08 March 2021

News Flash

आयुर्वेद मात्रा : कफामुळे येणारा ताप (ज्वर)

हिवाळा ते उन्हाळा या स्थित्यंतराच्या काळात शरीरात कफाची वाढ होते. त्याचा अग्निवर (पचनावर) विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तापाची (ज्वराची) निर्मिती होते.

| February 21, 2015 02:07 am

असे का होते?
हिवाळा ते उन्हाळा या स्थित्यंतराच्या काळात शरीरात कफाची वाढ होते. त्याचा अग्निवर (पचनावर) विपरीत परिणाम होतो. त्यामुळे तापाची (ज्वराची) निर्मिती होते.
उपाय काय?
तुळस आणि पारिजातकाच्या झाडाची प्रत्येकी दोन पाने आणि अर्धा चमचा खडीसाखर एक कप पाण्यात टाका. हे पाणी अर्धा कप होईपर्यंत उकळा. हे पाणी ताप असेपर्यंत रात्री झोपण्यापूर्वी प्या.
यामुळे काय होते?
तुळस ही कफ, ताप आणि संसर्ग कमी करणारी आहे. पारिजातकामुळे ज्वर कमी होतो. शरीराला घाम येतो. या उपायामुळे कफ कमी होतो आणि तापही उतरतो.
इतर काय काळजी घ्यावी?
दही, केळी, काकडी अशा कफ वाढवणाऱ्या गोष्टी खाणे टाळा. नेहमीच्या पाण्याऐवजी गरम पाणी प्या.
वैद्य सदानंद सरदेशमुख

‘अ‍ॅप’ले आरोग्य : वॉटर युवर बॉडी
hlt04आपण जर दिवसभरात शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यायलो नाही तर अनेकदा आजारांना सामोरे जावे लागते. पण कार्यालयात कामाच्या गडबडीत पाणी प्यायचे राहते आणि अचानक दोन ते तीन तासांनी आपण पाणीच प्यायलो नाही, अशी जाणीव होते आणि आपण भरपूर पाणी पितो. पण निरोगी आरोग्यासाठी वेळोवेळी आणि पुरेसे पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला ‘वॉटर युवर बॉडी’ हे अ‍ॅप मदत करू शकते. हे अ‍ॅप आपल्याला आपण दिवसभरात किती पाणी पिणे आवश्यक आहे तसेच ते कोणत्यावेळी पिणे आवश्यक आहे याचा तपशील सांगते, तसेच आपल्याला वेळोवेळी पाणी पिण्याची आठवणही करून देते. यासाठी तुम्हाला या अ‍ॅपमध्ये तुमचे वजन आणि सध्या दिवसभरात किती पाणी पितो याची माहिती टाकणे आवश्यक आहे. ही माहिती टाकल्यावर तुम्ही दिवसभरात किती कप पाणी प्यावे याचा तपशील अ‍ॅप आपल्याला सांगते. यानंतर आपण एक कप पाणी प्यायलो की अ‍ॅपमध्ये एक कप अ‍ॅड करायचा यानंतर परत पाणी कधी प्यायचे याची आठवण हे अ‍ॅप आपल्याला करून देते.

आयुर्विचार

तुमच्या आरोग्याचा पुरेपूर उपयोग करा. आरोग्याला बाधा होईल इतपत. कारण हे आरोग्य त्यासाठीच आहे. आयुष्यातील प्रत्येक वेळ आनंदात व मजेत घालवा. त्याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. मृत्यूच्या वेळेपूर्वी मरू नका. कारण मृत्यूनंतर आयुष्य नाही.
– जॉर्ज बनार्ड शॉ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 2:07 am

Web Title: fever due to cough
टॅग : Health It
Next Stories
1 ‘ताप’दायक!
2 मनोमनी – ऑटिझम
3 आकडीवर उपचार शक्य!
Just Now!
X