इन्शुलीन कुठे घेणं चांगलं?
साधारणत: इन्शुलीन दंडावर, मांडीवर अथवा पोटावर देतात. ते स्नायूंमध्ये दिलं जात नाही. त्वचेच्या खाली दिलं जातं. यासाठी पोटाचा भाग सगळ्यात चांगला. एकतर स्वत:चं स्वत:ला घेत येतं आणि पोटावर मज्जारज्जू कमी असल्यानं फारसं दुखतही नाही. तिथं जागाही अधिक असल्यानं एकाच जागी पुन्हा पुन्हा टोचण्याची गरज नाही. एकाच जागी पुन्हा पुन्हा इंजेक्शन घेतल्यानं त्या जागेची चरबी झडण्याचा किंवा त्या जागेला कायमची सूज येण्याचा (हायपरट्रॉफी) धोका असतो. अशा जागी इंजेक्शन दिल्यास ते नीट शोषलं जात नाही. डोस कमी पडतो. म्हणून इंजेक्शनची जागा सतत बदलती ठेवावी.
इन्शुलीन फ्रिजमध्येच ठेवावं लागतं का?
इन्शुलीनवर थेट सूर्यप्रकाश पडला तर ते कुचकामी होतं. पण सामान्य तापमानाला ते थंड ठिकाणी, आचेपासून दूर ठेवलं तर ते फ्रिजविना महिनाभर टिकू शकतं. आता इन्शुलीनची पेनं मिळतात. ती अधिक काळ सामान्य तापमानाला टिकतात. प्रवासात असताना, विशेषत: गाडीनं जाताना ते गरम होणार नाही याची काळजी घ्या. एकच गोष्ट लक्षात असू  द्या. इन्शुलीनच्या बाटलीत तुम्हाला कण दिसले तर ती बाटली फेकून द्या.

मधुमेह आणि इन्शुलीन यांचं नातं काय आहे
शरीरात दोन यंत्रणा काम करतात. आपण जेवतो तेव्हा बाहेरून येणाऱ्या ग्लुकोजला हाताळणारा हार्मोन म्हणजे इन्श्युलीन. आपण दिवसातून दोनदा जेवतो. दोन वेळा नाश्ता करतो. पण शरीराला चोवीस तास ऊर्जा लागते. यासाठी ग्लुकोजचं पद्धतशीर नियोजन करण्याचं काम इन्श्युलीनकडे असतं. त्यामुळं कोणीही इन्श्युलीनशिवाय जगूच शकत नाही. इन्श्युलीन बाहेरून आलेल्या ग्लुकोजची यकृतात, स्नायूंमध्ये साठवण करतं. त्याचा ऊर्जेसाठी जास्तीत जास्त उपयोग करायला पेशींना उद्युक्त करतं. तरीही ग्लुकोज शिल्लक राहिलं तर त्याचं चरबीच्या कणांमध्ये रूपांतर करतं. मधुमेहाबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा शरीर आवश्यकतेनुसार इन्श्युलीन बनवू शकत नाही किंवा शरीरानं बनवलेलं इन्शुलीन कुचकामी निघतं तेव्हा मधुमेह होतो.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
Pillow and sleeping
Pillow and sleeping : झोपताना पायामध्ये उशी ठेवल्यास महिलांना आरोग्यासाठी मिळतील ‘हे’ फायदे
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Jugaad Video: एक्सपायर औषध गोळ्यांचा स्वयंपाकघरातील ‘या’ कामासाठी वापर करुन पाहा; २ मिनिटांतच चकीत करणारा परिणाम

डॉक्टर इन्शुलीन कधी सुरू करतात?
असं काही गणित वगरे नाही. गरज हाच एकमेव निकष आहे. ज्यांना टाइप वन मधुमेह आहे त्यांच्यात इन्शुलीन बनवणाऱ्या पेशी शिल्लकच राहत नाहीत. त्यांना आयुष्यभर इन्शुलीन घेण्यावाचून पर्याय नसतो. तीच गोष्ट गरोदरपणातल्या मधुमेहाची. तोंडी घ्यायची इतर औषधं गर्भावर परिणाम करत असल्यानं तिथंही इन्शुलीन हाच उपचाराचा पाया असतो. रुग्ण तोंडी औषध घेऊ शकत नसेल तरी इन्शुलीन देतात. क्षयरोग किंवा दुसरे एखादे इन्फेक्शन झाल्यासही इन्शुलीन वापरतात. उपचार करणारे डॉक्टर याबाबतचा निर्णय घेतात.
पुरेशी तोंडी औषधं दिल्यावरही मधुमेह आटोक्यात येत नसेल अथवा तोंडी औषधं देण्यानं पेशंटचं काही नुकसान होण्याची भीती असल्यास इन्शुलीन वापरणं अपरिहार्य ठरतं.

एकदा इन्शुलीन घ्यायला सुरुवात केल्यावर ते आयुष्यभर घ्यावं लागतं का?
इन्शुलीनबद्दल समाजात जे गरसमज आहेत त्यात हा सगळ्यात मोठा आणि पूर्णत: चुकीचा समज म्हणता येईल. आताच मी गरोदरपणा किंवा इन्फेक्शनचा उल्लेख केला. या काही आयुष्यभर चालणारया गोष्टी नव्हेत. अतिदक्षता विभागत तर दोन चार दिवसांसाठीदेखील ते दिलं जातं. परंतु अनेकदा लोकांच्या असहकारामुळे ते आयुष्यभर घेण्याची पाळी येते. होतं काय की त्यांच्या इन्शुलीन बनवणाऱ्या बीटा पेशी थकलेल्या असतात. पुन्हा जोमानं कामाला लागण्यासाठी त्यांना अल्प विश्रांतीची गरज असते.
बाहेरून इन्श्युलीन देऊन डॉक्टर ही गरज पूर्ण करतात. पण डॉक्टर मंडळीनी असं काही सुचवलं तर रुग्ण त्याला ठाम नकार देतात. त्यांना एक साधा विचार समजत नाही की घोडा जर खूप थकला तर तुम्ही त्याला कितीही चाबूक मारा तो ढिम्म जागचा हलणार नाही. त्याला विश्रांती द्या पाहा पुन: जोरात धावतो की नाही. जास्त कामानं शिणलेल्या बीटा पेशींना विश्रांती देण्यापुरता वेळ तरी बाहेरून इन्शुलीन द्यावं. अन्यथा बीटा पेशी पूर्णच थकतात आणि त्यानंतर आयुष्यभर इन्शुलीन घेत बसावं लागतं.

इन्शुलीनच्या गोळ्या नाहीत का? ते टोचूनच घ्यावं लागतं का?
या घडीला तरी इंजेक्शनशिवाय अन्य मार्गानं इन्शुलीन देता येत नाही. इन्शुलीन हेदेखील एक प्रथिन आहे. अन्य प्रथिनांप्रमाणे आपले पाचक रस इन्शुलीनदेखील पचवून टाकतात. त्यामुळं ते तोंडावाटे देऊन फायदा नाही. शास्त्रज्ञ श्वासावाटे किंवा स्प्रेच्या माध्यमातून देण्याचा जोरदार प्रयत्न करताहेत. या प्रयत्नांना अजून यश मिळालेलं नाही. अर्थात अनेक रुग्णांना इंजेक्शनचीच भीती वाटते. पण आजकाल त्या भीतीलाही फारसा अर्थ उरलेला नाही. कारण आजच्या घडीला ज्या सुया उपलब्ध आहेत त्या इतक्या छोटय़ा आणि बारीक आहेत की त्या टोचल्याचं कळतही नाही.

इन्शुलीन कधी घ्यायचं? जेवणाआधी की जेवणानंतर?
ते कोणतं इन्शुलीन सुरू आहे यावर अवलंबून आहे. याचा अर्थ इन्शुलीन वेगवेगळ्या प्रकारचं आहे असा नाही. औषधी कंपन्यांनी इन्शुलीनच्या रेणूवर प्रयोग करून त्याची काम करण्याची वेळमर्यादा कमी-अधिक केलेली आहे. शरीरात नसíगकरीत्या तयार होणाऱ्या इन्शुलीनशी बाहेरून दिलेल्या इन्शुलीनची कालमर्यादा जुळावी म्हणून असं करणं आवश्यक ठरतं. त्यामुळं बरीचशी इंश्युलीन्स जेवणापूर्वी ठरावीक काळ घ्यावी लागतात. चोवीस तास काम करणारी इन्श्युलीन जेवणापूर्वी घेण्याची गरज राहत नाही. दिवसातून कधीही पण ठरावीक वेळीच ते घ्यावं लागतं.