‘आमच्या वेळी आम्ही ‘हे असलं’ नाही खायचो!’ अशा शब्दांत आजच्या फास्ट फूडला नावं ठेवणारी एखादी तरी आजी किंवा आजोबा तुम्हाला भेटले असतील! त्यांचं म्हणणं आहेही खरंच. पण मग ते नक्की काय खात होते, असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. आपल्या भारतीय अन्नात वनस्पतींपासून मिळणाऱ्या घटकांचे प्रमाण अधिक आहे. आपल्या पूर्वीच्या पिढय़ांच्या अन्नात यांतील जे घटक नियमितपणे असत आणि आज जे सहजी बघायलाही मिळत नाही अशा काही अन्नघटकांची माहिती या लेखात

सोलापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भागाताल जुनी मंडळी अजुनही खपली गहू खातात. या लोकांना पुरणाची पोळीही खपली गव्हाचीच लागते. आता शहरातून मिळणारा गहू या लोकांना चालत नाही. आयुर्वेदात गव्हाचे वर्णन बळ देणारा, विर्य वाढवणारा, बृहण करणारा म्हणजे पोषक तसेच स्थिरत्व देणारा असे केले आहे.  शहरात सर्रास मिळणारा गहू (नवीन जात) आणि गावाकडचा खपली गहू यांची तुलना केली असता हे गुण खपली गव्हात अधिक आढळतात. या गव्हाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पोळीला लालसरपणा असतो आणि ती अधिक चविष्ट लागते. आज मात्र खपली गव्हाचा वापर अतिशय कमी होत चालला आहे. काही वर्षांनी कदाचित तो मिळायचाच बंद होण्याची भीती आहे.

Nashik, Fraud with grape producers,
नाशिक : द्राक्ष उत्पादकाची फसवणूक, दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना पोलीस कोठडी
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
water scarcity, Pimpri chinchwad , shortage of water supply, Andhra Dam
पिंपरी : आंद्रा धरणातून मिळणाऱ्या पाण्यात घट…उपनगरांमध्ये पाणीटंचाई

‘हल्ली मिळणाऱ्या अन्नाला कस नाही’ हे वाक्य वैद्यकव्यवसायात नेहमी ऐकायला मिळते. आज जीवनशैलीतील बदलांमुळे अन्नघटक आणि अन्न खाण्याच्या पद्धतीही बदलल्या. जुन्या पिढीला चांगलं अन्न खायला मिळालं म्हणून त्यांच्यात हल्ली आढळणारे आधुनिक आजार आढळत नाहीत, असेही ऐकायला मिळते. ‘माझ्या आईचे सर्व दात शेवटपर्यंत शाबूत होते, पण माझ्या नातवाला मात्र चारही दाढांसाठी रूट कॅनल करावं लागलं!’ अशा प्रकारची खंत वयस्कर लोकांकडून अधूनमधून ऐकायला मिळते. ही जुनी मंडळी ‘किस चक्की का आटा’ खात होती याची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर अनेक तथ्येही उघड झाली.

तांदळाच्या अनेक जाती भारतात प्रचलित होत्या. अजूनही आहेत. मग ओडिशामध्ये संपूर्ण दाणा लाल असलेला केसर तांदूळ असो किंवा झारखंडमधला संपूर्ण दाणा काळा असलेला काळाजिरा तांदूळ असो. महाराष्ट्रातही कर्जत तालुक्यातील शेतकरी औषधी गुणधर्म असलेली तांदळाची एक जात लावत होते. आता मात्र हे वैविध्य आढळत नाही. पांढरा शुभ्र रंग असलेला तांदूळ चांगला, असाच समज आढळतो. ‘आम्ही फक्त बासमतीच खातो’, असे म्हणणाराही एक वर्ग आहे. अति पॉलिश केलेला पांढरा भात पोषणाच्या दृष्टीने निकृष्ट असतो. आयुर्वेदात तांदूळ डोळ्यांना हितकारक असल्याचे सांगितले आहे. तांदूळ विषघ्न म्हणजे विषाचा नाश करणारा, हृदयास हितकर असल्याचेही नमूद केले आहे. आज बाजारात मिळणाऱ्या तांदळात हे गुण आढळत नाहीत, किंबहुना काही आहार सल्लागार भाताला विषच ठरवू लागले आहेत! तांदळाच्या पारंपरिक जाती मात्र मरणपंथाला लागल्या आहेत.
केसर तांदूळ

मुतखडा असणाऱ्या व्यक्तीच्या औषधोपचारांतील पूरक औषध म्हणजे कुळिथ! नियमितपणे कुळिथ खाणाऱ्या लोकांत मुतखडा होण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून आले आहे. बोअरवेलचे पाणी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते. कुळिथाचा आहारात नियमित वापर हे या प्रश्नाचे उत्तर असू शकते. कुळिथ पोषणाच्या दृष्टीनेही हितकारक आहे. आयुर्वेदानुसार ते सूज कमी करणारे, सर्दी-खोकला कमी करणारे, मल घट्ट करणारे असे आहे. वजन कमी करणाऱ्यांसाठीही कुळिथाचा आहारातील वापर मदत करू शकतो.

जवस
आज आपल्याला जवस माहिती आहे ते जवसाची चटणी म्हणून. चटणीमध्येसुद्धा जवसाची वेगळी चव लगेच जाणवते. काही लोकांना जवसाचे तेलही माहिती असते. हे तेल बल देणारे, पोषक व पोट साफ करणारे असते. उष्ण गुण अससलेले जवस हिवाळ्यात शक्तीवर्धक म्हणून वापरता येते. हिवाळ्यात होणाऱ्या खोकला, कफ, सर्दी या आजारांनाही जवस प्रतिरोध करते. पुण्यासारख्या सतत बदलते हवामान असणाऱ्या ठिकाणी हवामान बदलांमुळे येणाऱ्या रोगांच्या साथींवर प्रतिबंधक उपाय म्हणून जवसाचा आहारात वापर करणे उपयुक्त ठरू शकेल.

जगातील ऐंशी टक्के आहार वनस्पतीमधून येतो. मानवाने जेव्हा शेतीची सुरुवात केली तेव्हा पिकांच्या जंगली जाती घेऊन त्या आपल्या सोयीच्या जमिनीत रुजवून शेती होऊ लागली. निसर्गातील किमान पन्नास हजार वनस्पती मानवाला खाण्यायोग्य आहेत. यातही प्रत्यक्षात लागवड
खूप कमी वनस्पतींची केली गेली. या वनस्पतींमध्ये बदल घडवून त्यांच्या नव्या जाती विकसित केल्या गेल्या. अशा आज लागवडीत असणाऱ्या वनस्पतीची संख्या साधारणपणे दीडशे आहे. जगात मानवाचा साठ टक्के आहार केवळ एकवीस वनस्पतींतून मिळत असल्याचेही एका निरिक्षणातून समोर आले आहे. एवढय़ाच खाण्यायोग्य वनस्पतींवर अवलंबून राहण्यामुळे त्यांतील काही वनस्पती लागवडीतून नष्ट झाल्यास उद्भवणारे धोके वाढण्याचीच शक्यता आहे.
आज वनस्पतींच्या नवनव्या जाती विकसित करण्याकडे मानवाचा कल आहे. पिकाची जात विशिष्ट रोगाला प्रतिकार करणारी, कमी पाण्यात वा दुष्काळातही चांगले उत्पन्न देणारी असावी, एका रोपाने जास्त दाणे द्यायला हवेत, दाण्याचा किंवा फळाचा आकार, वजन जास्त हवे, पीक कापणीला किंवा गोळा करायला सोपे हवे, अशा विविध अपेक्षा ठेवून जाती विकसित करताना अनेक तडजोडीही कराव्या लागत असतात. या पद्धतीचा विकास पत्त्यांच्या बंगल्यासारखा नाजूक असतो!
आहारातील गुणांची पडताळणी अनेक परीक्षांद्वारे केली जाते. प्रथिनांचे प्रमाण, कबरेदकांचे प्रमाण या घटकांचा त्यात विचार केला जातो. पण सर्व परीक्षांहून श्रेष्ठ परीक्षा असतो काळाची! पारंपरिक अन्न आरोग्यास सुरक्षित आहे, पोषक आहे हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेले आहे. समाजाने पारंपरिक अन्नाला वाढती मागणी नोंदवली तरच शेतकरी त्याचा पुरवठा करू शकेल. अन्यथा अन्नाच्या पारंपरिक जाती आणि परिणामी आरोग्यही हळूहळू मानवाच्या हातातून निसटू लागेल!