05 March 2021

News Flash

ज्येष्ठ नागरिकांसाठी

स्त्रियांइतकीच ज्येष्ठ नागरिकांनाही हेल्पलाइन्सची मदत होऊ शकते.

स्त्रियांइतकीच ज्येष्ठ नागरिकांनाही हेल्पलाइन्सची मदत होऊ  शकते. त्यांच्या गरजा थोडय़ा वेगळ्या असतात. मुलं नसणारे किंवा मुलं परगावी, परदेशी असणाऱ्या, मुलांकडून दुर्लक्षित किंवा नातेवाईक जवळपास नसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आता वाढत आहे. काही काही इमारतींमध्ये, कॉलन्यांमध्ये तर फक्त ज्येष्ठ नागरिकच राहातात. त्यांना अनेक प्रकारच्या मदतीची गरज असते. सोबत, शुश्रूषा, बँक व्यवहार, बिलं भरणं वगैरे बाहेरच्या कामांसाठी मदत, तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत, अशी अनेक स्वरूपाची मदत त्यांना लागते. आज अशी मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.

ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांची हेल्पलाइन आहे, ‘एल्डरलाइन’. दू. क्र. आहे – १०९०. जिवाला किंवा मालमत्तेला धोका असलेले, वैद्यकीय तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी मदतीची गरज असलेले ज्येष्ठ नागरिक या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. पोलिसांकडून त्यांना तातडीची मदत मिळू शकते. काही स्वयंसेवकही या सेवेशी निगडित आहेत. त्यांचीही मदत होते.

पोलिसांचीच आणखी एक सेवा उपलब्ध आहे. www.hamarisuraksha.com किंवा www.mumbaipolice.org  या वेबसाइटवर ज्येष्ठ नागरिकांनी आपले नाव नोंदवायचे. आपली संपूर्ण माहिती तिथल्या अर्जामधील रकान्यांमध्ये भरायची. सर्व माहिती गोपनीय राखली जाते. सर्व पोलीस ठाण्यांमध्येही हे अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज भरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी दूरध्वनी करून मदतीची
मागणी केल्यास तातडीने मदत मिळते. दूरध्वनी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे ठिकाण जी.पी.एस. यंत्रणेद्वारे निश्चित करण्यात येऊन लगेचच मदत पुरवली जाते.

ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत करणारी ‘डिग्निटी फाऊंडेशन’ नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. वैद्यकीय व इतर सेवेबरोबरच मृत्युपत्र किंवा तत्सम कायदेशीर कागदपत्रं तयार करण्यात ही संस्था मदत करते.दू. क्र. – ६१३८११००.
त्यांची वेबसाइट आहे -dignityfoundation.com  शिवाय त्या संस्थेच्या responsedignity@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्कही साधता येतो.

डिग्निटी फाउंडेशन, पुणे, दू. क्र. -०२०३०४३९१९०
हेल्पएज सीनिअर सिटिझन या संस्थेचेही ज्येष्ठांसाठी मदतकार्य चालते. देशात २३ ठिकाणी त्यांची केंद्रे आहेत. त्यांचा दू. क्र. आहे – १८००१८०१२५३

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2016 1:01 am

Web Title: helplines for senior citizens
टॅग : Chaturang,Helplines
Next Stories
1 स्टॉप व्हॉयलंस अगेंस्ट वुमेन
2 निर्भया हेल्पलाइन
3 स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी..
Just Now!
X