11 July 2020

News Flash

समाजोपयोगी संस्था

सुरुवात करू या आपल्याला चिरपरिचित असणाऱ्या ‘मुंबईच्या डबेवाल्यां’पासून.

संपन्न, सुखी, समाधानी आयुष्य जगताना समाजातील वंचित घटकांची आठवण ठेवणे हीच खरी माणुसकी असते. स्वत:पुरते आयुष्य न जगता समाजातील ‘नाही रे’ गटातील आपल्या बांधवांसाठी काही तरी करण्यासाठी खूप व्यक्ती धडपडत असतात. सुखासीन आयुष्य त्यागून खेडेगावात, दुर्गम भागात राहून तिथल्या लोकांसाठी कष्टणारी काही ‘देवमाणसे’ही असतात. त्यांचे योगदान असामान्य असते. पण समाजातील या दरीची जाणीव असणारे, वंचित घटकांसाठी धडपडण्याची इच्छा असणारे यांची संख्याही काही कमी नाही. अशांना खूप काही करण्याची इच्छा असते, पण काय करायचे, कुणाला मदत करायची, याची माहिती नसते. अशा मदत करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी विविध संस्थांची माहिती आता या सदरातून दिली जाणार आहे. मदत करण्याची इच्छा असणारे आणि मदत हवी असणारे यांच्यात दुवा साधणाऱ्या काही संस्था आहेत. त्यांची माहिती घेऊ या.

सुरुवात करू या आपल्याला चिरपरिचित असणाऱ्या ‘मुंबईच्या डबेवाल्यां’पासून. हे डबेवाले अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने डबे पोहोचवतात, जगभरातून त्यांचे कौतुक होते वगैरे ढोबळ माहिती आपल्याला आहे. पण हे डबेवाले सामाजिक बांधिलकीही तेवढय़ाच असोशीने जोपासतात, हे खूप कमी लोकांना माहीत असेल. त्यांच्या संघटनेने ‘रोटी बँक’ नावाने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. आपल्याकडे सण-समारंभांना काही तोटा नसतो. घरात किंवा कार्यालयात होणाऱ्या या समारंभांमध्ये अन्न मोठय़ा प्रमाणावर बनवले जाते. बहुतांश वेळी त्यातले अन्न उरतेच. उरलेले अन्न कधी कधी फेकूनही दिले जाते. असे उरलेले अन्न उपाशी व्यक्तींच्या मुखात गेले तर चांगलेच होईल, असा विचार करून डबेवाल्यांच्या संघटनेने ही ‘रोटी बँक’ सुरू केली आहे. त्यांचे ४०० प्रतिनिधी त्यासाठी काम करीत आहेत. आपण त्या संघटनेच्या पुढे दिलेल्या प्रतिनिधींशी संपर्क साधायचा. त्यांचे प्रतिनिधी येऊन उरलेले, पण अर्थातच चांगल्या स्थितीतील अन्न घेऊन जातात. सुभाष तळेकर – दादर ते कुलाबा – ९८६७२२१३१०, कैलास शिंदे – दादर ते वाळकेश्वर – ८४२४९९६८०३, दशरथ केदारी – दादर ते दहिसर – ८६५२७६०५४२, ज्ञानेश्वर कणसे – सायन ते मुलुंड – ८४२४०८६९३५.

 

शुभांगी पुणतांबेकर

puntambekar.shubhangi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2016 1:06 am

Web Title: society helpful institution
Next Stories
1 समाजोपयोगी
2 समाजोपयोगी
3 उपचारांसाठी…
Just Now!
X