News Flash

आयुर्वेद मात्रा : जेवण न जाणे (अरूची)

आयुर्वेदानुसार, ऋतुबदलामुळे पचनशक्ती कमी होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. न पचलेल्या आहाराच्या रसामुळे जेवण जात नाही.

| April 18, 2015 01:12 am

–    असे का होते?
–    आयुर्वेदानुसार, ऋतुबदलामुळे पचनशक्ती कमी होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. न पचलेल्या आहाराच्या रसामुळे जेवण जात नाही.
–    उपाय काय?
–    ’सकाळी रिकाम्या पोटी सुंठ व मिरे यांचे चूर्ण घ्यावे.
–    ’दुपारी व रात्री जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा व सैंधव मीठ चघळून खावे.
–    ’जेवणानंतर गोड व ताजे ताक प्यावे. त्यात जिरे व मिरे पूड टाकावे. रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
–    ’आले, लसूण, पुदिना यांची चटणी खावी.
–    यामुळे काय होते?
–    पचनशक्ती सुधारते
–    इतर काळजी काय घ्यावी?
–    ’शक्यतो लंघन (न जेवणे) करावे.
–    ’हलके व उकडलेले पदार्थ खावेत / तळलेले पदार्थ टाळावेत.
–    ’फिरणे व व्यायाम सुरू ठेवावा.
वैद्य सदानंद सरदेशमुख

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:12 am

Web Title: food digestive problems
टॅग : Health It
Next Stories
1 विचारी मना! : यंदा कर्तव्य आहे; पण..!
2 उन्हाळा आणि लघवीचा त्रास!
3 चष्मेबद्दूर!
Just Now!
X