झटपट ऊर्जा देणाऱ्या पेयांमध्ये (एनर्जी ड्रिंक्स) कॅफिन, टॉरिन यांसारखे घटक असल्याने त्याचा हृदयावर वाईट परिणाम होतो, असे वैज्ञानिकांना दिसून येते. आरोग्यवान प्रौढ व्यक्तींनी हे पेय सेवन केल्यानंतर त्यांचे हृदय एका तासाभराने आकुंचन पावल्याचे दिसून आले. आतापर्यंत ऊर्जा पेयांमुळे हृदयावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात आला नव्हता तो आम्ही कार्डिओव्हॅस्क्युलर इमेजिंग तंत्राने केला आहे, असा दावा जोनास डॉर्नर यांनी केला आहे. जर्मनीच्या बॉन विद्यापीठात मुख्य संशोधक डॅनियल के. थॉमस यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले असून ऊर्जा पेयांचे प्रौढांवर अनेक वाईट परिणाम दिसून आले आहेत. कॉफी किंवा कोलापेक्षाही या ऊर्जा पेयांमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. जास्त प्रमाणात कॅफिनच्या सेवनाने हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, क्वचित प्रसंगी मृत्यूही येतो असे डॉर्नर यांचे मत आहे. डॉर्नर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्डिअ‍ॅक मॅग्नेटिक रेझोनन्स पद्धतीने या पेयांचा १८ वर्षीय युवक-युवतींवर नेमका काय परिणाम होतो हे तपासले असून त्यात १५ पुरुष व ३ महिलांचा समावेश होता. ते २८ वयोगटातील होते. प्रत्येकाची ही पेये घेतल्यानंतर एमआरआय तंत्राने तपासणी केल्यानंतर हृदयावरील ताण वाढलेला दिसला. त्यांना प्रति १०० मि.लि. मध्ये ४०० मि.ग्रॅ. टॉरिन व ३२ मि.ग्रॅ. कॅफीन देण्यात आले होते. त्यांच्यात हृदयाच्या डाव्या बाजूच्या रक्तवाहिनीवर  (लेफ्टव्हेन्ट्रीकल) ताण आला. हीच रक्तवाहिनी फुफ्फुसाकडून आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात वेगवेगळ्या अवयवांना पाठवत असते त्यामुळे परिणामी ऊर्जा पेयांमुळे शरीराच्या सर्वच भागांवर वाईट परिणाम होतो.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!