झोप न लागणे किंवा रोजच्या बदलत्या कामाच्या वेळांमुळे अपुरी झोप होण्याची तक्रार अनेकांना असते. याचे आपल्या नकळत शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. झोपेचे चक्र, त्यात होणारा बिघाड आणि हा बिघाड दूर करण्यासाठीची काही साधी पथ्ये पाहूया- 
झोपेच्या आजारांना आपण सरसकट ‘निद्रानाश’ किंवा ‘इन्सोम्निया’ असे म्हणतो. पण झोपेच्या आजारांचे विविध प्रकार आहेत. मेंदूशी संबंधित कारणांमुळे होणारे किंवा झोपेच्या चक्रात अडथळे आल्यामुळे होणाऱ्या आजारांचे तीन प्रकार असे-

झोपी जाताना लवकर झोप न लागणे

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

झोपल्यावर मध्येच पुन:पुन्हा जाग येणे

झोपल्यावर काही तासांनी पूर्ण झोप न झालेली असतानाच जाग येणे आणि परत झोप न लागणे

घोरणे आणि झोपेत श्वास बंद पडल्यामुळे उठणे (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया) या गोष्टींचा मात्र वेगळा विचार करायला हवा. या दोन तक्रारी श्वासोश्वासामध्ये अडथळे येण्याशी संबंधित आहेत. झोपेत घोरणे आपल्याला नवीन नसते. ऑब्स्टक्ट्रिव्ह स्लीप अ‍ॅप्निया हादेखील घोरण्याचाच तीव्र प्रकार आहे असे म्हणता येईल. यात झोपेत श्वास बंद झाल्यामुळे माणूस जागा होतो. झोपेत वारंवार असे झाल्यामुळे गाढ झोप लागत नाही आणि झोप अपुरी होते.आपल्या शरीराचे घडय़ाळ मेंदूत असते, आणि मेंदूला आराम व्यक्ती झोपेत असतानाच मिळतो. शरीरातील संप्रेरकांचे (हॉर्मोन्स) स्रवण योग्य रितीने होण्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. कमी किंवा अति झोप घेतल्यामुळे हॉर्मोन्सच्या स्रवणाची यंत्रणाही बिघडते.

झोप अपुरी झाल्याची लगेच जाणवणारी शारिरिक लक्षणे –
दुसऱ्या दिवशी थकवा जाणवणे, मळमळणे, आम्लपित्त होणे, डोकेदुखी, डोळे जळजळणे, पोट साफ न होणे, दिवसभर जडपणा जाणवणे.
मानसिक परिणाम– दिवसभर आळस, निरुत्साह, चिडचिडेपणा येणे, नैराश्य, लक्ष केंद्रित न करता येणे, वाचलेले किंवा ऐकलेले लक्षात न राहणे, एका वेळी अनेक कामे (मल्टिटास्किंग) न करता येणे, एखाद्या क्रियेवर मेंदूकडून त्वरित प्रतिक्रिया न उमटणे.अपूर्ण झोपेचे काही दीर्घकालीन परिणामदेखील आहेत. काही दिवस सातत्याने झोप पुरेशी होऊ शकली नाही तर रक्तदाबातील चढउतार, चिडचिडेपणा व नैराश्य वाढणे, विस्मरणाचा अधिक परिणाम जाणवू लागणे, रोजच्या कामात लहान-लहान चुका होणे, पोटाचे विकार, घाबरटपणा, ज्यांना मधुमेह असतो त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास अडचणी होणे, केस गळणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, चेहऱ्यावर आणि शारिरिक थकवा जाणवणे, बारीक असणाऱ्यांचे वजन न वाढणे ही लक्षणे दिसतात.काहींना झोप खूप प्रिय असते, पण गरजेपेक्षा अति झोपणेही त्रासदायक ठरू शकते. अति झोपणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा सर्रास दिसतो. स्नायू दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, नैराश्य, पोटाचे विकार, लक्ष केंद्रित न होणे आणि विस्मरण हे परिणामही अति झोपेमुळे दिसतात.
घोरणे म्हणजे सुखाची झोप?
एखादा मनुष्य ‘घोरत पडलाय’ ही संज्ञा तो मस्त झोपलाय अशा अर्थाने सर्रास वापरली जाते. खरी परिस्थिती मात्र नसते बरं का! घोरणे म्हणजेच श्वासनलिकेत प्राणवायूच्या प्रवाहास अडथळे निर्माण होणे. शरीराला प्राणवायूचा पुरवठा पुरेसा झाला नाही तर मेंदू स्वस्थ झोपत नाही. अशा स्थितीत आपल्या नकळत रात्रभर मेंदू आणि इतर अवयवांचे नुकसान होत असते. रात्री सतत घोरणाऱ्या व्यक्तीची झोप अपुरी झाल्यामुळे दिवसा थोडय़ा थोडय़ा डुलक्या येऊ लागतात. पुढे हळूहळू रक्तदाब आणि थायरॉइडच्या समस्या, मधुमेह हे आजार मागे लागू शकतात. मुळातच स्थूलपणा असेल तर तो वाढतो आणि स्थूलपणामुळे पुन्हा आजारांना चालना मिळते. असे हे दुष्टचक्रच आहे.
घोरण्याबद्दलच्या चाचण्या आणि उपाय
घोरण्याची तक्रार असलेल्या व्यक्तींसाठी काही चाचण्या उपलब्ध आहेत. एखादा माणूस किती घोरतो आणि त्यामुळे प्रत्येक मिनिटाला श्वासात किती वेळा अडथळे निर्माण होतात हे या चाचण्यांमधून कळते. या चाचण्या आता रुग्णाच्या घरीदेखील करता येऊ शकतात. निर्माण होणारे अडथळे खूप जास्त असतील आणि त्यामुळे शरीराला अपाय होत असेल तर ते दूर करण्यासाठी काही वैद्यकीय उपायदेखील आहेत. ‘सीपॅप’ (कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर) नावाचे एक यंत्र यात वापरले जाते. हे छोटेसे यंत्र इलेक्ट्रिसिटीवर चालते. त्याद्वारे व्यक्ती झोपेत असताना श्वासनलिकेत सलग हवा सोडली जाते, त्यामुळे प्राणवायूचा प्रवाह सुरळीत होतो आणि घोरणे बंद होते.
झोपेचे आजार होतातच का?
झोपेच्या आजारांमागे अनेक कारणे असू शकतात. मानसिक आजार, श्वासाचे आजार, व्यसने, लठ्ठपणा, काही औषधांचा परिणाम म्हणूनही निद्रानाश होऊ शकतो. हॉर्मोन्सच्या स्रवणातील बिघाडामुळे निद्रानाश होऊ शकतो.
कधी आणि किती झोपावे
रात्री किमान सात ते आठ तास पूर्ण झोप घ्यावी. केवळ पुरेसा वेळ झोपणे इतकेच महत्त्वाचे नाही. रोजची झोपेची वेळही शक्यतो एकच असावी, त्यात सारखे बदल नकोत.
दुपारची झोप अध्र्या तासापेक्षा अधिक नसावी.
झोपेच्या चांगल्या सवयी
झोपेचे आजार टाळण्यासाठी झोपेचे चक्र सुधारण्यासाठीच्या काही साध्या सवयी आहेत. त्या अशा-झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा नियमितपणे पाळा.
आपण जिथे झोपतो ती जागा आरामदायक हवी, खोलीतले तापमानही योग्य हवे.
झोप येत नसेल तरी बिछान्यावर पडल्या पडल्या त्याबद्दल किंवा तरी कशाबद्दलही नकारात्मक विचार नको.
झोपण्यापूर्वी कॅफिन वा अल्कोहोलयुक्त पेये किंवा निकोटिनचे सेवन नको.
झोपेच्या तक्रारी असणाऱ्यांना या गोष्टी नक्कीच करून पाहता येतील. त्यानेही त्रासात फरक न पडल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

– डॉ. हिमांशू पोफळे
swapnilsdesh@gmail.com