साधारण दोन-एक दशकांपूर्वी ’नॉन-स्टीक’या विशिष्ट प्रकारचे तवे उपलब्ध झाले. दिसायला आकर्षक, वापरण्यास-धुण्यास सोपे असे हे तवे गृहिणींना खूप आवडले.त्यानंतर नॉन-स्टीक पद्धतीची भांडी बाजारात आली. उपरोक्त फायद्यांबरोबरच अन्न शिजवताना कमी तेल लागणे व इंधनाची बचत होणे हे फायदे ह्या नॉन-स्टीक भांड्यांचे होते. ही भांडीसुद्धा आरंभी खूप महाग होती. त्यामुळे नॉन-स्टीक भांडी वापरणे, ही काही काळ तरी श्रीमंतांची मिजास होती. एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीने नॉन-स्टीक भांडी घरी आणली की तिची शेजार-पाजारच्या स्त्रियांमध्ये कॉलर टाईट होत असे, यावरुन त्यांच्या किमतीचा अंदाज यावा. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक, ही नॉन-स्टीक भांडी स्वस्त झाली. इतकी स्वस्त की एका भांड्यावर दुसरे भांडे मोफत मिळू लागले. मुळात पाश्चात्त्यांकडून आलेल्या वस्तू स्वस्त झाल्या की यामागे काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका येऊ लागते. काय आहे, या नॉन-स्टीक भांड्यांमागचे गौडबंगाल?

नॉन-स्टिक भांडी तयार करताना एका विशिष्ट केमिकलचा वापर केला जातो, ते म्हणजे परफ्लोरो ओक्टॅनॉइक ॲसिड(पीएफओए). पीएफओए हे आरोग्यासाठी घातक असे केमिकल आहे. वास्तवात नॉन-स्टीक भांड्यामधील ही केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला तशी घातक नाहीत. मात्र जेव्हा तुम्हीं या नॉन-स्टीक भांड्यांना अन्न शिजवण्यासाठी म्हणून अति-उष्णता देता व जेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस (५०० अंश फरनहाईट) एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील केमिकल्सचे विघटन सुरू होते व ते भांडे विषारी वायू फेकू लागते. दुर्दैवाने हे विषारी घटक नॉन-स्टिक भांड्यांच्या प्रेमात पडलेल्या घरातल्या गृहिणीच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिरतात. नॉन-स्टिकच्या केमिकल्समधून निघणारे विषारी घटक कोणत्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात?

Mumbai Local Female Passenger do not complain about Crimes information comes from the GRP study
चोरी, छेडछाड, लैंगिक छळाविरोधात ७१ टक्के महिलांचा तक्रार करण्यास नकार; कारण काय? अभ्यासातून ‘ही’ माहिती समोर
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

पीएफओए चे आरोग्याला घातक गुणधर्म पुढीलप्रमाणे – कार्सिनोजेनिक अर्थात कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, गर्भिणीने शोषल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकते; जसे जन्मतः बाळाचा आकार तुलनेने लहान असणे-नंतरच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशिर होणे-वगैरे, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढीवरही परिणाम करू शकते, थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बाधा आणून थायरॉइड हार्मोनच्या स्रवणामध्ये बिघाड निर्माण करू शकते, रक्तामधील चरबीचा चयापचय बिघडवू शकते(जे पुढे जाऊन अनेक आजारांना कारणीभूत होऊ शकते). उंदरांमध्ये केलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे लिव्हर(यकृत), पॅन्क्रीआ(स्वादुपिंड) किंवा टेस्टीज(वृषण) या अवयवांच्या कॅन्सरला कारणीभूत होऊ शकते, माशांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे ऑक्सिडेटिव स्ट्रेसला कारणीभूत होते: अर्थात शरीरामध्ये ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढवून रक्तामध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढवते (फ्री-रॅडिकल्स हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक-डायबिटीस,कॅन्सर एवढंच नव्हे तर वार्धक्यालाही आमंत्रण देतात), स्त्री-उंदरांवर केलेल्या एका संशोधनामध्ये पीएफओए रक्तामधील इन्शुलिनचे प्रमाण वाढवते. (आता लक्षात आले असेल तुमच्या, नॉन-स्टिक भांडी इतकी स्वस्तात किंवा अन्य खरेदीवर मोफत सुद्धा का मिळू लागली ते!)

हे वाचल्यावर मनात प्रश्न उभा राहतो की आपण एवढ्या उष्णतेपर्यंत नॉन-स्टिक भांडी तापवतो का? याचे ठाम उत्तर देणे कठीण आहे. मात्र कडधान्य-मांस यांसारख्या कठीण कवच असलेल्या पदार्थांना शिजवण्यास वेळ लागतो; त्यासाठी अधिक उष्णता लागते. खाद्य-तेल शिजवण्यासही अधिक उष्णता लागते, मात्र २६० हून कमी रिफाईन्ड करडईचे तेल तापवण्यास मात्र २६० अंश सेल्सिअसहून अधिक उष्णता लागते. अधिक वेळ अन्न शिजवण्याची सवय असणा-या गृहिणी नॉन-स्टिक भांडे अधिक उष्णतेपर्यंत तापवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण २ ते ५ मिनिटे तापवलेले नॉनस्टिक भांडेसुद्धा विषारी वायू फेकायला सुरुवात करते, असा संशोधकांचा अंदाज आहे. रिकामे भांडे नुसतेच तापवणेही घातक होऊ शकते. २०० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचल्यावर पीएफओमधील विषारी वायुंमुळे पक्षी मरतात, असे संशोधन सांगते. मानवास होणा-या एका फ्लूच्या लक्षणांमागे पीएफओए कारणीभूत असावा, अशीही शास्त्रद्न्यांना शंका आहे.

वाचकहो, भाज्या शिजवण्यासाठी शरीराला लोह पुरवणार्‍या लोखंडाच्या कढया, आपल्या कुंभारांना अर्थार्जन करुन देणारे मातीचे तवे ( मातीचे पॅन्ससुद्धा आता उपलब्ध आहेत), किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी असे सुरक्षित पर्याय स्वयंपाकासाठी वापरणे योग्य होईल.  “आमची नॉन-स्टिक भांडी पीएफओए पासून बनवलेली नाहीत”,असा प्रचार काही निर्माते आता करताहेत. जे निर्माते या केमिकलचा वापर करत नसतील, त्यांना हा लेख लागू होत नाही. पण यापूर्वी आपण वापरलेली (किंवा आजही वापरत असलेली) नॉन स्टीक भांडी या घातक केमिकल्सपासून बनवलेली होती वा आहेत, याचा हा अप्रत्यक्ष पुरावा नाही का!कोणतीही स्वयंपाकोपयोगी खरेदी करताना त्यामधून नेमकी कोणती केमिकल्स शरीरामध्ये जाणार आहेत, याची माहिती घेण्याची सवय लावा वाचकहो!