‘रक्तं जीव इति स्थिति ।’ म्हणजे रक्त हे जीवन आहे असे रक्तधातूचे शरीरातील अनन्यसाधारण  महत्त्व सांगत असतानाच आयुर्वेदीय ग्रंथकारांनी व्याधींच्या चिकित्सेचे एक महत्त्वपूर्ण सूत्र सांगितले आहे, ते म्हणजे, जे व्याधी शीत-उष्ण, स्निग्ध-रूक्ष यापकी कोणत्याही उपचारांना  दाद देत नाहीत ते रक्त प्रकोपामुळे झालेले असतात व त्यात रक्तमोक्षण म्हणजे दूषित झालेले रक्त शरीराबाहेर काढून टाकणे ही चिकित्सा लाभदायी ठरते. जबडय़ाचा कॅन्सर झालेल्या श्रीयुत पाटील यांना रेडिओथेरपी, केमोथेरपी देऊनही कॅन्सर नियंत्रणात राहात नव्हता. परिणामी खालचा संपूर्ण जबडा अर्बुदाने व्यापून आकाराने अध्र्या किलगडाएवढा झाला होता. त्या जोडीला असह्य़ वेदना, ताप, वजन घटणे ही लक्षणे होतीच. अर्बुदाला कारणीभूत रक्तदुष्टीचा विचार करून वरील सूत्रानुसार आम्ही त्यांना अर्बुदावर जलौका लावल्या व रक्तमोक्षण केले. दूषित रक्त निघून गेल्याने अर्बुदाचा आकार कमी झाला. रुग्णाला जबडय़ास हलकेपणा जाणवू लागला. तेथील वेदना कमी झाली आणि अतिशय पुढच्या स्टेजला पसरलेल्या या कॅन्सर रुग्णाला आम्ही वेदनाशामक औषधांशिवायही आराम देऊ शकलो.
रक्तमोक्षण म्हणजे रक्तातील दूषित झालेले रक्त काढून टाकण्यासाठी सिरेतून किंवा जलौकांद्वारे दुष्ट रक्ताचे निर्हरण करणे हा पंचकर्मापकी एक उपक्रम आहे. ही दूषित पित्त-रक्ताची चिकित्सा असून त्वचारोग, नागीण, रक्तपित्त म्हणजे शरीराच्या कान, नाक, डोळे, तोंड, मूत्रमार्ग, गुदमार्ग, योनीमार्ग, त्वचा या बहिर्मुख छिद्रांतून रक्तप्रवृत्ती होणे, कावीळ, तोंड येणे यांसारख्या आजारांपासून ते रक्तप्रधान दुष्ट व्रण-ग्रंथी-अर्बुदांसारख्या दुर्धर रक्तप्रदोषज आजारांत रक्तमोक्षण ही अतिशय लाभदायक चिकित्सा आहे. आयुर्वेदीय ग्रंथकारांनी रक्तमोक्षण करण्याच्या चार पद्धती वर्णन केल्या आहेत. सिरावेध म्हणजे व्याधिग्रस्त अवयवाच्या जवळच्या सिरेचा वेध करून रक्तनिर्हरण करणे. जलौकावचारण म्हणजे व्याधिपीडित भागावर जलौका लावून त्यांच्याद्वारे रक्तनिर्हरण करणे. शृंग म्हणजे प्राण्यांचे पोकळ िशग किंवा अलाबु म्हणजे पोकळ छोटा भोपळा सिरेचा वेध करून तेथे निर्वात जागा निर्माण करून त्यावर लावणे, जेणेकरून पोकळीमुळे शृंग व अलाबुमध्ये दुष्ट रक्त खेचून घेतले जाते. रक्तमोक्षणाच्या या चारही पद्धती विशिष्ट व्याधींमध्ये व विशिष्ट अवस्थांमधे उपयुक्त ठरतात. सार्वदेहिक रक्तदुष्टीमुळे निर्माण झालेल्या विकारांत सिरावेधाचा, विशिष्ट स्थानी रक्तदुष्टी झाल्यामुळे निर्माण झालेल्या विकारांत जलौका, शृंग व अलाबु यांचा अधिक उपयोग होतो. त्यातही पित्तदोषाच्या उष्णगुणाच्या दुष्टीमुळे निर्माण झालेल्या व्याधींत जलौकावचारण अधिक लाभदायी ठरते. रक्तमोक्षणाच्या उपरोक्त प्रकारांपकी सिरावेध व जलौकावचारण हे अधिक प्रचलित उपक्रम आहेत.
मुखाचे  कॅन्सर,  त्वचेचे  कॅन्सर,  सार्कोमा, यकृत अग्न्याशयाचा कॅन्सर, ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर यांत रक्तमोक्षण ही उपयुक्त चिकित्सा आहे. स्वस्थ व्यक्तीने रक्तदुष्टीचे व्याधी होऊ नयेत म्हणून शरद ऋतूत दरवर्षी रक्तमोक्षण करावे. मात्र रुग्णांमध्ये ऋतूचा विचार न करता रक्तमोक्षण केले जाते. रिकाम्यापोटी रक्तमोक्षण करणे अयोग्य आहे. किती प्रमाणात रक्तमोक्षण करावे याचा निश्चय वैद्याने रुग्णाचे बल वय, व्याधीचे बल यांचा विचार करून करावे. कॅन्सरसारख्या दोषदुष्टी बलवान असलेल्या व्याधीत वारंवार रक्तमोक्षण करणे आवश्यक असते. वमन,  विरेचन, बस्ति, नस्य व रक्तमोक्षण या पंचकर्माशिवाय व्रण-ग्रंथी-अर्बुदाींची चिकित्सा करण्यासाठी ग्रंथकारांनी काही विशेष उपक्रम सांगितले आहेत, ज्यांना सुश्रुताचार्यानी ‘षष्टि उपक्रम’ म्हणजे व्रणाचे ६० उपक्रम अशी संकलित संज्ञा दिली आहे. यापकी औषधी काढय़ाने  गुळण्या करणे यास गंडूष तर औषधांचा काढा किंवा औषधांचा कल्क म्हणजेच चटणी यांचे तोंडात धारण करणे यास कवल म्हणतात. गंडूष व कवल हे उपक्रम जीभ,  तालु, गालाचा अंतर्भाग, हिरडय़ा, घसा या अवयवांच्या कॅन्सरमध्ये लाभदायी  ठरतात. ज्येष्ठमध, जाईची व बकुळीची पाने यांच्या काढय़ाने अथवा स्वरसाने केलेले गंडूष;  दूध, तूप यांनी केलेले गंडूष तोंडाच्या कॅन्सरमध्ये तोंडात झालेले व्रण जखमा भरून काढण्यास उपयुक्त ठरतात. तसेच रेडिएशन व केमोथेरपीचा दुष्परिणाम म्हणून तोंड आल्यासही अशा प्रकारचे गंडूष प्रभावी ठरतात. तोंडाच्या कॅन्सरमध्ये तोंडात अधिक प्रमाणात, चिकट  दरुगधी  कफाची  निर्मिती होत असल्यास खदिर (कात), त्रिफळा यांचा काढा, मध व पाणी यांच्या गुळण्या केल्यास तोंडाचा चिकटा नष्ट होऊन तोंड स्वच्छ होण्यास मदत होते.  अर्बुद, ग्रंथी यामुळे स्थानिक वेदना, सूज आल्यास परिषेक, उपनाह व लेप हे उपक्रम लाभदायी ठरतात. सूज व वेदना कमी करणाऱ्या दशमूळ अशा औषधांच्या कोमट काढय़ाची दुखऱ्या भागावर धार सोडणे म्हणजे परिषेक होय. कणीक, लसूण, हळद, सैंधव व तिळतेल यापासून तयार केलेले किंवा वातशामक औषधांच्या कल्कापासून तयार केलेले गरम  पोटिस ग्रंथी-अर्बुदावर बांधून शेक देणे म्हणजे उपनाह होय. यामुळे अपक्वावस्थेत असलेले व्रणशोथ, ग्रंथी-अर्बुद लवकर पक्व होण्यास मदत होते, स्थानिक वेदना कमी होतात. दोषदुष्टीचा विचार करून वातशामक, पित्तशामक किंवा कफशामक औषधांचा लेप  ग्रंथी अर्बुदावर  लावल्यासही  वेदना, सूज, लालपणा कमी होण्यास मदत होते. कॅन्सरमध्ये पित्त व रक्तदुष्टी असल्यास दशांग लेप व वात-कफप्रधान दुष्टीत शोथहर लेप उपयुक्त ठरतो. कॅन्सरच्या व्रणांमध्ये दूषित कफ, क्लेद, पूय, कृमी व दरुगध असल्यास राळ, गुग्गुळ, ओवा, हळद, देवदास अशा कफ-क्लेदनाश औषधांची धुरी देणे म्हणजेच धूमपानाने  रुग्णास  आराम मिळतो. अशा व्रणांमध्ये याच औषधांच्या वस्त्रगाळ चूर्णाचे  अवचूर्णन केल्यासही जखमा लवकर कोरडय़ा व र्निजतुक होण्यास मदत होते. व्रणामधून अधिक प्रमाणात रक्तस्राव होत असल्यास हळद, लोध्र अशा रक्तस्राव थांबविणाऱ्या वनस्पतींची चूर्ण जखमांवर दाबून ठेवणे यास शोणितस्थापन म्हणतात.  योनी किंवा गर्भाशयमुखाच्या कॅन्सरमध्ये योनीतून दरुगधी, चिकट स्राव, रक्तस्राव होत असल्यास वड-उंबर-िपपळ यांसारख्या वृक्षांच्या सालीच्या काढय़ाने योनीचे धावन करणे म्हणजे योनिधावन व त्यानंतर यष्टिमधु तेल, यष्टिमधु घृत, शोधन तेल, रोपण तेल अशा औषधी तेल  किंवा  तुपात भिजवलेला विशिष्ट प्रकारचा कापसाचा पिचू ठरावीक काळ योनीत धारण करणे म्हणजे योनिपिचू हे उपक्रम लाभदायी ठरतात. निद्रानाशक व शामक अशा औषधांनी सिद्ध केलेल्या तेलात भिजवलेला कापसाचा पिचू डोक्यावर विशिष्ट काळ ठेवणे म्हणजे  शिरोपिचू व याच किंचित कोमट तेलाची कपाळावर धारा सोडणे म्हणजे शिरोधारा हे उपक्रम ब्रेन टय़ुमर, मस्तिष्कात पसरलेले कॅन्सर, रेडिएशन-केमोथेरपीमुळे उद्भवणारा निद्रानाश या अवस्थांत लाभदायी ठरतात. हे सर्व उपक्रम कॅन्सरच्या विशिष्ट अवस्थांमध्ये विशिष्ट प्रकारे करणे योग्य असल्याने तज्ज्ञ वैद्यांनीच करावे. षष्टि उपक्रमांपकी उपरोक्त चिकित्सा उपक्रम ही कॅन्सरची परिपूर्ण चिकित्सा नसली तरी कॅन्सर रुग्णांच्या वेदना सुसह्य़ करून त्यांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास नक्कीच मदत करतात.

Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क