंमत वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सुदैवाने यावेळी कोणताही मोठा अपघात झाला नाही. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “सूरतच्या पर्वत पाटिया परिसरात गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान तोंडातून आगीच्या ज्वाळा काढण्याचा प्रयत्न करत असताना एका तरुणाने स्वतःला आग लावून घेतली.”

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video during a stunt during ganeshotsav a man set himself on fire pvp
First published on: 02-09-2022 at 14:43 IST