News Flash

डेंड्रोबियम ऑर्किड

ऑर्किड या वनस्पतीचे दोन प्रकार असतात.

ऑर्किड या वनस्पतीचे दोन प्रकार असतात. एका प्रकारातील ऑर्किड हे निसर्गात जमिनीत वाढणारे असतात तर दुसऱ्या प्रकारचे ऑर्किड वृक्षांच्या बुंध्यांचा आधार घेऊन तेथेच वास्तव्य करत असतात. जमिनीत वाढणाऱ्या ऑर्किडना ‘ळी११ी२३१्रं’’ म्हणतात, तर वृक्षांच्या आधाराने वाढणाऱ्या ऑर्किडना ‘एस्र््रस्र्ँ८३्रू’ ऑíकड म्हणतात. या दोन्ही प्रकारांमधील, वृक्षांच्या आधाराने वाढणाऱ्या ऑर्किड, डेंड्रोबियमची फुले जास्त आकर्षक असतात. ती जमिनीत वाढणाऱ्या ऑर्किडपेक्षा जास्त कणखरही असतात. अनेक दिवस पाणी मिळाले नाही तरीही त्यांचे फार नुकसान होत नाही.
वृक्षांच्या आधाराने वाढणाऱ्या ऑऑर्किडडमध्ये हमखास फुलणारी जात म्हणजे ‘डेंड्रोबियम.’ आजकाल डेंड्रोबियमच्या फुलांना खूप मागणी असते, याचे कारण म्हणजे त्यांचा टिकाऊपणा. ही फुले लांब दांडय़ावर लगडलेली असतात. ती दांडय़ासकट कापून फुलदाणीत ठेवली तरीही साधारणपणे १० ते १५ दिवस टिकतात. न कापता ती ऑíकडच्या झाडावरच राहिली तर ती ३० दिवसपर्यंत टिकून राहतात. त्यांच्या या गुणधर्मामुळे डेंड्रोबियमच्या झाडांनाही खूप मागणी असते. या वनस्पतीची वाढ सावकाश होत असल्याने व त्यांची अभिवृद्धीही थोडी वेळखाऊ असल्याने त्यांच्या किमती जरा जास्तच असतात. फुलावर आलेल्या डेंड्रोबियमची किंमत साधारणपणे २५० ते ३०० रुपयांपर्यंत असते.
निसर्गात यांच्या काही जाती दुसऱ्या वृक्षांच्या आधाराने वाढत असल्या तरीही, हल्ली त्यांच्या नर्सरीत उपलब्ध असणाऱ्या बहुतांश जाती संकरित (हायब्रीड) असल्याने त्या कुंडय़ातच लावलेल्या असतात. डेंड्रोबियम ऑर्किडची मुळे मांसल असतात; त्यांना तंतूमुळे नसतात. या मुळांची दोन काय्रे असतात. एक म्हणजे आधाराला जखडून ठेवणे आणि दुसरे म्हणजे हवेतील आद्र्रता शोषून घेणे. त्या मुळांना कसलाही कोंदटपणा सोसवत नाही. त्यामुळे जर डेंड्रोबियमची रोपे मातीत लावली तर ती जास्त दिवस जगत नाहीत. डेंड्रोबियम ऑíकड कुंडीत लावण्यासाठी फक्त विटांचे व लोणारी कोळशाच्या तुकडे यांचाच वापर करावा. हे ऑíकड नारळाच्या सोढणांवर किंवा लाकडाच्या ओंडक्यावरही वाढवता येतात. हल्ली बऱ्याच नर्सरींतून ही ऑíकड कोकोपीट (सोढणाचा भुसा) या माध्यमात लावलेली मिळतात. कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूपच असते; त्यामध्ये हवाही खेळती राहात नाही. म्हणून असली रोपे खरेदी करताना काळजी घ्यावी. वर वर रोप तंदुरुस्त दिसते; त्यावर फुले असली तर तीही टवटवीत दिसतात, तरीही कोकोपीटमधील मुळे संपूर्णपणे कुजलेली असू शकतात. त्यामुळे ती रोपे तशीच कोकोपीटमध्ये राहिली तर ते रोप मरण्याची शक्यताच जास्त असते. कुंडीत लावलेल्या रोपाला कुंडीतील कोकोपीटच्या पृष्ठभागावर जर सफेद, हिरव्या टोकाची आणि न सुरकुतलेल्या मुळांची जोमदार वाढ दिसत असेल तरच ती झाडे खरेदी करावीत.
डेंड्रोबियमच्या एका जोमदार फांदीवर एकामागून एक अशा साधारण ५ ते ६ फुलांच्या दांडय़ा येऊ शकतात. एकदा सर्व दांडय़ा येऊन गेल्या की त्या फांदीची सर्व पाने झडून जातात. अशी फांदी त्या झाडावरच राहिली तर ते काही फायद्याचे नसते. म्हणून सर्व फुले येऊन गेलेल्या फांद्या कापून जर विटांच्या, कोळशाच्या ओलसर तुकडय़ांवर ठेवून दिल्यास त्यापासून आपल्यास नवी रोपे मिळतात.
नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 1:22 am

Web Title: dendrobium orchid
टॅग : Hirvai
Next Stories
1 कुमुदिनी
2 सुरण
3 अग्निशिखा
Just Now!
X