खरे तर मानव आणि निसर्ग यांचे नाते अतूट आहे. पण कालांतराने निसर्गाशी असलेले त्याचे नाते काहीसे दुरावले. आता तर मानव निसर्गाशी बेपर्वा वृत्तीने वागू लागला आहे. साहजिकच निसर्गसुद्धा काहीसा कोपू लागला आहे. त्याचे फटके आपल्याला सर्वानाच बसू लागले आहेत. या फटक्यांमुळेच काहीशी जागृती जनमानसात निर्माण होत आहे. ही जागृती वाढवण्याचे काम पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या काही समाजसेवी संस्था करीत आहेत. आज अशाच काही संस्थांची आणि त्यांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती.

सँक्च्युरी एशिया (सेव्ह अवर टायगर्स) – निसर्गाचा अविभाज्य भाग असलेल्या पट्टेरी वाघांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेली मुंबईतील ही संस्था, पट्टेरी वाघाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे काम करते. त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २३०१६८४८, ०२२ २३०१६८४९, ०२२ २३०१६८५०.

वाइल्ड कॉन्झर्वेशन ट्रस्ट ( डब्ल्यू. सी. टी. ) – वन्यजीवन, निसर्ग, पर्यावरण या संदर्भात जनजागृती करणारी, तसेच निसर्गातला समतोल राखण्यासाठी धडपडणारी संस्था, निसर्ग समृद्ध व्हावा म्हणून कार्य करीत आहे. त्यांचे हेल्पलाइन्स क्रमांक आहेत – ४९२५५५०५, ४९२५५५५५.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस.) –

निसर्ग, तसेच वन्यजीवांविषयीचे शिक्षण जनतेला देण्यासाठी संबंधित अभ्यासक्रम व निसर्गभ्रमण यांचे आयोजन करणारी संस्था. अनेक कार्यक्रमही या संस्थेतर्फे होतात. त्यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २२८२१८११.

वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड, इंडिया ( डब्ल्यू.डब्ल्यू. एफ, इंडिया ) –

जगभर शाखा असलेली ही संस्था त्यांच्या नेचर क्लबद्वारे अनेक शाळा-महाविद्यालयांशी संबंधित आहे. मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठीही ही संस्था प्रयत्नशील आहे. त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २४७०१३६१, ९८१९१०९६०६.

रीफ वॉच फॉर मरिन इश्यू

सागराच्या जतनासाठी काम करणारी संस्था. सागरातील जलचरांचे जीवन, सागराचे प्रदूषण, सागरातील जैवसाखळी आदी विषयांसंबंधात अभ्यास, जागृती आणि काम मुंबईतील ही संस्था करते. त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २६५१८२२३, ०२२ २६५१८२०६.

puntambekar.shubhangi@gmail.com