कसलाही आजार नसल्याचे काकांनी मला ठामपणे सांगितले. पण सुनबाईचा प्रश्न सुटला नाही. ‘‘अहो डॉक्टर, बाबा पहाटे चारला मला उठवून चहा आणि फळ दे म्हणून सांगतात- ही तुम्हाला समस्या कशी वाटत नाही? ते नऊलाच झोपतात, पण मी मुलाचं सगळं करून रात्री अकराला झोपते. मला त्रास होतो, काहीतरी करून हे निदान सहापर्यंत झोपू शकतील ते बघा. एवढी कमी झोप घेऊन हे आजारी पडतील, अशीही भीती वाटते.’’सुनेचे म्हणणे बरोबर होते, पण यात उपचार नाही उपाय करण्याची गरज होती. साधारण ४० ते ५० टक्के ज्येष्ठांना समाधानकारक झोप मिळत नाही. यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कामावर, मनावर विपरीत परिणाम होतो.
* वृद्धपणी होणारे झोपेतील नसíगक बदल
– साधारण साठीनंतर मेंदूत होणाऱ्या बदलांमुळे सलग ८-९ तास झोप येत नाही. मधून-मधून जाग येते आणि झोप सावध होते. बहुसंख्य वृद्धांना नेहमीपेक्षा लवकर झोप येते आणि पहाटे लवकर जाग येते. झोप उथळ झाल्यामुळे झोपेचे तास वाढू शकतात. दिवसा एखादी डुलकी घेतली की बरं वाटतं.
– तुमची झोप कशी आहे यावरून तुमचे आरोग्य कळू शकते. कुठल्याही वयात झोप आरोग्याचे
प्रतिक असते. झोप चांगली तर आरोग्य चांगले, असे असते. तसेच काही कारणांनी नीट झोपता आले नाही, तर क्रमाने आरोग्य बिघडत जाते. त्यामुळे प्रत्येक वैद्यकीय तपासणीमध्ये झोपेची चौकशी करण्याला खूप महत्त्व दिले जाते.
– वृद्धपणी शारीरिक आणि मानसिक आजारपण झोपेच्या तक्रारींचे सर्वत्र दिसणारे कारण आहे. अनियंत्रित
रक्तदाब, दमा आणि मधुमेह, सांधेदुखी, अतिस्थूलपणा आणि शरीरातले रक्त कमी असल्याने झोप नीट लागत नाही. पार्किन्सन, लकवासारख्या मेंदू व मज्जासंस्थेच्या आजारांमध्ये झोपेचे विकार होण्याची शक्यता खूप असते. उदासीनता, भित्रेपणा, अतिविचार करणे, भ्रम-भास होणे यामुळे मन आणि शरीर  तणावग्रस्त होतात आणि झोप लागायला त्रास होतो. आजारासाठी दिलेल्या औषधांमुळेही कधी-कधी झोप जास्त किंवा कमी होते.
* चांगली झोप येण्यासाठी काय करू शकता?
वयोमानाने होणारे बदल स्वीकारले पाहिजेत म्हणजे निराशा होणार नाही. कुटुंबीयांनी देखील हे स्वीकारले पाहिजे आणि
काहीतरी नियोजन केल्याने कुटुंबातील इतर लोकांना त्यांनी त्रास कमी होइल. झोपेसाठी शांत, हवेशीर जागा निवडली पाहिजे आणि पलंगाजवळ झोपमोड होईल, अशी कुठलीही गोष्ट ठेवू नये- उदा: टी.व्ही. झोपेच्या खोलीतला दिवा मंद ठेवला पाहिजे. हे सर्व वास्तवात आणणे कठीण असेल तर  इअर प्लग आणि आय प्लग वापरले पाहिजे. चहा, कॉफी प्रमाणातच घ्यावी आणि संध्याकाळनंतर अजिबात घेऊ नये. नियमितपणे व्यायाम केला पाहिजे पण संध्याकाळनंतर व्यायाम करू नये. रात्रीचे जेवण हलके आणि कमी मसालेदार असावे. दारू, तंबाखू, झोपेच्या गोळ्यांनी झोपेची मांडणी बिघडते म्हणून या पदार्थापासून दूर राहावे. डुलकी शक्यतो दुपारच्या आधी घ्यावी, खूप उशीर झाला तर रात्रीची झोप बिघडू शकते.
* झोपेचे आजार
वृद्धपणी झोपेचे स्वरूप बदलते पण झोप आरामदायी असली पाहिजे, हे महत्त्वाचे. अंथरुणावर गेल्यानंतर साधारण अध्र्या-पाऊण तासात झोप लागली पाहिजे. रात्री जाग आली तरी थोडय़ा वेळाने झोप परत लागली पाहिजे आणि  झोपून उठल्यावर ताजे आणि जोमदार वाटले पाहिजे. असे नसले तर आपली झोप बरोबर नाही, असे समजले पाहिजे. वर लिहिल्याप्रमाणे आधी आपल्यात बदल करून पाहावे. तरीही झोप येत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेऊ शकता. झोपेच्या गोळ्या वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेऊ नये. वृद्धपणी झोपेत चालणे/ बोलणे, सतत वाइट स्वप्न पडणे हे सामान्य नसते, ते तपासलेच पाहिजे. दिवसभर चांगले वर्तन असलेल्या वृद्धांमध्ये काही वेळा रात्री विसरणे, असंबद्ध बोलणे, घरातल्या घरात हरवणे, भ्रम-भास होणे ही लक्षणे दिसू लागतात. ते दिवसभर झोपतात आणि रात्री जागे राहतात. मेंदूचे काम बिघडण्याचे हे लक्षण असते. कधी- कधी शरीरातील इतर अवयवांचे काम बिघडल्यामुळे रक्तातील रचना बदलते, म्हणून मेंदूवर तात्पुरता परिणाम होऊन अशी लक्षणे दिसू शकतात. अशा परिस्थितीत लवकरात- लवकर वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे कारण जीवालाही धोका असू शकतो. आपली झोप चांगली असली पाहिजे ही अपेक्षा सर्वानी केलीच पाहिजे आणि ती पूर्ण झाली पाहिजे. हे धोरण आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योग्य आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला