19 September 2020

News Flash

स्मार्टफोन.. डोळ्यांवर ताण!

आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला स्मार्टफोन आपल्या डोळ्यांवर सतत ताण आणत असतो. स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने हाताळताना डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठीच्या या टिप्स -

| February 18, 2014 08:58 am

आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला स्मार्टफोन आपल्या डोळ्यांवर सतत ताण आणत असतो. स्मार्टफोन चुकीच्या पद्धतीने हाताळताना डोळ्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठीच्या या टिप्स –

सतत आणि डोळ्यांच्या जवळ धरून स्मार्टफोन वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. स्मार्टफोनच्या चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे अनेक तक्रारी उद्भवतात.
– डोळे दुखणे च्च् डोळे कोरडे पडून त्यांची सारखी उघडझाप केली जाणे
– दृष्टीवर परिणाम होऊन धूसर दिसू लागणे च्च् डोकेदुखी

काय करावे-
–    मोबाइलचा स्क्रीन कमीत कमी ४ इंचांचा असावा.
–    डोळ्यांपासून स्मार्टफोन किमान १४ ते १५ इंच अंतरावर धरा.
–    ई-मेल करणे किंवा वाचणे अशा कामांसाठी शक्यतो स्मार्टफोन न वापरता संगणक किंवा लॅपटॉपवरच ही कामे करा म्हणजे फाँट कमी-जास्त करून वाचताना डोळ्यांवर येणारा ताण टाळता येईल.
–    स्मार्टफोन, संगणक किंवा लॅपटॉप यांचा वापर करताना दर वीस मिनिटांनी पाच मिनिटांचा छोटा ‘ब्रेक’ घ्यावा. या पाच मिनिटांत काम थांबवायलाच हवे असे मुळीच नाही. थोडा वेळ आपल्या डोळ्यांना त्या स्क्रीनपासून दूर ठेवणे हाच याचा उद्देश आहे.
–    कामाचा ताण जाणवू लागल्यास विश्रांती घेणे आवश्यक. अशा वेळी हातपाय मोकळे करून आरामशीर बसावे, थोडा वेळ दुसरीकडे पाहावे, मान वळवावी. या प्रयत्नांत डोळ्यांनाही विश्रांती मिळेल.  
–    डोळ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ डोळे मिटून शांत बसण्याचाही खूप फायदा होतो.

काय टाळावे-
–    स्मार्टफोन डोळ्यांच्या खूप जवळ आणून वापरू नका. अनेकजण स्मार्टफोन वापरताना तो डोळ्यांपासून १० ते १२ इंच इतक्याच अंतरावर ठेवतात. हे डोळ्यांसाठी त्रासदायक ठरते.
–    मोटार, बस किंवा रेल्वेप्रवासात फार वेळ स्मार्टफोन वापरू नका. प्रवासात असताना वाहनाची सतत हालचाल होत असते. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे पाहताना डोळ्यांवर आणखी ताण येतो.
–    फोनवर सतत फाँट कमी-जास्त करून वाचणे टाळा.
–    महत्वाच्या कामाशिवाय केवळ वेळ घालवण्यासाठी केला जाणारा स्मार्टफोनचा वापर कमी करणेच इष्ट.

डॉ. केकी मेहता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:58 am

Web Title: strain on the eyes because of smart phones
टॅग Health It
Next Stories
1 बद्धकोष्ठ बिकट समस्या
2 न्याहरी करावी उत्तम!
3 रागाचे खरे कारण!
Just Now!
X