04 August 2020

News Flash

स्त्रियांच्या प्रश्नांसाठी..

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज स्त्रियांसाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती घेऊ.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आज स्त्रियांसाठी असलेल्या  हेल्पलाइन्सची माहिती घेऊ.
राज्य सरकारची मान्यता असलेल्या कॉलसेंटरच्या या हेल्पलाइनचा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे – १८१. दूरध्वनी आणि मोबाइल अशा दोन्ही प्रकारे या क्रमांकावर संपर्क साधता येतो. स्त्रियांचे आरोग्यविषयक प्रश्न, निवाऱ्याचा प्रश्न, या संबंधात या हेल्पलाइनवर मार्गदर्शन केले जाते. आवश्यक असल्यास पोलिसांची मदत दिली जाते. मदतीच्या अपेक्षेने दूरध्वनी केलेल्या स्त्रीला ओळखीच्या खुणेसाठी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. त्या स्त्रीचा तो क्रमांक, तिला आवश्यक असलेली मदत पुरवू शकणाऱ्या संबंधितांनाही दिला जातो. पोलीस, महिला व बालकल्याण अधिकारी, आरोग्य अधिकारी, किंवा अन्य संबंधितांकडून त्या क्रमांकाच्या स्त्रीला मदत केली जाते. त्या स्त्रीला मिळत असलेल्या मदतीचा पाठपुरावा या कॉलसेंटरकडून केला जातो. आवश्यकता असल्यास करियर मार्गदर्शन, कायदेविषयक मार्गदर्शनही केले जाते. गरज भासल्यास रुग्णवाहिका पाठवण्याची व्यवस्थाही केली जाते. सामाजिक संस्था, समाज कार्यकर्ते आणि विविध विषयांमधले तज्ज्ञ यांचे सहकार्य या कॉलसेंटरला लाभत असते.
दुसरी हेल्पलाइन आहे, रुग्णवाहिकेसाठीची. दूरध्वनी क्रमांक आहे- १०२. विनामूल्य असलेला हा दूरध्वनी क्रमांक ग्रामीण आणि दुर्गम भागातील गर्भवती स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहे. त्या स्त्रीला प्रसववेदना सुरू झाल्यावर तातडीने रुग्णालय गाठण्यासाठी आवश्यकता भासते ती रुग्णवाहिकेची. १०२ या क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका मागवता येते. त्या स्त्रीच्या घराच्या जवळपास असणारी उपलब्ध रुग्णवाहिका तातडीने त्या स्त्रीच्या घरी पाठवली जाते आणि त्या स्त्रीला रुग्णालयात पोहोचवले जाते. प्रसूतीनंतरही त्या स्त्रीला अपत्यासह पुन्हा घरी आणून सोडण्याची व्यवस्थाही केली जाते. ही सेवा विनामूल्य केली जाते.
दोन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांनाही गंभीर आजाराच्यावेळी या सेवेद्वारे रुग्णालयात पोहोचवले जाते. ३४ जिल्ह्य़ांमध्ये २,४८८ रुग्णवाहिका या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तालुका आणि जिल्हा पातळीवरच्या आरोग्य केंद्रांमध्ये, तसेच ग्रामीण रुग्णालये आणि दवाखाने या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात आणि त्याचा लाभ कोणतीही स्त्री आणि दोन वर्षांखालील मुले घेऊ  शकतात.

शुभांगी पुणतांबेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:23 am

Web Title: helplines for womens
टॅग Chaturang
Next Stories
1 हेल्पलाइन्स पुरुषांसाठी..
2 ज्येष्ठांसाठी मदतीचा हात
3 ज्येष्ठ नागरिकांसाठी
Just Now!
X