आपण घराची सजावट करतो ती घर सुंदर दिसावं, त्या सजावटीने आपल्या मनाला समाधान वाटावं यासाठी. म्हणूनच या सजावटीत समतोल असायला हवा. तो साधलेला नसेल तर घरात आनंददायक, आल्हाददायक वातावरण निर्माण होणार नाही.
बिरबलाच्या गोष्टीमधील भाकरी का करपली, घोडा का अडला, पाने का कुजली या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर होते ‘‘न फिरवल्यामुळे’’ त्याच धर्तीवर जर कोणी विचारले की, माणूस उदास का झाला, मूल चिडचिडे का झाले, बाबांची पाठदुखी का सुरू झाली, तर एकच उत्तर बहुतांशवेळा द्यावे लागेल ते म्हणजे ‘‘दोषपूर्ण गृहसजावटीमुळे’’. वैद्यकीय आणि शिक्षकी पेशासारखी गृहसजावट ही प्राथमिक गरज जरी नसली तरी आपल्या रोजच्या जगण्यात याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. कारण म्हणजे सजावट ही फक्त सुंदर दिसण्यासाठी नसून तिचा मूळ उद्देश कार्यक्षमता वाढवणे, मानसिक शांतता देणे आणि आजूबाजूच्या वातावरणात चतन्य आणणे हा आहे. या तीनही गोष्टी आपण साधू शकतो, जर का सजावटीत समतोल आणला तर. समतोल आणण्यासाठी आकार आणि पोत ह्यचा कसा वापर करावा हे आपण मागच्या लेखात बघितले. ह्य लेखात आकृत्या, रंग, पेंटिंग्जची मांडणी ह्यचा विचार करू.
आमच्या बिल्डिंगमधला आठ वर्षांचा पार्थ अतिशय चंचल, सतत अस्वस्थ, अभ्यासात लक्ष नसलेला असा मुलगा. घरात त्याच्यामुळे सतत आरडाओरडा आणि चिडचिडे वातावरण. प्रेमानं समजावून झाले, ओरडून झाले, कौन्सिलर झाले. कशाचा उपयोग नाही. एक दिवस काही कारणाने त्यांच्याकडे गेले आणि पार्थची खोली बघून थक्क झाले. कपाटावर एबीसीडीचा लॅमिनेट, खिडकीला चौकोन-त्रिकोणाचे पडदे, एका कोपऱ्यात ‘लायन किंग’च्या प्राण्यांचा वॉलपेपर आणि सगळ्या मुलांना आवडतो(?) म्हणून िभतीला लाल रंग! त्या मधेच त्याचा बंकबेड आणि अभ्यासाचे टेबलसुद्धा. ना चालायला जागा, ना धड मन एकाग्र होईल असे वातावरण. अशावेळी ते मूल चिडचिडे न झाले तरच नवल! काय चुकीचे होते ह्य सजावटीत? पसा तर भरपूर खर्च केलेला दिसत होता. अभाव होता तो समतोलाचा. जसे आपण बघितले की पोत (टेक्स्चर) सजावटीला जडपणा देतो आणि त्यामुळे त्याचा संयमित वापर गरजेचा आहे, तसाच जडपणा एखाद्या कापडावरील आकृत्यांनीपण (डिझाइन) येतो. जेवढय़ा आकृत्या जास्त तेवढे त्याचे डोळ्याला भासणारे वजन जास्त. आकृत्यांमध्येसुद्धा भूमितीचा जास्त प्रमाणातील वापर डोळ्यांना त्रासदायक वाटू शकतो. दुसरी गोष्ट, एखाद्या लिखित गोष्टीकडेसुद्धा (टेक्स्ट) आपली नजर चटकन आकर्षति होते. पार्थच्या खोलीत, या दोन्ही डोळ्याला जड भासणाऱ्या गोष्टी अगदी सढळ हाताने वापरल्या होत्या. जसे मागच्या लेखात म्हटले की या लक्ष आकर्षति करणाऱ्या गोष्टी सजावटीत जरूर असाव्यात पण चमचाभर लोणच्या एवढय़ाच. इथे तर वाटीभर लोणचे घेतले होते. अजीर्ण होणारच. अशावेळी संतुलन साधण्यासाठी काय करावे तर दोन जड गोष्टी एकत्र येणार नाहीत ह्यची पूर्ण काळजी घ्यावी. उदाहरणार्थ, खडबडीत पोत असलेल्या िभतीवर गिचमिडे डिझाईन असलेले पडदे टाळावेत- तिथे डिझाइन नसलेले साधे पडदे जास्त खुलून दिसतील. तसेच अक्षरे असलेला वॉलपेपर किंवा भूमितीचे डिझाईन असलेले पडदे यापकी एकाचीच निवड करावी, नाहीतर संपूर्ण सजावट अस्थिर भासेल.
पोत, डिझाइन याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगाचा अचूक वापर. कुठल्याही सजावटीत रंगाने व्यापलेली जागा ही सर्वात जास्त असते. रंगामध्ये लाल रंग सगळ्यात आक्रमक आणि त्याचे डोळ्याला भासणारे वजन पण सर्वात जास्त. तर पिवळ्या रंगाचे वजन सर्वात कमी. निळ्या-हिरव्या रंगाचे वजन अधले-मधले. त्याचप्रमाणे जो रंग गडद, त्याच्याकडेपण आपले लक्ष चटकन आकर्षति होते. अशा वेळी लाल किंवा गडद रंगाला बॅलन्स करायला शक्यतो आजूबाजूचे रंग सौम्य असावेत. त्यामुळे अगदी १० टक्के लाल किंवा गडद रंग वापरून बाकी ९० टक्के सौम्य रंग दिल्यास पाहिजे तो परिणाम साधता येतो. पार्थच्या खोलीमध्ये भूमितीच्या आकृत्यांचे पडदे, इंग्रजी मुळाक्षरे असलेला लॅमिनेट व िभतीवरील लाल रंग.. या तीनही जड भासणाऱ्या गोष्टी एकत्रितपणे वापरल्याने खोलीचे संतुलन बिघडले. या गोष्टींत वाईट काहीच नाहीये. पण त्यांचे व्हिज्युअल वेट (५्र२४ं’ ६ी्रॠँ३) खूप जास्त आहे. अशावेळी या तीनपकी एकच गोष्ट केली असती आणि तीसुद्धा प्रमाणात, तर खोलीचे रूपच पालटून गेले असते. रंगामध्येसुद्धा लालऐवजी निळ्या/हिरव्या रंगाच्या छटा वापरल्या असत्या, तर एकाग्रतेसाठी त्याचा उपयोग झाला असता. खोलीत एक प्रकारचा स्थिरपणा आला असता. रंग आणि त्याचा माणसाच्या मनावर व शरीरावर होणारा परिणाम आपण पुढील काही लेखात बघणारच आहोत.
गर्दीत किंवा रस्त्यावर एखाद्या चेहऱ्याकडे माना वळवळून बघताना किती लोकं धडपडतात? आपला मेंदू आणि चेहरा यांचा एक अजब संबंध आहे. खरा जाऊ देत, चित्रातल्या चेहऱ्याकडेसुद्धा आपण आपोआप खेचले जातो. एखाद्या खोलीत जर चेहऱ्याचे पेंटिंग लावले असेल तर त्याचे व्हिज्युअल वेट (५्र२४ं’ ६ी्रॠँ३) आजूबाजूच्या कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त होते. अशावेळी ज्या िभतीवर चेहऱ्याचे पेंटिंग आहे त्याच्या आजूबाजूची िभत रिकामी ठेवणेच श्रेयस्कर. त्यातही चेहऱ्यापेक्षा एखाद्याची नजर आपल्याला खिळवून ठेवते. गंमत म्हणजे चित्रातल्या डोळ्यांची नजर ज्या दिशेला असते, आपली नजर पण त्या दिशेला वळते, ते डोळे काय बघत आहेत या उत्सुकतेपोटी! प्रत्येक चित्राची एक खासियत असते. पेंटिंग्ज/ चित्रांची मांडणी करणे ही पण एक कला आहे. एकाच थीममधील चित्रे एका िभतीवर किंवा खोलीत चालू शकतात. पण वेगवेगळ्या कलाकारांची कितीही ओरिजिनल पेंटिंग्ज तुमच्याकडे असूदेत, सगळी एकाच खोलीत लावण्याचा अट्टहास टाळा. त्यांची खोलीनुसार विभागणी करा. नाहीतर मोनालिसाच्या बाजूला एम एफ हुसेनचा घोडा आणि त्याच्या बाजूला एस एच रझा ह्यंचा िबदू. कोणाचाच कोणाशी संबंध नाही, सगळे मास्टर पिसेस पण परिणाम शून्य.
पेंटिंग्ज कशी लावावीत हेसुद्धा विचारात घेणे आवश्यक आहे. आपली डोळ्याची पातळी साधारण ५’ वर असते. त्या उंचीवर असलेली चित्रे किंवा पेंटिंग्ज जास्त सुसह्य़ वाटतात. त्यापेक्षा उंचावर लावल्यास सजावटीला जडपणा येतो आणि दुसरे म्हणजे मान उंच करून चित्र बघावे लागते, जे त्रासदायक ठरते. त्यामुळे तुम्हाला भरपूर पेंटिंग्ज लावायची हौस असेल तर त्यांच्या सुसंगतीबरोबरच उंची विचारात घेणेपण अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर पूर्ण सजावटच फसेल.
असे म्हणतात की चांगला वक्ता तो असतो, ज्याला काय बोलावे याबरोबरच कधी थांबावे हेही कळते. हीच गोष्ट सजावटीलापण लागू होते. सध्या मार्केटमध्ये खिशाला परवडणारे सजावटीचे हजारो प्रकार भुरळ घालत आहेत. पण म्हणून सगळ्याच गोष्टी आपल्या घरात असाव्यात याचा अट्टहास सोडावा. कुठलीही गोष्ट थोडक्यात असेल तरच मजा येते. सजावटीत आपण आपल्यावर हे बंधन घातल्यास सजावट उत्कृष्ट दिसेल.
तर अशी ही सजावट. वाटते तितकी सोपी नाही आणि नुसती ग्लॅमरस तर नाहीच नाही. संसाराप्रमाणेच याचीपण बरीच व्यवधाने सांभाळावी लागतात. जसे आई रागावली तर बाबा लाड पुरवतो, बायको रुसली तर नवरा समजूत काढतो, एक दुखी झाला तर दुसरा फुंकर घालतो.. हा समतोल साधला तरच संसार परिपूर्ण होतो – अगदी आपल्या सजावटीसारखा!!
response.lokprabha@expressindia.com

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके
Interpol
विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…