‘बद्घकोष्ठ’ हा शब्द ऐकला तरी अनेकांना कसेसेच होऊ लागते! प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी या ‘बिकट’ समस्येचा अनुभव घेतलेला असतो. आता तर असंतुलित आहार, खाण्याच्या अनियमित किंवा चुकीच्या वेळा, व्यायामाचा अभाव, पुरेशी झोप न घेणे या सर्व गोष्टी जीवनशैलीचा भागच बनून गेल्या आहेत. या सर्व गोष्टींचा शरीरावर अगदी सर्रास दिसून येणारा एक परिणाम म्हणजे बद्धकोष्ठ.
बद्धकोष्ठ म्हणजे काय?
बद्धकोष्ठाची ठराविक अशी व्याख्या नाही. परंतु रोज समाधानकारक शौचास न होणे, मल अतिशय कडक असणे व तो बाहेर पडण्याकरिता जोर द्यावा लागणे, दोन-तीन दिवसांतून एखाद्या वेळेसच शौचास होणे, या सर्व लक्षणांना बद्धकोष्ठ किंवा मलावष्टंभ असे म्हटले जाते. पोट स्वच्छ न झाल्यामुळे व्यक्तीला सतत अस्वस्थता जाणवते. आतडय़ांमध्ये मळ साठून राहिल्यामुळे गॅसेसही होतात. अशा वेळी खाण्याची इच्छा होत नाही. तसेच संडासला कडक होण्याच्या भीतीने खाणे कमी केले जाते, त्यामुळे कालांतराने अशक्तपणाही येऊ शकतो.

तक्रारींना सुरुवात कशी होते?
बद्धकोष्ठाचे महत्त्वाचे कारण म्हणजे पचन नीट न होणे. खरेतर अन्नसेवन केल्यानंतर लगेचच तोंडात त्याच्या पचनाची प्रक्रिया सुरू होत असते. अन्नातील पिष्टमय पदार्थाचे पचन येथे सुरू होते. अन्नाच्या पचनासाठी तोंडात तयार होणाऱ्या लाळेत अन्न नीट मिसळले जाणे आणि त्यासाठी ते चांगले चावून खाल्ले जाणे आवश्यक आहे. अन्न पोटात गेल्यावर त्यातील प्रथिनांचे विघटन होते. स्निग्ध पदार्थाचे म्हणजे तेल, तूपसदृश पदार्थाचे विघटन मात्र लहान आतडय़ाच्या सुरुवातीच्या भागात होते. अन्नाचे पूर्ण विघटन झाल्याखेरीज अन्नाच्या शोषणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. विघटन आणि शोषण या दोन्ही प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्या की अन्नाचे पचन योग्य रीतीने झाले, असे आपण म्हणतो. पचनक्रिया बिघडली की अन्नाचे शोषण नीट होत नाही, त्यामुळे अन्नाचा टाकाऊ भाग वेळेवर तयार होत नाही. म्हणजेच मल तयार होऊन पुढे सरकण्याच्या प्रक्रियेस वेळ लागतो. अन्न पोटात फार काळ एकाच ठिकाणी पडून राहिले की त्यात फसफसण्याची प्रक्रिया होऊन वायूची निर्मिती होते. परिणामी पोट सतत गच्च भरल्यासारखे वाटते. ही क्रिया म्हणजे बद्धकोष्ठ. काही वेळा काही औषधांच्या दुष्परिणामांमुळेही बद्धकोष्ठाची समस्या उद्भवू शकते.  

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

टाळण्यासाठी काय करावे?
व्यायाम
पोटाचे आणि पोटातील अवयवांचे स्नायू बलवान होण्यासाठी काही विशिष्ट व्यायामप्रकार आहेत. योगासनांमधील समोर वाकून करण्याचे काही व्यायाम यात विशेष उपयुक्त ठरतात. कपालभाती आणि दीर्घ श्वसन यांचाही पोटातील स्नायूंवर योग्य तो परिणाम होऊन पचनसंस्था बळकट होण्यास मदत होते. पोटाच्या घेराचे स्नायू शिथिल असल्यास त्यासाठी पोटाचा घेर कमी करण्याचे व्यायाम करावेत. हे स्नायू मलनिस्सारणाच्या प्रक्रियेत आतून दाब निर्माण करण्याचे कार्य करत असल्यामुळे ते बळकट असणे आवश्यक आहे. मात्र हे सर्व व्यायाम प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार तज्ज्ञांकडून शिकून घेणे आवश्यक आहे.
अन्नात तंतुमय पदार्थ असणे महत्त्वाचे
अन्नातील तंतुमय पदार्थ आतडय़ांची गती वाढवतात आणि पचनाअंती तयार होणाऱ्या मलाला पुढे सरकण्यासाठी मदत करतात. हे तंतू मलात मिसळले जाऊन मलाला भरीवपणा देतात. तसेच या तंतूमध्ये पाणी धरून ठेवण्याचे गुणधर्म असल्यामुळे ते मल कडक होऊ देत नाहीत. परिणामी, बद्धकोष्ठाचा त्रास कमी होतो. त्यामुळे अन्नात तंतुमय पदार्थ पुरेशा प्रमाणात असणे खूप आवश्यक आहे.
आहार
* आहार संतुलित असणे फार महत्त्वाचे आहे. भात, वरण, पोळी, भाजी, चटणी, कोशिंबीर हा पूर्वापार चालत आलेला मेन्यू अगदी उत्तम. रोजच्या स्वयंपाकात हे सर्व पदार्थ घेणे शक्य नसले, तर एकदल आणि द्विदल धान्ये एकत्र करून त्यात भाज्या घालून पदार्थ बनवावेत. असे पदार्थ आहारात असतील तरी फायदा होतो.
* भाज्या, कंदमुळे, कोंडायुक्त धान्ये यांचे प्रमाण आहारात भरपूर असावे. यातून तंतुमय पदार्थ मिळतात.
* कच्च्या कोशिंबिरी किंवा सॅलेडही जेवणात आवर्जून घ्यावे.
* लहान मुलांना भाज्यांचे सूप करून द्यावे.
* रोज एकतरी फळ जरूर खावे. फळांमधून तंतुमय पदार्थ तर मिळतातच, जोडीला ऊर्जा मिळते आणि पोटही भरते.
* जेवणात ताक प्यावे. आपल्या आतडय़ात असणाऱ्या उपकारक जिवाणूंसाठी ते हितकारक असते.
* जमेल तेव्हा शेंगदाणे, चणे, डाळिंब, चिकू, साजूक तूप, सीताफळ, बीट, पालक, भेंडी, गाजर इत्यादींचा आहारात समावेश करावा.