News Flash

स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी..

आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या हेल्पलाइनची माहिती करून घेऊ या.

हेल्पलाइन म्हणजे काय, हे आपण गेल्या आठवडय़ात जाणून घेतलं. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या हेल्पलाइनची माहिती करून घेऊ या. सरकारी कामकाज, महापालिकेचे कामकाज, हॉस्पिटल्स वगैरे बाबतीत मदत करण्यासाठी हेल्पलाइन असतात. त्याचप्रमाणे स्त्रिया, पुरुष, तरुण-तरुणी, किशोरवयीन मुलं-मुली, लहान मुलं-मुली, यांच्यासाठीही खास हेल्पलाइन असतात. सुरुवातीला आपण स्त्रियांसाठीच्या हेल्पलाइन पाहू या. स्त्रियांच्या आयुष्याशी संबंधित सर्वच बाबतीत मदतीचा आणि आधाराचा हात देणाऱ्या हेल्पलाइन आहेत. स्त्रियांची सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, सक्षमीकरण, कायदेविषयक सल्ला वगैरे बाबतीत मदत करणाऱ्या या हेल्पलाइन आहेत. निराळा उल्लेख नसल्यास सर्व हेल्पलाइन २४ तास सुरू असतात.
सुरक्षा म्हटलं की पोलीस डोळ्यांसमोर येतात. तेव्हा पोलिसांच्या हेल्पलाइनने सुरुवात करू या.
ल्ल तुम्हाला शारीरिक, मानसिक, लैंगिक त्रास देण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण तसं झालंच तर मात्र त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आणि मदत मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे, असं आवाहन पोलिसांनीच स्त्रियांना केलं आहे. त्यासाठी पोलीस हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे- १०३,
ल्ल स्त्रिया किंवा मुलींची छेडछाड, विनयभंग यासाठी क्रमांक आहे- १०३, १०९०, ७७३८१३३१३३, ७७३८१४४१४४
ल्ल वुमेन्स सेंटर- २६१४०४०३
ल्ल बसमध्ये लैंगिक अत्याचार झाल्यास- १८००२२७५५० (सार्वजनिक वाहतूक)
ल्ल स्नेहा- २४०४२६७, २४०८६०११
ल्ल एकटीने प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी पोलिसांनी एस.एम.एस. सेवा सुरू केली आहे. टॅक्सी किंवा रिक्षात बसण्यापूर्वी ९९६९७७७८८८ या क्रमांकावर एस.एम.एस. करून त्या टॅक्सी किंवा रिक्षाचा क्रमांक कळवायचा. एस.एम.एस. मिळाल्याचा पोलिसांचा मेसेज येतो. पोलीस जी.पी.एस.द्वारे त्या वाहनाच्या प्रवासाची नोंद ठेवतात. गरज पडल्यास त्या नोंदीचा उपयोग केला जातो. टॅक्सी, रिक्षांच्या पुढच्या काचेवर हा क्रमांक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे.
तेव्हा सजग रहा, या हेल्पलाइन्सचा उपयोग करा.

– शुभांगी पुणतांबेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2016 1:01 am

Web Title: for the safety of women
टॅग : Chaturang
Next Stories
1 मैत्र जीवांचे
Just Now!
X