लाल-काळ्या वर्णाचे खाद्यपदार्थ लोह वाढवतात, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते, त्यात कितपत तथ्य आहे?शरीरामधील एखाद्या धातुघटकाशी निसर्गातील एखाद्या पदार्थाचे साम्य असेल तर तो पदार्थ तो शरीरघटक वाढवण्यास उपयुक्त होऊ शकतो, असा तर्क आपल्या पुर्वजांनी केला. त्यानुसार रक्त हे लाल वा लालसर-काळ्या रंगाचे आहे, म्हणून निसर्गातील जो-जो घटक लाल रंगाचा किंवा लालसर, काळसर वा तपकिरी रंगाचा असेल तो रक्तवर्धक होईल, असा अनुमान प्रमाणावर आधारित निष्कर्ष प्राचीन काळामध्ये पुर्वजांनी काढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निष्कर्षानुसार लालसर-काळ्या पानांची माठाची भाजी, काळसर रंगाची पिकलेली करवंदे, काळ्या मनुका, लालसर अहळीव (हलीम), काळ्या रंगाचे कारळे, काळे तीळ, काळसर तपकिरी रंगाचे खजूर, लालसर तपकिरी रंगाची तांदळाची तुसे, तांबूस रंगाचे आमचूर चूर्ण, लाल चणे, पांढर्‍या-काळ्या रंगाची चवळी, लालसर काळ्या रंगाची अळूची पाने, तांबूस रंगाचा कमळकंद, तपकिरी रंगाचा अळूचा कंद, तपकिरी काळसर रंगाचे केळफूल, गडद काळ्या रंगाची पिंपळी वगैरे पदार्थ रक्तवर्धक आहेत. विशेष गोष्ट ही की, हा तर्क प्रत्यक्षातही शरीरामधील लोह व पर्यायाने रक्त वाढवणारा आहे. म्हणजे असे की वर सांगितलेल्या सर्वच अन्नघटकांमध्ये लोह(आयर्न) हे तत्त्व मुबलक प्रमाणात असते; करवंदांपासून लालमाठापर्यंत आणि अहळीवापासून आमचूरापर्यंत सर्वच लाल-काळ्या रंगाचे पदार्थ हे रक्तवर्धक असतात, कारण त्यांच्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health tips in marathi which foods are good for how to increase iron levels in your blood
First published on: 09-03-2017 at 09:30 IST