अपघात झाल्यास तातडीने मदत मिळवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती
कोकण रेल्वेच्या मार्गावर अपघात झाल्यास संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक – रत्नागिरी स्थानक – ०२३५२ २२८१७६, ०२३५२ २२८९५१, ०२३५२ २२८९५४, मुंबई – ०२२ २७५६१७२१/३/४, ठाणे – ०२२ २५३३४८४०, पनवेल – ०२२ २७४६८.
महाराष्ट्राला लांबलचक सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे सागरी वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर होत असते. या प्रवासातही कधी तरी अपघात किंवा आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी मदत अथवा त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’च्या म्हणजेच ‘महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड’च्या हेल्पलाइन्सवर संपर्क साधायचा. त्यासाठी त्यांचे क्रमांक आहेत – सागरी पोलीस विभाग – १०९३, सागरी शोध व बचाव विभाग – १५५४, नाविक दल नियंत्रण कक्ष – २२६६३०३०, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – १०७७.
एखादा विमान अपघात झाल्यास त्यासंबंधात माहिती मिळण्यासाठी मुंबईतल्या विमानतळ नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत – ०२२ २६४६०४०४, ०२२ २६४६०१०२, ०२२ २६१५६६००, ०२२ २६१५४६३५. विमानतळ पोलिसांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २८२२५७०९.
पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाच्या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत – ०२२ २२०८०५०१, ०२२ २२६५०७०७.
केवळ अपघात हीच समस्या या मार्गावर असते असे नाही, तर इतरही समस्या असतात. उदाहरणार्थ काही कारणांस्तव मार्गामध्ये बदल, काही कारणांमुळे मार्ग तात्पुरता किंवा कायमचा बंद होणे वगैरे. तर अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठीसुद्धा हेल्पलाइन्स उपलब्ध असतात. मुंबईत रस्ता प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन्सवरून आवश्यक ती माहिती मिळू शकते. उदाहरणार्थ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटण्यास किती वेळ लागेल, किंवा पर्यायी रस्ता कोणता, अशा प्रकारची माहिती या हेल्पलाइनवरून मिळू शकते. त्यांचे क्रमांक आहेत –
वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष – २४९३७७४६, २४९३७७४७, २४९३७७५५.
विभागीय वाहतूक कार्यालय – १८०० २२ ०११०.

– शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com