वात-पित्त-कफ या तीनही दोषांची दुष्टी नष्ट करणारा, रस  व मांस धातू तसेच आमाशयाची शुद्धी करणारा, जाठराग्नीचे कार्य व पचन सुधारणारा, शरीराचे बलवर्धन करणारा, लघु (पचनास हलका), पाचक व पोषक आहार, विहार व औषधे  आमाशयाच्या कॅन्सरमध्ये लाभदायी ठरतात. शमन औषधांमध्ये आमलकी, ज्येष्ठीमध, सुंठ, िहग्वष्टक चूर्ण, प्रवाळ, गरिक यांचा उपयोग आमाशयाच्या कॅन्सरमध्ये विशिष्ट  अवस्थांमध्ये विशिष्ट प्रकारे केल्यास लाभ होतो. कुष्मांडावलेह, च्यवनप्राश अशी रसायन औषधेही काही रुग्णांत लाभदायी ठरतात. रुग्णाचे बल चांगले असल्यास तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली बस्तीसारखी पंचकर्म चिकित्साही उपयुक्त ठरते. सगळेच आजार प्राय: पोटातून सुरू होतात, असे म्हणतात ते योग्यच आहे. मग पोटाच्या-आमाशयाच्या कॅन्सरमध्ये तर सुयोग्य आहार घेऊन आमाशयाची काळजी घेणे अत्यावश्यकच आहे. आमाशयाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांनी पोळी, भाजी, भात असे घनपदार्थ तुलनेने कमी व सूप, सार, वरण, आमटी, दूध, ताक, फळांचे रस, खीरी असे द्रव व अल्प घनपदार्थ अधिक घेणे पचनास सुलभ ठरते. तसेच एका वेळी पोटभर आहार घेण्याऐवजी तीन-तीन तासांच्या अंतराने  पोटास तडस लागणार नाही एवढा मर्यादित आहार घ्यावा. शुद्ध  ढेकर येणे, भुकेची जाणीव होणे, शरीर हलके वाटणे अशी आधीचा आहार पचल्याची लक्षणे दिसल्यावर पुढील आहार सेवन करावा.
 ल्ल सकाळी उठल्यावर कडुिनब, ज्येष्ठीमध, बकुळ, त्रिफळा यांसारख्या कडू व तुरट चवीच्या औषधी द्रव्यांच्या चूर्णाने दंतधावन व किंचित कोमट पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे तोंडातील कफाचा चिकटा नष्ट होते व जिभेला रुची जाणवू लागते. यानंतर चहाऐवजी आले, गवती चहा, तुळस, जेष्ठीमध यांचा कोमट हर्बल टी गाईचे दूध व खडीसाखर घालून घ्यावा किंवा चिमूटभर हळद किंवा सुंठ पावडर घालून गाईचे कोमट दूध घ्यावे. सकाळी नाश्त्यास आरारूट, िशगाडा, रवा, तांदूळ, नाचणीचे सत्त्व यांची दुधात शिजवलेली खीर वेलची पावडर किंवा केशर घालून घ्यावी. याशिवाय तिखट शिरा, उपमा, सांजा, मूगाचे-तांदळाचे किंवा एकत्रित डाळांचे लसूण, आले, ओवा, जिरे संधव घालून केलेले धिरडे, भाजणीचे थालिपीठ यांचाही समावेश भूकेचा विचार करून नाश्त्यात करावा.
ल्ल दुपारच्या जेवणास सुरुवात करण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधी पाव इंची आल्याचा तुकडा व चिमूटभर संधव चावून खावे. जेवणाची सुरुवात मूग किंवा मसूर डाळीचे कोमट  वरण किंवा कढणाने करावी. यामुळे आमाशयातील कफाचा उपलेप नष्ट होऊन जाठराग्नी प्रदीप्त होतो व पुढील भोजनाचे पचन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. जेवणात साजूक तूप लावलेला गव्हाचा फुलका, तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी, कोमट मऊ भात (तांदूळ भाजून केलेला), मुगाची खिचडी, दूधी- पडवळ- बीट- मुळा- फरसबी- घेवडा यांसारख्या वाफवलेल्या व तूप- जिरे- मिरे- धणे- लसूण- िहग- आले- कांदा- कढीपत्ता यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा समावेश करावा. कोरळ (कांचनार), भांरगी, तांदुळजा, चाकवत, पालक यांसारख्या पालेभाज्या तसेच ताकातील पालेभाज्या सेवन कराव्या. चवीसाठी मुगाचा भाजलेला पापड, मोरावळा, साखरांबा, सुधारस पथ्यकर! जेवणानंतर गाईच्या दुधाचे गोड, ताजे व लोणी काढलेले पातळ ताक, जिरेपूड, कोिथबीर व संधव घालून घ्यावे. उकळून निम्मे आटवलेले पाणी  जेवणाच्या मध्ये तहान असेल एवढेच प्यावे. आहाराचे पचन चांगले व्हावे म्हणून  दुपारी जेवणानंतर झोपणे तर वज्र्यच! याउलट झेपतील इतक्याच शत नाही तरी मर्यादित पावल्या घालाव्या.
 ल्ल सायंकाळी साळीच्या लाह्य़ांचा चिवडा, साळीच्या लाह्य़ांचे सूप, राजगिरा किंवा साळीच्या लाह्य़ा दुधात भिजवून घ्याव्या. याशिवाय मुगाचा, रव्याचा, राजगिऱ्याचा लाडूही पथ्यकर आहे. डाळिंब, गोड ताजी द्राक्षे, चिकू, सफरचंद, ताजे अंजीर, काळ्या मनुका, जरदाळू, खजूर अशी गोड फळे व सुकामेवा विशेषत: उन्हाळ्यात घ्यावी. फळे शक्यतो त्या त्या ऋतूत नसíगकत: पिकणारीच घ्यावी.
ल्ल रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी म्हणजे सायंकाळी  ७च्या  दरम्यान करावे. रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा हलके असावे. यात मुगाची खिचडी, मुगाचे पीठ लावलेली कढी व भात, मऊ तूप भात, भाज्यांचे सूप व भूक चांगली असल्यास तांदूळ किंवा ज्वारीची भाकरी यांचा समावेश असावा. रात्रीचे जेवण व झोप यांच्यामध्ये कमीत कमी दोन तासांचे अंतर असावे.
सकाळी उठल्यावर उपाशीपोटी भरपूर पाणी पिणे, जेवण्यापूर्वी पाणी पिणे, तहान न लागताच पाणी पिणे, अतिशय गरम व अतिशय थंड पाणी पिणे यामुळे जाठराग्नीची व आमाशयाची दुष्टी होते, अन्नपचन बिघडते व आमनिर्मिती होते. त्यामुळे उकळून निम्मे आटवलेले कोमट पाणी तहान लागेल तेव्हाच पिणे पथ्यकर ठरते.
पथ्यकर आहाराच्या जोडीला शुद्ध हवेत शरीरास सोसवले इतके चालणे, तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्राणायाम व योगासने करणे, सकाळी लवकर उठणे, रात्री लवकर झोपणे, काम क्रोधादी षड्रिपूंपासून मनाचे रक्षण करणे व आपल्या आवडीच्या रचनात्मक कार्यात व्यग्र राहाणे यांचे आचरणही कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास उपयुक्त ठरते.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?