‘संहति कार्यसाधिका’ अशी एकजुटीचे महत्त्व सांगणारी संस्कृत भाषेत एक म्हण आहे. चिकित्सेबाबतही ही म्हण लागू आहे. कोणत्याही एकाच प्रकारच्या चिकित्सेने आजार बरा होत नाही. कॅन्सरच्या आयुर्वेदिक चिकित्सेबाबतही शोधन आणि शमन या महत्त्वपूर्ण चिकित्सा पद्धतींसह अनुषंगिक उपक्रम, रसायन चिकित्सा, पथ्यापथ्य व समुपदेशन यांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे.
शिरोधारा व शिरोबस्ती, नेत्रबस्ती, योनिपिचू, योनिधावन, अवगाह स्वेद, लेप, गंडुष, अवचूर्णन यांसारखे अनुषंगिक उपक्रम विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपयुक्त ठरतात. कॅन्सरमध्ये रसादि सात धातू व त्यांचे अग्नी यांची विकृती असते. त्यामुळे कॅन्सरची चिकित्सा करताना व कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्यासाठी रसादि सात धातूंना बल देणारी रसायन चिकित्सा महत्त्वपूर्ण ठरते. यात दूध, तूप, साळीचा भात यांसारखा सात्त्विक रसायन आहार, शतावरी, गोक्षुर, अश्वगंधा, कुष्मांड, सुवर्णभस्म यांसारखी रसायन औषधे व मानसिक शुचिता वाढविणारे आचार रसायन म्हणजेच धर्मविहित आचरण यांचा समावेश होतो.
आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यकीय शास्त्रात व्याधीचा समूळ नाश करण्यासाठी औषधांइतकेच किंबहुना अधिकच पथ्यकर आहार-विहाराला महत्त्व दिले आहे. संक्षेपत क्रियायोगो निदान परिवर्जनम्। म्हणजे ज्या कारणांनी व्याधी झाली त्यांचा त्याग करणे हे चिकित्सेचे पहिले सूत्र असल्याने असा आहार या रुग्णांनी वज्र्य करावा.
* व्याधिप्रतिकारशक्ती कमी होणे हेच सर्व व्याधींचे मूळ
असल्याने कॅन्सरमध्येही व्याधिक्षमत्व वाढविणारा आहार पथ्यकर ठरतो. यासाठी तांदूळ भाजून, भात साठेसाळी मिळाल्यास उत्तम, भाताची पेज, तांदळाचे घावन, फुलका, ज्वारीची – तांदळाची भाकरी, रव्याची पेज, रव्याचा गोड शिरा, उपमा, मुगाचे वरण, मसूर डाळीचे वरण, पडवळ – कोबी – दूधी – भेंडी – दोडका – तांदूळजा – चाकवत – कोरळ (कांचनार) – वसु (पुनर्नवा) यांसारख्या भाज्या, तूप – जिरे – धणे – आले – लसूण – कांदा – पुदिना यांची फोडणी दिलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सूप यांचा आहारात समावेश करावा.
* ल्युकेमिया म्हणजे रक्ताच्या कॅन्सरमध्ये मुळा, बीट,
गाजर यांची कोिशबीर (दही न घालता), लसूण, कोिथबीर, धणे, जिरे, पुदिना यांची चटणी तोंडी लावण्यास असावी.
* कॅन्सरमध्ये भूक मंदावणे, तोंडाला चव नसणे अशी
लक्षणे बहुतांशी दिसत असल्याने अशा वेळी मोरावळा, िलबाचे गोड लोणचे, सुधारस जेवणात समाविष्ट करावा. बहुतांशी गोड, आंबट रसाची फळे तर्पण करणारी असतात. त्यापकी कॅन्सरमध्ये गोड द्राक्षे, गोड डािळब, सफरचंद, पपई, ड्रायफ्रूट्सपकी काळ्या मनुका, अंजीर, खजूर, जरदाळू अशी रक्तवर्धक, पाचक फळे विशेषत: दुपारी रुग्णास द्यावी. फळे ताजी, गोड असावी. फळांचे रस देण्याऐवजी अख्खी फळे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा विकारही संभवणार नाही.
* हिवाळ्यात – पावसाळ्यात फळांच्या फोडींना सुंठपूड,
जिरे – मिरेपूड लावून सेवन केल्यास कफाचे विकार संभवणार नाहीत. मांस पचण्यास जड असले तरी ज्या कॅन्सर रुग्णांचे वजन कमी होत आहे, बल क्षय झाला आहे, अस्थींमध्ये कॅन्सर पसरला आहे अशा रुग्णांत मटण सूप किंवा चिकन सूप – तूप, जिरे, मिरे, आले, लसूण, अशा पाचक द्रव्यांची फोडणी देऊन घेतल्यास लाभदायक ठरते. रक्तक्षय- पांडुरोगाची लक्षणे असल्यास प्राधान्याने पायासूप किंवा लिव्हरसूप उपयुक्त ठरते.
थोडक्यात, पचनास हलका परंतु शरीरातील रस – रक्तादि सप्त धातूंचे वर्धन- तर्पण करणारा, मल-मूत्राचे शरीराबाहेर योग्य प्रकारे विसर्जन करण्यास मदत करणारा, प्रतिकार शक्ती वाढविणारा आहार कॅन्सर रुग्णांना पथ्यकर असतो.
कॅन्सरचे नाव ऐकल्यावरच रुग्णाचे मनोधर्य खचलेले असते. आता मृत्यूशिवाय पर्याय नाही अशा कल्पनेने सतत विपरीत विचार मनात येत असतात, अशा वेळी शरीराला फार कष्ट होणार नाहीत. परंतु मनास विरंगुळा मिळेल अशा आवडीच्या कामात अथवा छंदात रुग्णाचे मन गुंतवणेही मानसिक चिकित्सा अत्यावश्यकच असते.
अशा प्रकारे कॅन्सरतज्ज्ञांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली चिकित्सा घेत असताना आयुर्वेदोक्त चिकित्सा व हितकर आहार-विहाराचे पालन केल्यास कॅन्सरवर मात करणे रुग्णास व वैद्यास शक्य आहे.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?