उन्हाळा म्हटले की आठवतो तो प्रचंड उकाडा, घामाच्या धारा आणि होणारे विविध आजार! तापमानबदलामुळे होणरे सर्दी- खोकला, घामामुळे होणारे त्वचाविकार यासाठी आपण आपल्या परीने काळजी घेत असतो. पण उन्हाळ्यात डोळ्याची निगा राखणेही गरजेचे आहे. डोळय़ाचे अनेक विकार उन्हाळय़ात होतात. उन्हापासून बचावासाठी आपण गॉगल वापरतो, पण पण उन्हाळ्यातली डोळ्यांची काळजी केवळ गॉगल घालून मिटणार नाही.

उन्हाळ्यात सर्रास दिसणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी
डोळे दुखणे
डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे जाणवणे
डोळे चुरचुरणे, लाल होणे, डोळ्यांची आग, जळजळ होणे
दिवसभर उन्हात वावरल्यावर डोळ्यांवर ताण येणे
रांजणवाडी होणे
डोळे येणे (विषाणूजन्य कंजंक्टिव्हायटिस)
सध्या सामान्यत: ही लक्षणे दिसत आहेत-
प्रथम डोळे थोडे लाल दिसू लागतात.
पापण्यांच्या आत खाज सुटते.
सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर थोडीशी सूज दिसते.

Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

गॉगल वापराच
टोपी, स्कार्फ आणि गॉगल या गोष्टी सध्याच्या उन्हाळ्यात अगदी आवश्यक आहेत.
हल्ली रस्त्यावर पन्नास- साठ रुपयांपासून गॉगल विकत मिळतात. पण या गॉगलच्या दर्जाची हमी नसते. त्यांच्या काचांची जाडी कमी-जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे फार महागाचा गॉगल घेतला नाही तरी किमान त्याचा दर्जा तपासून तो खरेदी करा.
उष्णता वाढू नये यासाठी एखादा लहानसा कांदा खिशात ठेवला तर उत्तम. कांदा उष्णता शोषून घेणारा असल्यामुळे पूर्वी अनेक जण टोपीत कांदा आवर्जून ठेवत असत.

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी-
दिवसातून एक-दोन वेळा तरी काम थांबवून डोळे मिटून पाच मिनिटे शांत बसा. यामुळे डोळ्यांवरचा ताण दूर व्हायला मदत होईल. डोळे चुरचुरणे आणि लाल होण्याचा त्रास असेल तर अशा प्रकारे डोळ्यांना विश्रांती देणे फायदेशीर ठरते.
थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाची पट्टी डोळ्यांवर ठेवूनही बरे वाटते. हा उपाय कार्यालयात असतानाही करता येऊ शकेल.
रात्री झोपताना डोळ्यांवर काकडीच्या चकत्या किंवा दुधात भिजवलेल्या कापडाच्या घडय़ा ठेवून झोपा.
दिवसभर दर दीड-दोन तासांनी डोळ्यांवर व चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारा.
दिवसातून एकदा किंवा रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाण्याने अथवा गार पाण्याने डोळे धुवा.

काय खावे- काय प्यावे-
नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक अशी पेये अधूनमधून आवर्जून प्या.
उन्हात फिरून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका.
फ्रिजमधील पाण्यापेक्षा माठातले पाणी पिणे चांगले.
काकडी, टोमॅटो, कोथिंबीर, कांद्याची पात चिरून त्यात मीठ- मिरपूड घालून दररोज जेवणात घ्या.
रोज पांढरा कांदा खा. हा कांदा तिखट नसतो आणि पाणीदार असतो.

डोळे येण्याची लक्षणे कशी ओळखावीत?
डोळे येतात तेव्हा ते आधी लाल होतात, खाजतात, महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर चिकटतात. डोळ्यांमधून पिवळसर किंवा पांढरा स्राव येतो. ही लक्षणे एक-दोन दिवस सतत दिसू लागली तर डोळे येण्याची सुरुवात असल्याचे ओळखावे.
अनेकदा डोळ्यांना त्रास होऊ लागल्यावर केमिस्टकडून स्वत:च आय-ड्रॉप आणून डोळ्यात घालण्याची अनेकांना सवय असते. डोळे येण्याची सुरुवात असेल तर काही वेळा या ड्रॉप्समुळे बरेही वाटते. पण घरातल्या एकाला डोळे येण्याची लक्षणे दिसत असतील तर त्याच्यासाठी वापरलेले ड्रॉप्स प्रतिबंधक उपाय करण्याच्या नादात इतरांसाठीही वापरले जातात. आय-ड्रॉप डोळ्यात टाकताना ड्रॉपर डोळ्यांच्या खूप जवळ नेलेला असतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचे डोळे आले असतील तर त्याचे विषाणू दुसऱ्या व्यक्तीच्या निरोगी डोळ्यांत जाऊन त्याचेही डोळे येण्याची शक्यता असते. शिवाय प्रत्येकाला होणारा त्रास वेगवेगळा असतो. त्यामुळे डोळे येण्यावर स्वत:च्या मनाने उपचार न करता डॉक्टरांकडे जाणेच उत्तम.

रांजणवाडी
पोट साफ न होणे हे रांजणवाडी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. पोटातील उष्णता डोळ्यांना होणाऱ्या रांजणवाडीच्या रुपाने बाहेर पडते.
पापण्यांवर वरच्या बाजूला तसेच डोळ्यांच्या कोपऱ्यात आतल्या बाजूला अशा दोन्ही ठिकाणी रांजणवाडी होऊ शकते.
अशा स्थितीत डोळे दुखू लागले, सुजल्यासारखे दिसू लागले, डोळ्यांच्या आत टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या तरी लगेच डॉक्टरांकडे जाणे आवश्यक ठरते.
काही वेळा डोळ्यांत थोडेसे टोचल्यासारखे वाटत असते पण त्याकडे रुग्ण दुर्लक्ष करतात आणि रांजणवाडीचा त्रास वाढतो. त्यामुळे ही लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.