थायरोइड म्हणजेच गलग्रंथीचे आपल्या शरीरात अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानेच्या पुढील भागात फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते, हीच गलग्रंथी. मानवी शरीरात चयापचयाचे कार्य नियमित करण्याचे महत्त्वाचे कार्य या गलग्रंथी करतात. या ग्रंथीतून स्रावत असलेल्या थायारोक्झीन या संप्रेरकामुळे (हार्मोन्स) शरीरातील विविध क्रियांना प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे कार्य होत असते. मात्र गलग्रंथीच्या विकारांमुळे या क्रियेमध्ये आणि या संरचनेत बिघाड होतो, त्यामुळेच गलग्रंथींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गलग्रंथीच्या विकाराचे हायपोथायरोइडिझम आणि

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
pashmina, Ladakh
लडाखची पश्मिना संकटात का सापडली आहे? सरकार तिला वाचवेल का?
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

हायपर थायरोइडिझम असे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत. मानवी मेंदूमध्ये हायपोथॅलमस नावाचा अवयवच असतो, तो थायरोट्रोपीन रिलिजिंग हार्मोन निर्माण करते. हायपोथॅलमस हा अवयव मेंदूमधील पिटय़ूटरी ग्रंथींवर नियंत्रण ठेवतो. या ग्रंथींमधून थायरोइड स्टिमुलटिंग हार्मोन तयार होत असतो. हे हार्मोन्स गलग्रंथीद्वारे स्रावत असतात. हे हार्मोन्स जर कमी प्रमाणात

स्रावत असतील, तर हायपोथायरोइडिझम हा विकार होऊ

शकतो.

गलग्रंथी, हायपोथॅलमस आणि पिटय़ूटरी ग्रंथी यांमध्ये बिघाड झाल्यास हा विकार होतो. या विकाराची लक्षणे खालीलप्रमाणे..

हायपोथायरोइडिझम

> थकवा, अंग जड होणे

> एकाग्रता कमी होणे

> कोरडी त्वचा

> बद्धकोष्ठता

> थंडी वाजणे

> घाम न येणे

>  स्नायू आणि सांधेदुखी

>  मानसिक नैराश्य

> मासिक पाळीवेळी अधिक रक्तस्राव

(घशाला किंवा गलग्रंथी ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी दाह होत असेल, तर ते हायपोथायरोइडिझमचे सर्वसामान्य कारण असते.)

 

हायपर थायरोइडिझम

हायपर थायरोइडिझम म्हणजे थायरोइड हार्मोन्सचे प्रमाण वाढणे. हा विकार चयापचय क्रियेशी निगडित असतो. सर्वसामान्यपणे या विकाराचे प्रमाण कमी आढळते. या विकाराची लक्षणे खालीलप्रमाणे-

> हाता-पायांचा थरकाप होणे

>  उदासीनता

>  थकवा

> हृदयाच्या ठोक्यात वाढ

>  उष्णता सहन न होणे

> घामाचे प्रमाण वाढणे

>  एकाग्र न होणे

> वजन कमी होणे

हायपर थायरोइडिझम या विकाराची सर्वसाधारण कारणे पुढीलप्रमाणे..

> ग्रेव्ज डिजिस (डोळे मोठे होणे )

>  टॉक्सिस मल्टिनोडय़ुलर गॉइटर (गलगंड)

> थायरोइड नोडय़ूल्स (थायरोइड संप्रेरकाच्या अतिरिक्त प्रमाणामुळे  थायरोइडवर गाठी येतात.)

>  आयोडिनचा अतिरिक्त वापर

 

गलग्रंथीचे अन्य विकार

गलगंड – हा गलग्रंथीचा एक विकार आहे. गलगंड म्हणजे गलग्रंथीचा आकार मोठा होणे, असे त्याचे सर्वसाधारण वर्णन करता येईल. या विकारात गळय़ाभोवती मोठा गोळा येतो. गलगंड हा हायपोथायरोइडिझम, हायपर थायरोइडिझम यांच्याशी संबंधित विकार आहे.

थायरोइड नोडय़ूल्स (गलग्रंथीला गाठ) – या प्रकारात गलग्रंथीला गाठ येते. गलग्रंथीला न पसरणारी लहान गाठ येते किंवा न पसरणारा टय़ूमर असतो, तेव्हा समजावे हा विकार झाला आहे. यामुळे गलग्रंथीचा कर्करोग होण्याचीही भीती असते. गाठ जर एक किंवा अनेक असतील किंवा गाठीचा आकार मोठा असेल, तर ते कर्करोगाचेच लक्षण आहे.

गलग्रंथीचा कर्करोग – गलग्रंथीचा कर्करोग हा पुरुष आणि तरुणांपेक्षा प्रौढ महिलेला अधिक प्रमाणात होतो. ५५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये गलग्रंथीचे विकार आढळत असतील, तर त्यापैकी ६६ टक्के जणांना कर्करोग झाल्याचे आढळले आहे. या कर्करोगाचे विविध प्रकार आहेत.

 

 

 

 

गलग्रंथीच्या विकाराचे निदान कसे होते?

>   गलग्रंथीच्या विकाराचे निदान करण्यासाठी विविध तपासण्या कराव्या लागतात. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासण्या आणि काही विशिष्टपूर्ण चाचण्या केल्या जातात. त्यानंतर विकाराचे निदान होते.

>    सर्वप्रथम रक्तचाचणी केली जाते. त्यामुळे थायरोइड संप्रेरक व थायरोइड स्टिमुलेटिंग हार्मोन यांची पातळी किती आहे हे समजते.

>     गलग्रंथीला गाठ आहे की नाही किंवा त्याचा विस्तार किती मोठा आहे, हे पाहण्यासाठी इमेजिंग टेस्ट केली जाते.

>     ग्रलग्रंथीच्या गाठीसंदर्भात माहिती मिळविण्यासाठी किरणोत्सारी आयोडीनचा वापर करून थायरोइड स्कॅन ही तपासणी केली जाते.

>     नीडल अ‍ॅस्प्रायरेशन आणि बायोपासी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गलग्रंथींमधील काही पेशी बाहेर काढता येतात. या पेशींद्वारे विकाराचे निदान होऊ शकते. मात्र हे परीक्षण करणारा पॅथोलॉजिस्ट हा या प्रकारातील तज्ज्ञ असणे आवश्यक आहे.

औषधोपचार

गलग्रंथीचे विकार औषधोपचाराने बरे होऊ शकतात. काही प्रकरणात शस्त्रक्रिया आणि विशेष उपचारांची गरज असते. हायपोथायरोइडिझम या विकारामध्ये थायरोड संप्रेरकाची पातळी कमी झालेली असते, ती वाढविण्यासाठी तोंडवाटे दिल्या जाणाऱ्या औषधांचा उपयोग केला जातो. जेव्हा हायपर थायरोइडिझम हा विकार असतो, त्यावेळी थायरोड संप्रेरकाचे निर्मिती कमी करण्यासाठी किंवा गलग्रंथीमधून उत्पादन रोखण्यासाठी औषधे दिली जातात. हायपर थायरोइडिझमच्या लक्षणांप्रमाणे इतर औषधोपचार केला जातो. उदा. हृदयाची ठोके वाढले असतील तर औषधोपचार करणे. औषधोपचाराने जर हायपर थायरोइडिझम नियंत्रणात येत नसेल, तर किरणोत्सर्गी शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेत आयोडीनचा वापर केला, ज्यामुळे गलग्रंथीमधील ऊती नष्ट केल्या जातात.

शस्त्रक्रिया – गलग्रंथीचा खराब झालेला भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते, तसेच जेव्हा कर्करोगाची शक्यता असते तेव्हाही शस्त्रक्रिया गरजेची बनते. जर ही ग्रंथी पूर्णपणे काढून टाकली तर रुग्णाला जन्मभर थायरॉइडचे कृत्रिम संप्रेरक घ्यावे लागते.

अग्निमांद्य (भूक मंदावणे/ मंद होणे)

असे का होते?

आयुर्वेदानुसार वर्षां ऋतू सुरू झाल्याने ग्रीष्म ऋतूत आधीच कमी झालेली पचनशक्ती आणखी कमी होते.

काय उपाय करावे?

’सुंठ किंवा काळे मिरे पूड १/४ चमचा तुपातून जेवण्यापूर्वी घ्यावे किंवा आल्याचा १/४ इंच तुकडा थोड्याशा संधव मिठाबरोबर जेवण्यापूर्वी घ्यावे. २ चमचे कोरफडीचा गर, मध १ चमचा व १/४ चमचा मिरे पूड वापरल्यास फायदा होतो.

याने काय होते?

’यकृताला चालना मिळून भूक लागते, पचन सुधारते.

इतर काय काळजी घ्यावी?

’पचण्यास जड पदार्थ जसे की मिठाई, तळलेले पदार्थ खाऊ नयेत.

’जेवणात आले, लसूण, जिरे यांचा नित्य वापर हवा.

काही सामान्य प्रश्न

प्रश्न – गलग्रंथीतील संप्रेरक अत्यधिक कार्यरत असण्याने (हायपर थायरोइडिझम) वजन वाढते का?

उत्तर –      जर या विकारावर औषधोपचार घेतला नाही तर साधारण २ ते ३ किलो वजन वाढते. ही वाढ शक्यतो ५ किलोच्या वर नसते. टीएसची पातळी कमी झाल्यावर वजन पूर्ववत होते.

प्रश्न – हायपर थायरॉयडिझमला चुकीची जीवनशैली कारणीभूत आहे का?

उत्तर –      नाही. याला जीवनशैली कारणीभूत नाही.

प्रश्न – हायपर थायरॉयडिझमला नैराश्य कारणीभूत आहे का?

उत्तर –      नैराश्य हे हायपर थायरोइडिझमचे एक पूर्वलक्षण आहे. त्यामुळे दीर्घ काळ नैराश्य असलेल्या व्यक्तींनी चाचणी करुन घ्यावी.

प्रश्न – गलग्रंथीचा विकार केवळ महिलांनाच होतो का?

उत्तर –      पुरुषांनाही तो होतो पण महिलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी हायरोइडचे महत्त्व आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी बाळंतपणाआधी तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

प्रश्न – गलग्रंथीचा विकार औषधोपचाराने बरा होतो का?

उत्तर –      नाही. तो बरा होत नाही पण नियंत्रणात ठेवता येतो.

प्रश्न – गलग्रंथीचा विकार कशामुळे होतो?

उत्तर –      भारतात अनेक वर्षे लोकांच्या आहारात आयोडिनयुक्त मीठ नसल्याने मोठय़ा प्रमाणात हा विकार होत असे. मात्र २० वर्षांपूर्वी आयोडिनयुक्त मिठाचा प्रसार वाढल्याने हे प्रमाण कमी झाले. मात्र आजही अनेक नागरिकांना आयोडिनयुक्त मीठ योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे हा विकार होत आहे. मात्र औषधोपचाराने त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवता येते आणि रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.