* समाजाच्या आत्म्याचा साक्षात्कार हा ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांना हाताळले जाते त्यात घडून येतो’, असे नेल्सन मंडेला यांनी म्हटलेच आहे. लहान मुलांची भूलतज्ज्ञ असल्याने मला ही वाक्ये फारच जवळची वाटतात. सर्वसाधारण हे आता लोकांना बऱ्यापकी परिचयाचे आहेत.  परंतु नवजात शिशु ते अठरा वर्षे वयापर्यंतच्या वयोगटाला खास भुलतज्ज्ञ असावे लागतात हे अजून फारसे अवगत नाही. लहान बाळांना शस्त्रक्रियेसाठी भूल देणे हे एक वेगळे आणि कौशल्यपूर्ण शास्त्र कसे आहे, त्याबद्दल थोडी माहिती..
* लहान मुले स्वतला नक्की काय होत आहे हे कित्येक वेळा सांगू शकत नाहीत. नवजात शिशुबाबत हा प्रश्नच उद्भवत नाही.
* लहान मुलांना त्याच्या पालकांपासून अलग करून न घाबरविता किंवा न रडविता शस्त्रक्रिया सफल होणे हादेखिल एक पराक्रमच आहे. हे बरेच वेळा तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांत साधले जाते.
* नवजात शिशुच्या व बाळसेदार छोटय़ा बाळांच्या नीला (रक्तवाहिनी) मिळविणे हे देखिल किचकट व कौशल्यपूर्ण काम आहे.  हे कार्य लहान मुलांचा भुलतज्ज्ञ करतो. सर्वसाधारण मुलांना श्वासोच्छवासाद्वारे दिल्या जाणाऱ्या भुलीनंतर हे केले जाते. तसे पाहिले तर ‘इंजेक्शन‘ हे लहान मुलांचे अतिशय नावडते प्रकार.  ते त्यांना नकळत देणे महत्त्वाचे.
* शस्त्रक्रियेसाठी काही विशिष्ट काळाकरिता लहान मुलांना उपाशी पोटी ठेवावे लागते.  हेदेखिल मोठया माणसांच्या तुलनेत पूर्णत वेगळे आहे.
* लहान मुलांना देण्यात येणारी प्रत्येक औषधी द्रव्ये ही वजनावर अवलंबून असतात आणि त्याचा अंश देताना कुठल्याही त्रुटीला जागा नसते.
* शस्त्रक्रियेनंतर लहान मुलांना वेदनारहित ठेवणे ही फार महत्त्वाची बाब आहे. यात भुलतज्ज्ञांचा मोठा वाटा आहे. यात भुलतज्ज्ञ व शल्यविशारद यांच्या परस्परामधील समज सर्वात महत्त्वाची बाब आहे.
अत्याधुनिक  बाल भूलशास्त्रामध्ये संपूर्ण बेशुद्ध व शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या जागेचे बधिरीकरण यांचा प्रयोग केला जातो. त्यामुळे लहान मुलांना शस्त्रक्रियेनंतरही फेारसा त्रास होत नाही.
– डॉ. वृषाली पोंडे,बाल भूलतज्ज्ञ