04 August 2020

News Flash

किशोरवयीन मुला-मुलींसाठी

अखंड वाहणारा आणि हाताशीच असणारा माहितीचा धबधबा

अखंड वाहणारा आणि हाताशीच असणारा माहितीचा धबधबा, प्रसिद्धीमाध्यमांचा अव्याहत मारा, वाढता खुलेपणा, अर्धवट ज्ञान या सगळ्यांमुळे किशोरवयीन मुला-मुलींचे लैंगिक गोष्टींबाबतीतले कुतूहल जागृत होत असते. अशा वेळी योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर ही मुले भरकटण्याचा संभव असतो. त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांना, समस्यांना कधी कधी घरातून योग्य उत्तरे मिळत नाहीत. संकोच किंवा अन्य कारणांमुळे त्यांचा घरातल्यांशी किंवा ओळखीच्यांशी संवाद होऊ  शकत नाही. अशा किशोरवयीन मुला-मुलींसाठी राज्य सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. तिचा क्रमांक आहे – १८००२३३२६८८.
१० ते १९ वर्षे या वयोगटातील मुला- मुलींसाठी विनामूल्य असलेली ही हेल्पलाइन सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असते. राज्यातून कुठूनही या क्रमांकावर संपर्क साधता येतो. किशोरवयीन मुला-मुलींच्या लैंगिक आरोग्यासंबंधीच्या प्रश्नांना, समस्यांना तज्ज्ञ व्यक्ती या हेल्पलाइनवरून उत्तरे देतात, समुपदेशनही करतात. आवश्यक त्या वैद्यकीय मदतीसाठीही सल्ला दिला जातो. अर्थात संपर्क साधणाऱ्यांची नावे, माहिती गोपनीय राखली जाते.
किशोरवयीन मुला-मुलींचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहावे, यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य अभियान’ सुरू केले आहे. या अंतर्गत देशभरात एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. तिचा क्रमांक आहे – १०४. विनामूल्य आणि २४ तास चालणारी ही हेल्पलाइन किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्व प्रकारच्या समस्या, ताण, कुतूहल, व्यसनाधीनता यांसाठी योग्य ते मार्गदर्शन करते. या हेल्पलाइनवर संपर्क साधणाऱ्यांची नावे, माहिती आणि समस्या गोपनीय राखल्या जातात.
‘आसरा’ या संस्थेतर्फेही एक हेल्पलाइन चालवली जाते. आठवडय़ातील सर्व दिवशी २४ तास ही हेल्पलाइन सुरू असते. किशोरवयीन मुला-मुलींना परीक्षेची वाटणारी भीती आणि दडपण दूर करण्यासाठी ही हेल्पलाइन मार्गदर्शन करते. आत्महत्येचा विचार येणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींना त्या विचारापासून परावृत्त करण्यासाठीही ही हेल्पलाइन मदत करते. दूरध्वनी क्रमांक आहे – ९१२२-२७५४६६६९. ‘आसरा’च्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक आहे – ०२२ २७५४६६६७. संस्थेचा ई-मेल आयडी आहे – ं२१ंँी’स्र्’्रल्ली@८ंँ.ूे

शुभांगी पुणतांबेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:02 am

Web Title: helplines for teenagers
टॅग Chaturang,Loksatta
Next Stories
1 स्त्रियांच्या प्रश्नांसाठी..
2 हेल्पलाइन्स पुरुषांसाठी..
3 ज्येष्ठांसाठी मदतीचा हात
Just Now!
X