पन्नास जणांच्या एकत्र कुटुंबातील सासुरवाशीण असलेल्या सुनीताताई सतत कुटुंबातील प्रत्येकाचा जामानिमा राखण्यात इतक्या व्यग्र होत्या की स्वत:च्या खाण्यापिण्याच्या व झोपण्याच्या वेळा पाळणे ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने गौणच होती. त्यातच मुळातील पित्तप्रकृती, जुना आम्लपित्ताचा विकार, चमचमीत पदार्थ सेवन करण्याची आवड, शिळे पदार्थ टाकून न देता संपविण्याची भारतीय स्त्रीची मानसिकता व उतारवयात पतीच्या अर्धागवायूच्या त्रासदायक आजारपणाची चिंता या सर्व गोष्टींचा शरीरावर विपरीत परिणाम झाला व २००९ मध्ये सुनीताताईंना उलटय़ा, तिळाच्या पेंडीच्या रंगाची मलप्रवृत्ती, लाल रंगाची मूत्रप्रवृत्ती अशी काविळीची लक्षणे दिसू लागली. आठवडा उलटला तरी कावीळ आटोक्यात येईना म्हणून सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन केले असता पित्ताशयाच्या कॅन्सरचे (गॉलब्लॅडर कॅन्सर- कोलँजियोकार्सनिोमा) निदान झाले. चौथ्या स्टेजमधील हा कॅन्सर यकृतात व िलफ नोड्समध्ये पसरला असल्याने कॅन्सरतज्ज्ञांनी शस्त्रकर्माऐवजी केमोथेरपी व रेडिओथेरपी या चिकित्सापद्धतींचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन केमोथेरपीनंतर ताप, पोटदुखी, अशक्तपणा, अन्नाची इच्छा नाहीशी होणे असे केमोथेरपीचे दुष्परिणाम तीव्रतेने जाणवू लागल्याने सुनीताताईंनी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली व नियमितपणे गेली चार वष्रे शमन चिकित्सा व पथ्यापथ्याचे पालन केले. अतिशय गृहकृत्यदक्ष असलेल्या सुनीताताई आता पूर्वीप्रमाणे आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सशक्तपणे पार पाडत आहेत.
ल्ल पित्ताशय हा शब्दच या अवयवाचे कार्य स्पष्ट करतो. अन्नाचे विशेषत: स्निग्ध आहारीय पदार्थाचे पचन करणाऱ्या यकृतातील पाचक पित्ताची साठवण पित्ताशयात म्हणजे गॉलब्लॅडर या अवयवात केली जाते. अन्न जठरातून लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात गेल्यावर पित्ताशयातील पित्त तेथे पाझरते व अन्नाचे पचन करते. आयुर्वेद शास्त्राने पित्ताचे पाच प्रकार सांगितले असून त्यापकी प्रधान असलेले पाचक पित्त आपल्या उष्ण, तीक्ष्ण गुणांनी अन्नपचनाचे प्रमुख कार्य करते. अशा अग्निगुणाच्या पित्ताचे धारण करणारे पित्ताशय म्हणजे जणू निद्रिस्त ज्वालामुखीच! त्यामुळे पित्तं जामातरं इव मधुरै: शीतल: जयेत्। म्हणजे जावयाप्रमाणे मधुर व शीतल पदार्थानी व उपचारांनी पित्ताची व पित्ताशयाची बडदास्त ठेवावी, असे उद्बोधक चिकित्सासूत्र आयुर्वेदिय संहिताकारांनी लिहून ठेवले आहे.
ल्ल कारणे: हिरवी मिरची, ठेचा, गरम मसाला अधिक प्रमाणात घालून तयार केलेले अतितिखट पदार्थ, चिंच, आंबट फळे, कैरी व िलबाचे लोणचे असे अतिशय आंबट पदार्थ, मिठाचा आहारात अधिक वापर, अतिप्रमाणात चहा-कॉफीसारखी उष्ण पेय यांचे दीर्घकाळ सेवन करणे, उपवास-जागरण यांचा अतिरेक, अतिचिंता, संताप, धूम्रपान, मद्यपान अशा अयोग्य आहार-विहार व व्यसनांमुळे पित्ताशयाचा दीर्घकाळ क्षोभ होणे (इन्फ्लमेशन) हे पित्ताशयाच्या कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे.
ल्ल बऱ्याचदा हा आजार बळावल्यावरच त्याची लक्षणे दिसू लागतात. उजव्या कुशीत दुखणे, भूक अतिशय मंदावणे, पित्ताच्या आंबट-कडू चव असलेल्या उलटय़ा होणे, पोट फुगणे, त्वचेचा- डोळ्यांचा- जिभेचा रंग पिवळा होणे, त्वचेला खाज सुटणे, मूत्राचा रंग लालभडक होणे व मलप्रवृत्ती तिळाच्या पेंडीप्रमाणे पांढऱ्या रंगाची होणे अशी काविळीची लक्षणे पित्ताशयाच्या कॅन्सरमध्ये दिसतात. काही वेळा ताप येणे, वजन घटणे, मलप्रवृत्ती काळ्या रंगाची होणे ही लक्षणेही दिसतात.
ल्ल उपचार: पित्ताशयाच्या कॅन्सरचे निदान झाल्यास आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार शस्त्रकर्म, केमोथेरपी व रेडिओथेरपीची यापकी त्या त्या अवस्थेत योग्य त्या चिकित्सा केल्या जातात. मात्र या चिकित्सापद्धतींचा अवलंब करूनही अनेक रुग्णांत कॅन्सरचा पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. तसेच हा आजारच पित्ताच्या विकृतीमुळे होत असल्याने व केमोथेरपी व रेडिओथेरपीचे दुष्परिणाम पित्तदोषावर आधिक्याने होत असल्याने या काळात पित्तशमन करणारी आयुर्वेदिक चिकित्सा निश्चितच लाभदायी ठरते. यात कामदुधा रस, मौक्तिक भस्म, प्रवाळपिष्टी, अनंतमूळ, द्राक्षघृत, दाडिमावलेह अशा पित्तशामक शीत औषधांचा लाभ होतो. काळ्या मनुका, आरग्वध (बाहव्याचा मगज) यांसारख्या मधुर रसाच्या द्रव्यांनी मृदू विरेचन व रक्तमोक्षण या पंचकर्म चिकित्सेचाही दुष्ट पित्ताचे निर्हरण करण्यासाठी लाभ होतो. आमलकी (आवळा), कुमारी (कोरफड), कुष्मांडावलेह (कोहळ्याचा पाक) यांसारख्या रसायन औषधांचा उपयोग व्याधीची अपुनरुद्भव चिकित्सा म्हणून होतो. गाईचे दूध-तूप-लोणी, गोड ताक, साठेसाळीचा भात, तांदळाचे घावन, मुगाचे वरण- खिचडी, तूप- जिऱ्याची फोडणी दिलेल्या दुधी-पडवळ-भेंडी-सुरण-तांदुळजा या भाज्या, आवळा-डािळब- गोड द्राक्ष, अंजीर ही ताजी फळे; मोरावळा, गुलकंद, साखरांबा, दुधी हलवा, मुगाचे – रव्याचे व राजगिऱ्याचे लाडू, साळीच्या लाह्य़ा, खडीसाखर असा सात्त्विक आहार; शरीरास सोसवेल एवढा मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम; प्राणायाम-शवासन अशी मन:शांतीस उपयुक्त योगासने; नित्य व्यवहारांतून थोडासा वेळ काढून भारतीय संगीत तसेच नेत्रास व मनास प्रफुल्लित करणारा निसर्ग सहवास यांचा आस्वाद घेणे व मनाच्या शुचितेसाठी सुविचारांचीच कास धरणे या पथ्यकर आहार-विहारांचे पालन निश्चितच लाभदायक ठरते.

 

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना