News Flash

स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर)

आय.टी.त वयाच्या ३४ व्या वर्षीच उच्चपदावर पोहोचलेल्या निशिगंधाला कामाचा ताण, कामानिमित्त सतत प्रवास, बाहेरचे व अनियमित वेळी खाणे, रात्री जागरण या सर्व गोष्टींमुळे आहारविहाराचे नियम

| September 30, 2014 06:25 am

आय.टी.त वयाच्या ३४ व्या वर्षीच उच्चपदावर पोहोचलेल्या निशिगंधाला कामाचा ताण, कामानिमित्त सतत प्रवास, बाहेरचे व अनियमित वेळी खाणे, रात्री जागरण या सर्व गोष्टींमुळे आहारविहाराचे नियम पाळणे शक्यच झाले नाही. फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, फ्रिजमध्ये ठेवलेले शिळे पदार्थ, बटाटा-केळी-गूळ-चिंच-टोमॅटो-आइस्क्रीम असे कफदोष व रसधातूची दुष्टी करणारे पदार्थ यांची आहारातील रेलचेल, अतिशय काळजी करण्याचा व तापट स्वभाव या सगळ्याची परिणती २०१२ मध्ये फुफ्फुसात पसरलेला स्तनाचा कॅन्सर होण्यात झाली. २ वेळा केमोथेरॅपी, शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी, हॉर्मोनल चिकित्सा यांनाही दाद न देता कॅन्सर यकृतातही पसरला. याच दरम्यान निशिगंधा आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करण्यासाठी आली असता पथ्यपालन हा आयुर्वेदिक चिकित्सेचा कणा असल्याचे तिला समजावून सांगितले. पूर्वीच्या आयुष्यातील आहारविहारातील चुका टाळून औषधासोबत यापुढे घ्यायच्या आहारविहाराबाबत मार्गदर्शन केले. गेल्याच आठवडय़ात कॅन्सर आटोक्यात असल्याचे रिपोर्ट्स घेऊन निशिगंधा आमच्या ओ.पी.डी.त आली ती सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच!
नुकतेच लग्न झालेल्या, सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या नंदिनीला २०११ मध्ये २६व्या वर्षी तिसऱ्या स्टेज व ग्रेडमधील स्तनांचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. नंदिनीच्या आत्या व आजीलाही स्तनाचा व गर्भाशयाचा कॅन्सर झाला असल्याने तिची जिनेटिक टेस्ट केली असता ब्रॅका  १ या स्तनाच्या कॅन्सरला कारणीभूत जनुकात म्युटेशन म्हणजे बदल झाल्याचे आढळले. अशा प्रकारच्या जनुकीय विकृती असलेल्या स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णांत स्तनानिर्हरण शस्त्रकर्म व केमोथेरपीच्या जोडीला  आधुनिक वैद्यकशास्त्रात, स्त्रीबीजकोशाचे निर्हरण ही प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र ही शस्त्रक्रिया म्हणजे वैवाहिक जीवनातील अतिशय नाजूक निर्णय असल्याने या नवदाम्पत्याने त्याऐवजी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा घेण्याचा निर्णय घेतला. नियमित शमन रसायन चिकित्सा, दरवर्षी वमन व बस्ती ही पंचकर्म चिकित्सा, पथ्यपालन, नियमित व्यायाम व दिनचय्रेचे पालन यांच्या साहाय्याने नंदिनीने आजपर्यंत कॅन्सरच्या पुनरुद्भवावर नियंत्रण मिळविले  आहे. उपरोक्त दोनही स्तनाच्या कॅन्सरने ग्रस्त तरुण स्त्रियांच्या उदाहरणावरून आजकाल बदलत्या आधुनिक जीवनशैलीचा परिणाम म्हणून स्तनाच्या कॅन्सरचे तारुण्यावस्थेतील वाढते प्रमाण स्पष्ट होते.
स्तन हा स्त्री शरीरातील अवयव अपत्यजन्मानंतर नवजात बालकाचे पोषण करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्तनांची निर्मिती करतो. साधारण पहिले सहा ते आठ महिने मातेचे स्तन हाच बालकाचा परिपूर्ण आहार असल्याने बालकाच्या शारीरिक व बौद्धिकवाढीसाठी स्तन व स्तनाचे  सौष्ठव अतिशय गरजेचे असते. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार स्तन हा अवयव लोब्युल्स म्हणजे दुग्ध निर्माण करणाऱ्या दुग्धग्रंथी, डक्टस् म्हणजे  दुग्धाचे दुग्धग्रंथांपासून स्तन चुचूकापर्यंत वहन करणाऱ्या दुग्धवाही वाहिन्या व स्ट्रोमा म्हणजे दुग्धग्रंथी व दुग्धवाही वाहिन्याच्या आजूबाजूला असलेला मेद-मांस-धातू, रक्तवाहिन्या व लसिकावाही वाहिन्या अशा घटकांपासून निर्माण होतो. यापकी दुग्धवाही वाहिन्यांच्या अंतर्भागास आकृत्त करणाऱ्या पेशींमध्ये निर्माण होणाऱ्या कॅन्सरचे म्हणजे डक्टल  कार्सनिोमाचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे ८० टक्के असून दुग्धग्रंथीच्या  अंतर्भागास व्यापून असलेल्या पेशींच्या कॅन्सरचे म्हणजे लोब्युलर कार्सनिोमाचे प्रमाण केवळ १० टक्के आढळते. हे दोनही प्रकारचे कॅन्सर जेव्हा दुग्धग्रंथा व  दुग्धवाही वाहिन्यांच्या अंतर्भागासच व्यापून असतात तेव्हा त्यास स्थानिक कॅन्सर किंवा कार्सनिोमा इन सी टू असे म्हटले जाते. या प्रकारचे कॅन्सर स्थानिक असल्याने ते सामान्यत: उग्र स्वरूप धारण करीत नाहीत. याविरुद्ध मांस, मेद, रक्तवाही व लसिकावाही धमन्या या आजूबाजूच्या घटकांत पसरलेले कॅन्सर शरीरात अन्य अवयवांत  पसरण्याची संभावना अधिक असून त्यांना इन्व्हेझिव्ह म्हणजे पसरणारे कॅन्सर असे संबोधले जाते. याशिवाय सार्केमा, पॅगट डिझिझ, इंफ्लमेटरी ब्रेस्ट कॅन्सर, अँजिओसार्कोमा या प्रकारचे स्तनाचे कॅन्सरही काही प्रमाणात आढळतात. प्रत्यक्ष स्तनामध्ये, कक्षाप्रदेशी म्हणजे काखेत व आक्षकास्थीच्या वरच्या व खालच्या बाजूला असलेल्या लसिका ग्रंथींमार्फत म्हणजे िलफ नोडस्मार्फत स्तनातील लसिकेचे वहन होते. त्यामुळे स्तनाच्या कॅन्सरमध्ये या लसिकाग्रंथी आकाराने मोठय़ा होणे हे एक प्रमुख लक्षण आढळते.
आयुर्वेदानुसार या स्त्रीविशिष्ट अवयवांतील कॅन्सरचा विचार करताना वात-पित्त-कफ हे तीन दोष, रस, शुक्र, मांस व मेद धातू, आर्तववह व स्तनवह स्रोतस, स्तन व गर्भाशय (त्र्यावर्ता योनी) हे अवयव यांच्या विकृतीचा विचार अनिवार्य आहे. या सर्व घटकांमध्ये विकृती निर्माण करणारा  अपथ्यकर आहारविहार- मानसिक हेतू ही स्तनाच्या कॅन्सरची संभाव्य  कारणे आहेत. अधिक मसालेदार, जळजळीत, तळलेले भजी-वडे असे  पदार्थ तसेच शरीराच्या स्रोतसांत अवरोध करणारे दही, केळे, मिठाई (दुग्धजन्य पदार्थ) असे पदार्थ यांचे वारंवार व मोठय़ा मात्रेत सेवन करणे, नियमित व्यायाम न करणे, दुपारी नियमित झोपणे तसेच सतत चिंता, भीती, दु:ख या कारणांमुळे शरीरात प्राधान्याने पित्त, कफाची व वाताची दुष्टी होऊन रस-शुक्र धातूंची व पर्यायाने स्तन या अवयवाची दुष्टी होते. स्थानवैगुण्यामुळे या अवयवात कॅन्सरशी साधम्र्य असलेल्या आयुर्वेदोक्त दुष्ट व्रण-ग्रंथी -अर्बुद-विद्रधी-विसर्प व्याधींचा प्रादुर्भाव होतो. आजकाल पाळी लांबविण्यासाठी व गर्भधारणा टाळण्यासाठी बऱ्याच स्त्रिया Oral Contraceptive Pills  चा वापर  करतात. निसर्गचक्राविरुद्ध  अशा प्रकारे वारंवार औषधे घेणे हेही स्तनासारख्या स्त्रीविशिष्ट  अवयवाच्या कॅन्सरचे संभाव्य कारण आहे. याशिवाय आधुनिक  वैद्यकशास्त्रानुसार ५५ वर्षांपुढील स्त्रियांस, ज्यांच्या कुटुंबात स्तन, स्त्रीबीजाण्ड व गुद- आतडय़ाच्या कॅन्सरची आनुवंशिकता आहे, त्यातही एकापेक्षा अधिक रक्ताच्या नातेवाईकांना स्तनांच्या कॅन्सरचा इतिहास आहे किंवा रक्ताच्या नातेवाईकांच्या ब्रॅका १ व २ या जनुकांत म्युटेशन म्हणजे बदल झालेला आढळले आहे अशांमध्ये स्तनाच्या कॅन्सरची संभावना अधिक असते. याशिवाय रजप्रवृत्ती लवकर सुरू होणे व रजोनिवृत्ती  उशिरा होणे, हार्मोनल चिकित्सा दीर्घकाळ घेणे, अपत्य नसणे, आधीच  एका स्तनाचा कॅन्सर असणे, दुसऱ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी ऊरप्रदेशी रेडिएशन घेणे, मद्यपान, स्थौल्य हीसुद्धा स्तनाच्या कॅन्सरची संभाव्य कारणे आहेत.
स्तनांच्या कॅन्सरमध्ये स्तनांच्या ठिकाणी बहुतांशी न दुखणारी, स्पर्शाला  खडबडीत/ वेडीवाकडी, कठीण गाठ जाणवणे, स्तनाच्या त्वचेचा रंग  बदलणे, स्तनचुचूकांतून स्राव येणे, स्तनचुचूक आत ओढली जाणे, काखेत- मानेवर गाठ येणे, ताप, अशक्तपणा, वजन कमी होणे तसेच काही वेळा कॅन्सरचा दुसऱ्या अवयवांत प्रादुर्भाव झाल्यास त्या अवयवांची लक्षणे दिसतात. गाठीची एफ. एन. ए. सी., बायॉफ्सी, मॅमोग्राफी, सी.टी. स्कॅन,  टय़ूमर मार्कर यांसारख्या तपासण्यांच्या साहाय्याने स्तनाच्या कॅन्सरचे निदान निश्चित केले जाते. कॅन्सरच्या यशस्वी चिकित्सेत जसा आधुनिक वैद्यक चिकित्सा व आयुर्वेदीय चिकित्सा यांचा समन्वय महत्त्वपूर्ण आहे  तसेच स्तनांच्या कॅन्सरचे लवकर म्हणजे प्राथमिक अवस्थेत निदान होणे आवश्यक असते. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार लवकर निदान झाल्यास स्तनाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये १६% ने मृत्यूचे प्रमाण कमी होते. स्तनांच्या कॅन्सरचे लवकर निदान करण्यासाठी स्त्रियांनी नियमितपणे तज्ज्ञ  डॉक्टरांकडून स्तनपरीक्षण करून घेणे आवश्यक आहे. तसेच स्तनांमध्ये किंवा काखेत गाठ जाणवणे, स्तनचुचूकामधून (ठ्रस्र्स्र्’ी) स्राव होणे,  स्तनावरील काही भाग लालसर होणे अशी लक्षणे दिसल्यास लगेचच  स्त्रीरोगतज्ज्ञांचा तसेच कॅन्सरतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 6:25 am

Web Title: cancer and ayurveda ovarian cancer
टॅग : Cancer 2,Health It
Next Stories
1 लहान मुलांमधील चंचलता
2 तरतरी.. टाळलेलीच बरी!
3 स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर (ओव्हॅरियन कॅन्सर)
Just Now!
X