वयाच्या ६५व्या वर्षीही स्वयंपाकापासून नातवंडांची देखभाल करणे ही सर्वच कामे तत्परतेने करणाऱ्या वासंतीकाकू मार्च २००४ मध्ये अचानक घरात घसरून पडल्या व पाठीच्या मणक्याच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले. एक्स रे, एम.आर.आय. व बोन स्कॅनमध्ये मल्टिपल मायलोमा या आजारांची शंका आल्याने डॉक्टरांनी बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन, रक्तातील बीटा २ मायक्रोग्लोब्युलिन, मूत्रातील बेन्स जोन्स प्रोटीन या तपासण्या केल्या असता निदान निश्चित  झाले. रेडिएशन व केमोथेरॅपी चालू असतानाच काकूंनी आमच्या प्रकल्पात आयुर्वेदिक औषधे चालू केली व आजतागायत नियमितपणे औषधे, पंचकर्मातील बस्ती चिकित्सा व पथ्यकर आहारविहार यांचे पालन केले. गेली १० वष्रे संधिवातासारख्या वयानुरूप तक्रारीशिवाय वासंतीकाकूंना कॅन्सरचा त्रास नाही व दरवर्षी नित्यनेमाने करीत असलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट्सही मल्टिपल मायलोमा नियंत्रणात असल्याचे दर्शवत आहेत.
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार मल्टिपल मायलोमा हा हिमॅटॉलॉजिकल कॅन्सर म्हणजे रक्तवह स्त्रोतसाचा कॅन्सर असून यात बोन मॅरो म्हणजे अस्थींमधील मज्जेत असलेल्या प्लाझ्मा सेल्स विकृत अशा मॅलिग्नंट मायलोमा सेल्समध्ये परिवíतत होतात. आपल्या शरीराचा जंतुसंसर्गापासून व अन्य आजारांपासून बचाव करण्याचे कार्य ज्या इम्युनोग्लोब्युलिन या अँटिबॉडी करतात, त्यांची निर्मिती प्लाझ्मा सेल्समध्ये होते. त्यामुळे मल्टिपल मायलोमा या प्रकारच्या कॅन्सरमध्ये रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवरच घाला घातला जातो व रुग्णास विविध प्रकारचा जंतुसंसर्ग होण्याची संभावना निर्माण होते. प्राकृत रक्ताची निर्मिती बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जेमध्ये होत असल्याने या कॅन्सरमध्ये रक्तातील सर्वच प्रकारच्या पेशींची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. आर.बी.सी. म्हणजे लाल पेशींची निर्मिती घटल्यामुळे पांडू (अ‍ॅनिमिया), पांढऱ्या पेशींच्या अल्पतेमुळे जंतुसंसर्ग तर प्लेटलेट्सच्या  कमतरतेमुळे त्वचा, नाक, योनिमार्ग, गुदमार्ग ही बाह्य़रंध्रे व आभ्यंतर रंध्रे यातून रक्तप्रवृत्ती  होणे ही लक्षणे दिसतात. तसेच विकृत मायलोमा पेशी अस्थींमधील घन भागात मृदुता निर्माण करून अस्थी ठिसूळ करतात व आजार बळावल्यावर अस्थींच्या पोकळ्यांमध्ये अर्बुद निर्माण करतात.
उपरोक्त लक्षणांशिवाय भूक मंदावणे, अन्नसेवनाची इच्छा नसणे, उलटय़ा, तहान अधिक लागणे, दौर्बल्य, चित्त अस्थर्य, हाडांमध्ये वेदना, त्वचेवर रक्तवर्णी पीटिका, पुरुषांमध्ये नपुंसकता, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग, श्वासकृच््रछता व हातापायांच्या बोटांमध्ये संवेदना नष्ट होणे अशी लक्षणेही मल्टिपल मायलोमामध्ये दिसतात. अर्थात हीच लक्षणे अन्य आजारांमध्येही  दिसत असल्याने तपासण्यांच्या साहाय्याने या आजाराचे निदान निश्चित करणे आवश्यक!  मल्टिपल मायलोमाचे निदान रक्ताच्या हिमोग्राम, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन  टेस्ट, एल.डी.एच., अल्ब्युमिन, कॅल्शियम, बीटा २ मायक्रोग्लोब्युलिन, सीरम प्रोटीन इलेक्ट्रोफोरेसिस, सी रिअ‍ॅक्टिव्ह  प्रोटीन, आय.जी.जी.ए. व एम.; मूत्रातील प्रोटीन इलेक्ट्रोफोरेसिस, बेन्स जोन्स प्रोटीन या तपासण्या तसेच शरीरातील सर्व अस्थींचा एक्स-रे (स्केलेटल सव्‍‌र्हे), सी.टी. स्कॅन, एम.आर.आय, पेट स्कॅन व बोन स्कॅन, बोन मॅरो अ‍ॅस्पिरेशन बायोप्सी या तपासण्यांच्या साहाय्याने होते.
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार मल्टिपल मायलोमा निर्माण होण्यास कोणतेही एकच ठोस कारण आढळत नसले तरी केमिकल्सच्या संपर्कात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये, ४५ वर्षांपुढील पुरुषांत व विशेषत: कृष्णवर्णीय व्यक्तींत या व्याधीचे प्रमाण अधिक आढळते.
आधुनिक वैद्यकशास्त्राने या व्याधीचे तीन प्रकार सांगितले असून त्यापकी मोनोक्लोनल गॅमोपॅथी या प्रकारात रक्तात केवळ मायलोमा प्रोटीनचे प्रमाण अधिक आढळते, परंतु रुग्णास कोणतेही लक्षण नसते व अस्थींमध्ये अर्बुदाची निर्मितीही झालेली नसते. या अवस्थेत कोणतीही आधुनिक चिकित्सा दिली जात नसली तरी यापकी २०-२५ टक्के रुग्णांत पुढे मल्टिपल मायलोमा निर्माण होण्याची संभावना असल्याने रुग्णांनी नियमित वैद्यकीय परीक्षण व निरीक्षणाखाली राहणे आवश्यक असते. रक्तधातूची शुद्धी करणारी रक्तमोक्षण व विरेचन; अस्थी व मज्जाधातूंना बल देणारी बस्ती चिकित्सा अनुक्रमे शरद व वर्षां ऋतूत करणे योग्य ठरते. तसेच प्रवाळ भस्म, च्यवनप्राशसारखी रसायन चिकित्साही या अवस्थेत उपयुक्त ठरते. असिम्टमॅटिक (अलाक्षणिक) मल्टिपल मायलोमा या दुसऱ्या प्रकारात अस्थिमज्जेतील मायलोमा प्रोटीन व प्लाझ्मा सेल्सचे प्रमाण काही प्रमाणात वाढलेले असते. रुग्णात पांडुता, अस्थिसौषिर्य अशी  लक्षणे दिसतात, परंतु जंतुसंसर्ग, वृक्क अकार्यक्षमता ही व्याधी बळावल्याची लक्षणे दिसत नाहीत. या रुग्णांमध्ये अधिक वारंवार वैद्यकीय परीक्षण व निरीक्षणाची आवश्यकता असते. सिम्पटमॅटिक (लाक्षणिक) मल्टिपल मायलोमा या शेवटच्या प्रकारामध्ये मायलोमा प्रोटीनचे रक्त व मूत्रातील प्रमाण वाढलेले असते, अस्थिमज्जेत प्लाझ्मा पेशी ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात असतात. तसेच मल्टिपल मायलोमाची बहुतांश लक्षणेही या रुग्णांत दिसतात. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार कॅन्सरच्या पेशींचा नाश करणारी शिरेवाटे किंवा मुखावाटे दिली जाणारी केमोथेरॅपी व कॉर्टकिोस्टिरॉईड्स; कॅन्सरच्या पेशींची वाढ नियंत्रणात ठेवणारी थॅलिडोमाइडसारखी औषधे; अस्थीमधील सौषिर्य व वेदना कमी करण्यासाठी रेडिओथेरॅपी व स्टेम सेल ट्रान्सफ्लांट या चिकित्सा पद्धतींचा या अवस्थेत अवलंब केला जातो.
आयुर्वेदानुसार रक्तप्रसादन व रक्तवृद्धी करणारी नवायास लोह, ताफ्यादी लोह, प्रवाळ, अनंतमूळ, कुमारी, आमलकी, च्यवनप्राश अशी  औषधे; अस्थी व मज्जेचे कार्य प्राकृत करणारी व तेथील अर्बुदाची वाढ नियंत्रित करणारी लाक्षादी  गुग्गुळ, आभा गुग्गुळ,  प्रवाळपंचामृत, बदाम पाक, लाक्षाघृतासारखी औषधे उपयुक्त ठरतात. तसेच पंचकर्मापकी  वातदोषावर नियंत्रण ठेवणारी व अस्थींचे बल वाढविणारी तिक्तक्षीर बस्ती चिकित्सा, रक्त व पित्ताचे प्रसादन करणारी विरेचन व रक्तमोक्षण चिकित्सा व्याधी अपुनर्भवासाठी निश्चितच उपयुक्त ठरते. आहारात दूध, तूप, केशर, बदाम, अक्रोड, खारीक, खजूर, दलिया  उपमा,  गोड शिरा,  पोळी  असे  गव्हाचे  पदार्थ मुबलक  असावे.  तसेच  शुद्ध  रक्ताच्या  निर्मितीसाठी मोकळ्या हवेत फिरणे, प्राणायाम व चित्तवृत्ती प्रसन्न ठेवणे म्हणजे अधिकस्य अधिकं फलम्!

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू