03 December 2020

News Flash

प्रौढ स्त्रियांच्या समस्या

राग, मत्सर, दुख, ताण, एकाकीपणा, भीती, अपराधीपणा.. अशा भावनांशी अनेकदा सामना होतो. या भावनांना नेमके ओळखून त्यांचा निचरा केला की मनावरचे दडपण कमी होते.

| January 10, 2015 06:37 am

राग, मत्सर, दुख, ताण, एकाकीपणा, भीती, अपराधीपणा.. अशा भावनांशी अनेकदा सामना होतो. या भावनांना नेमके ओळखून त्यांचा निचरा केला की मनावरचे दडपण कमी होते. हे दडपण कमी करण्यासाठी मदत करणार हे सदर.

प्रश्न १- मी पंचेचाळीस वर्षांची सुशिक्षित गृहिणी आहे. छान घर, समाजात प्रतिष्ठा असलेला नवरा, दोन मुलं असं आमचं कुटुंब आहे. वरवर सगळं खूप छान आहे. तरीही अलीकडे मला फार निराश वाटतं. कुणी काही विचारलं की टचकन डोळ्यात पाणीच येतं . हे असं का होतं ते माझं मलाच कळेनासं झालंय. नवरा, मुलं त्यांच्या व्यापात असतात. नवऱ्याच्या राजकारणावरच्या गप्पांमध्ये सामील होणं मला जमत नाही. नव्या पिढीचं विश्व समजून घेण्यातही माझी खूप दमछाक होते. मी खूप मागासलेली आहे, असा सतत वाटत राहतं आणि मग आणखीनच एकट वाटायला लागतं.

उत्तर- खरं म्हणजे आपल्याला ही एक आपोआप मिळालेली आत्मपरीक्षणाची संधीच आहे, असं समजू या का? जर एवढं घटकाभरही थांबणं अवघड वाटत असेल, तर मात्र लगेच आपल्या फमिली डॉक्टरांकडून औषध आणून थोडं शांत होणं आवश्यक आहे. शांतपणे थोडा विचार केलात तर तुम्हाला नक्कीच छान वाटेल. शिक्षण, घर, हुशार मुलं असे तुमचे हुकमाचे पत्ते तर तुमच्याकडे आहेतच. त्यामुळे लोकांच्या टीकेला जरा दूर ठेवू या. हळवेपणा अन निराशा ह्या वयामुळे पण येऊ शकतात. हार्मोन्समध्ये काही बदल झालाय का हे तपासून पाहता येईल. शारीरिक बदलांबरोबरच मानसिक भूमिकेतल्या बदलांमुळेही असं वाटू शकतं. म्हणजे मुलांच्या आणि एकूणच कुटुंबाच्या छोटय़ा-मोठय़ा गोष्टी या स्वतच्या जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखं तुम्ही धाव-धाव केली असेल, अन आता प्रत्येकाचं विश्व निराळं होऊ लागल्यावर आपलं काय, अशी शंका आपलं मन कुरतडतेय का? मग औषधाबरोबरच थोडं रोज स्वत:शी बोललं पाहिजे. मला छान कशानं वाटतंय, अन वाईट का वाटतंय हे रोज टिपलं, तर तुमचं तुमच्या लक्षात येतील अनेक गोष्टी. मग हळूहळू दिशा धरून बदल करता येईल स्वत:मध्ये. आधी आपले विचार बदलल्याशिवाय आपल्याला जग जसं दिसतंय, ते कसं बदलणार? अन लक्षात ठेवा, बदल सावकाशच झालेला चांगला! टचस्क्रीन फोन वापरता येणं अन् राजकारणातल्या गप्पा हा काही पुढारलेपणाचा व्हिसा नव्हे! ‘इंग्लिश- विंग्लश’ वगरे पाहिला असेलच की तुम्ही! अन सुदैवानं आपल्या गरजा शांतपणे मांडल्या, तर तुमचं घर ऐकण्यातलं दिसतंय! तेव्हा ऑल द बेस्ट!

प्रश्न २ –
मी एक नोकरदार स्त्री आहे. माझी मुलगी कॉल सेंटर मध्ये काम करते. तिला घरी यायला रात्र होऊन जाते. तिला सोडायला कंपनीची गाडी असते. मला मात्र ती घरी येईपर्यंत झोप येत नाही. ती सुखरूप घरी येईल ना, हा विचार सारखा मनात येतो. मग मी मध्यरात्रीपर्यंत उगाच टीव्ही वगरेत वेळ घालवत बसते. हे बघून माझ्या नवऱ्यानं मला चक्क वेडय़ात काढलं. पण काळजी वाटणं कसं थांबवता येईल?

उत्तर- तुम्हाला वाटणारी चिंता खरंच भयंकर आहे हे कुणीही मान्य करील. पण हे चांगलं आहे की तुम्ही त्यासाठी उपाय शोधताय, अन चार लोकांशी बोलताय. तुमच्या मुलीसारख्या इतर मुली दिनक्रमाला कसं तोंड देतात आणि त्यांच्या घरचे कशी मदत करतात हे तुम्ही बघितलंच असेल. नसेल तर ते आधी करू या. कंपनीशीपण बोलू या की. अगदी गाडीच्या कंत्राटदाराशी पण बोलण्याची तयारी ठेवू या. मात्र अगदी न घाबरता, न रागावता ते करता येईपर्यंत जरा आत्मपरीक्षण करू या. खूपच चिंता असेल तर सौम्य औषध घेऊन पुढचा विचार करायला हरकत नाही. एका वाक्यात सांगायचं तर काळजी घेणं बरोबर आहे, पण काळजी करत राहाणं आणि त्याचा परिणाम करून घेणं हे दुखण्याचं लक्षण असू शकतं. आपले पूर्वीचे अनुभव, स्त्रियांच्या असुरक्षिततेविषयी येणाऱ्या बातम्या किंवा दुसऱ्या कुणाच्या बोलण्यामुळे असे होते आहे का? आपला स्वभाव अशा गोष्टींच्या विचाराने चिंतेत बुडून जाण्याचा आहे का? किंवा नात्यात कुणाचा? अशा सगळ्या नाजूक गोष्टी सुद्धा बोलायला हव्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:37 am

Web Title: womens health problem after 60
टॅग Health It
Next Stories
1 ओठ फुटणे,पायांना भेगा पडणेअसे का होते?
2 रन कीपर
3 ठिसूळ, ठिसूळ, ठिसूळ किती?
Just Now!
X