चिंच
*मुतखडा होऊ नये म्हणून फायदेशीर
*‘अँटिऑक्सिडंट’ म्हणून चांगली
*हृदयविकाराला प्रतिबंध करणारी
आहारात कशी वापरली जाते-
*भाजी, आमटी, उसळींमध्ये आंबटपणासाठी चिंचेचा कोळ वापरला जातो.   
*चिंचेचे सार
जवस (अळशी)
*निरोगी पचनासाठी फायद्याचे
*रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे  ’   हृदयाच्या आरोग्यसाठी चांगले  ’   यकृताचे आरोग्य राखणारे  
*रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करणारे
आहारात कसे वापरले जाते-
*जवस थोडे भाजून त्याची लसूण, खोबरे किंवा शेंगदाणे घालून केलेली चटणी जेवणात घेतली जाते
हळद
*कापणे, खरचटणे किंवा कमी प्रमाणात भाजणे यावर घरगुती ‘अँटिसेप्टिक’ म्हणून उपयुक्त
*रक्तशुद्धीसाठी उपयुक्त
*सायनसच्या विकारात फायदेशीर
आहारात कशी वापरली जाते-
*स्वयंपाकात फोडणीत वापरली जाते
*दुधात चिमूटभर हळद घालून घेतले जाते
रोजच्या जेवणात आपण आहारात घेत असलेल्या लहान- लहान पदार्थाचाही महिमा मोठा आहे. हे सगळे पदार्थ आपण फोडणीत, भाजी- आमटीत, चटणीत किंवा मुखशुद्धी म्हणूनही खाल्लेले असतात. त्यांचे आरोग्यासाठी असणारे फायदे सांगताहेत आहारतज्ज्ञ स्नेहा रमणकट्टी-