जर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल, तर लगेच मित्र जोडा, याचे कारण म्हणजे या एकटेपणामुळे तुमची प्रतिकारशक्त कमी होत असते असे संशोधनात दिसून आले आहे. नुसता एकटेपणाच नव्हे तर आजूबाजूची अप्रिय परिस्थितीही तुमच्या आरोग्यावर परिणाम करीत असते.
एकटेपणामुळे तुमची प्रतिकारशक्ती रोगजंतूंना ज्या पद्धतीचा प्रतिकार करीत असते त्यात कमतरता येत जाते व त्यामुळे एकूणच आरोग्य बिघडते.
संशोधकांना असे दिसून आले, की जे लोक एकटे राहतात त्यांच्यात नागिणीचा विषाणू पुन्हा कार्यशील होतो. मनावर सतत ताण राहिल्याने त्यांच्यात शरीरात जळजळ किंवा वेदना निर्माण करणारी प्रथिने तयार होतात. समाजशील व समूहात मिसळणाऱ्या व्यक्तींमध्ये तुलनेने त्यांचे प्रमाण कमी असते. हृदयविकार, टाइप २ मधुमेह, संधिवात, स्मृतिभ्रंश हे रोग तसेच  वार्ध?याची क्रिया यात त्यामुळे वाढ होते. नागिणीचा विषाणू पुन्हा क्रियाशील होण्यास एकटेपणा कारणीभूत असतो त्याचे कारण म्हणजे मानसिक ताणामुळे प्रतिकारशक्ती प्रणालीवर परिणाम होतो परिणामी या विषाणूंचा शरीर प्रतिकार करू शकत नाही. जर तुमच्या नातेसंबंधातही निकोपता नसेल, तरीही असे प्रकार घडून येतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, असे ओहिओ स्टेट विद्यापीठाच्या संशोधक लिसा जरेमका यांनी म्हटले आहे. यूसीएलए मापन प्रणालीनुसार व्यक्तींचा एकाकीपणा मोजण्यात आला, त्यासाठी त्यांच्याकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली. सरासरी ५१ वयोगटातील स्तनाच्या दोनशे कर्करोगग्रस्त रुग्णांना या संशोधनात सहभागी करण्यात आले होते. या रुग्णांवर तीन वर्षे कर्करोगाचे उपचार करण्यात आले होते. त्यांच्या रक्तात एपस्टेन बॅर विषाणू व सायटोमेगॅलोव्हायरसचे प्रतिपिंड आहेत काय याची तपासणी करण्यात आली. हे दोन्ही नागिणीचे विषाणू असून त्यांचा संसर्ग अमेरिकी लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येतो. जे लोक एकटे राहत होते त्यांच्यात सायटोमेगॅलोव्हायरसचे प्रतिपिंड जास्त प्रमाणात आढळूनोले. त्यांचे प्रमाण जास्त असेल, तर वेदना, नैराश्य जास्त असते. एपस्टेन-बॅर विषाणूचे प्रतिपिंड तुलनेने कमी आढळले अर्थात त्याचे कार्यप्रवण होणे हे वयाशी निगडित असते, त्यामुळे त्याचे नेमके कारण एकटेपणा आहे असे म्हणता येत नाही असे मत जरेमका यांनी व्यक्त केले आहे.