छोटय़ाशा खोलीमध्ये प्रचंड मोठ्ठा टीव्ही किंवा लांबरुंद हॉलच्या भिंतीवर एक छोटुकलं पेंटिंग पाहिलं की आपल्याला काहीतरी खटकतंय असं वाटायला लागतं. पण नेमकं काय ते मात्र सांगता येत नाही.

प्रमाणात आहार घेणे, प्रमाणात बोलणे, एवढेच काय प्रेमदेखील प्रमाणात असणे चांगले. नाही तर प्रेमाचेसुद्धा ओझे वाटायला लागते. स्वित्र्झलडच्या निसर्गसौंदर्याने हरखून न गेलेला माणूस विरळाच. पण बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे की, प्रमाणाबाहेरचे ते सौंदर्य चार दिवसांनी जाणवेनासे होते. थोडक्यात, बऱ्याच गोष्टींबद्दल आपण मनात एक मापदंड ठरवतो. त्यानुसार गोष्टी झाल्यास, ‘प्रमाणात’ झाल्याचा आनंद मिळतो.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
how to make kala masala at home recipe
Recipe : आजीबाईंनी दिलेल्या प्रमाणाने घरच्याघरी बनवा ‘गोडा मसाला! लिहून घ्या हे प्रमाण
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

समतोल, सुसंगती, लय आणून सजावट कशी खुलवायची हे आपण आधीच्या लेखांत बघितले. पण सजावटीचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व प्रपोर्शन किंवा प्रमाणबद्धतेचा आभाव असेल तर या सगळ्या गोष्टी फोल ठरतील. ते टाळण्यासाठी आधी प्रमाणबद्धता  म्हणजे काय ते बघू.

प्रमाणबद्धता ही दोन प्रकारची असते. एक, ती आपण संख्येसारखी वापरतो व दुसऱ्या प्रकारात गुणोत्तर किंवा रेशोच्या रूपात वापरतो. एखादे वेळेस भाजी खारट झाली तर आपण म्हणतो ‘मिठाचे प्रमाण जास्त झाले.’  यामध्ये आपण ‘प्रमाण’ संख्येसारखे वापरतो. पण पाककलेच्या पुस्तकात भाजी करण्यासाठी दिलेले असते, अर्धा किलो बटाटय़ाला एक चमचा मोहरी, एक  चमचा जिरे, तीन चमचे तिखट वगरे वगरे. यामध्ये ‘प्रमाण’ आपण गुणोत्तराप्रमाणे वापरतो. अर्धा किलो, एक चमचा, तीन चमचे.. जेवढा हा एकमेकांशी असलेला रेशो अचूक तेवढी ती भाजी चवीला रुचकर लागते. यामध्ये सांघिक काम असते. भाजी एकच पण त्यातल्या वेगवेगळ्या साहित्याचे एकमेकांशी असलेले प्रमाण महत्त्वाचे. सजावटीमध्येसुद्धा एखाद्या गोष्टीचे स्वत:च्या विविध भागांशी असलेले प्रमाण व आजूबाजूच्या अवकाशाशी (space) असलेले प्रमाण लक्षात घेणे गरजेचे असते.

बऱ्याच घरांत सामानाची खूप रेलचेल असते. प्रमाणाबाहेरच्या (संख्यात्मक) या वस्तूंमुळे गरगरायला लागते. एका कशावर तरी मन केंद्रित करणे जड जाते. ज्याची परिणती सजावट जड व बोिरग वाटण्यात होते. सजावट करताना म्यूझियमसारखी प्रत्येक गोष्ट घरात मांडून ठेवायची गरज नसते. सजावटीचे तंत्र सोपे करण्यासाठी एखाद्या थीम किंवा विशिष्ट संकल्पनेला पकडून रचना केल्यास आजूबाजूची जागा नेहमी चांगली दिसते. जशी आधुनिक, ग्रामीण (rustic), भारतीय किंवा विविध ऋतूंवर आधारित संकल्पना!  हे केल्याने होते काय की फक्त चांगले दिसते म्हणून भरमसाट गोष्टींचा भरणा होत नाही. संकल्पनेला अनुरूप अशाच गोष्टी घेतल्या जातात. अशा वेळी खरेदी करताना आपले मन विचलित होत नाही. त्यामुळे खूप आवडलेला व्हिक्टोरियन सोफा आपल्या भारतीय संकल्पनेत बसणार नाही म्हणून टाळला जातो व सजावटीतील सुसंगती टिकून राहते.

काही महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञांनी केलेली कामे बघायचा योग आला. ज्या माणसासाठी ही कामे केली होती तीदेखील समाजातील प्रसिद्ध व श्रीमंत व्यक्ती! सजावटीमध्ये वापरला गेलेला माल, फिनििशग, लहानातले लहान तपशील सगळेच उत्कृष्ट व अचंबित करणारे. पण जगभरातल्या जुन्या-नव्या स्टाइल्समधील एवढय़ा साऱ्या गोष्टींची सरमिसळ होती की ‘काय करू नये’ याची शिकवण मिळाली.

‘लेस इज मोअर किंवा कमीत कमी सामान (minimalistic) हे तर आजच्या सजावटीचे परवलीचे शब्द. जितके हे तंत्र आपल्याला सजावटीत वापरता येईल तेवढी सजावट चांगली दिसणार हे नक्की!

तर हे झाले ‘प्रमाण’ हे संख्या म्हणून वापरले जाते त्याबद्दल. दुसरा प्रकार तुमच्या लक्षात येईल जर कधी तुम्ही घर बदलले असेल तर. आधीच्या घरात एकदम व्यवस्थित दिसणारे एखादे फíनचर नवीन घरात एकदम अंगावर आल्यासारखे दिसते. किंवा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे एखादे पेंटिंग नवीन घरात दुर्लक्षित होते. असे का? तर त्या फíनचरचे किंवा त्या पेंटिंगचे आजूबाजूच्या अवकाशाशी (space) असलेले प्रमाण /गुणोत्तर. पहिल्या मोठय़ा जागेत, त्यानुसार बनवलेले फíनचर खोलीशी प्रमाणबद्धच दिसेल. पण तेच छोटय़ा जागेत हे फíनचर बोजड वाटेल. दरवाजाच्या समोरच्या चार फुटी िभतीवरील पेंटिंग, १० फुटी िभतीवर लावल्यास, ते हरवलेल्या कोकरासारखेच दिसेल. अशा वेळी खोलीच्या लांबी-रुंदीला अनुरूप असे फíनचर घेणे जास्त श्रेयस्कर. फíनचरचे आजूबाजूच्या खोलीशी/ अवकाशाशी असलेले नाते समजून घेणे फार महत्त्वाचे.

मोठ्ठे टीव्ही स्वस्तात मिळू लागल्यावर असा टीव्ही स्वत:कडे असणे हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. आपल्या दिवाणखान्याची लांबी-रुंदी लक्षात न घेता तो िभतीवर लटकवला जातो. अशा वेळी टीव्ही पाहताना किमान नऊ फुटांचे अंतर पाहिजे, या गोष्टीचा सोयीस्कर विसर पडतोच पण त्या छोटय़ा जागेत तो टीव्ही  ‘अंगापेक्षा बोंगा मोठ्ठा’ असा दिसतो. अशाने पूर्ण सजावटच फसते.

वस्तूंच्या जागेशी असलेल्या प्रमाणबद्धतेबरोबरच तिच्या स्वत:मधील, वेगवेगळ्या भागांशी असलेली प्रमाणबद्धता (गुणोत्तर- रेशो) अचूक असणे, हेसुद्धा ती गोष्ट चांगली दिसण्यास कारणीभूत ठरते. नाही तर लांबी आहे, पण रुंदी नाही, उंची आहे, पण खोली नाही अशी  अवस्था सजावटीच्या नाशास कारणीभूत ठरते.

आदर्श गुणोत्तराचा नमुना म्हणजे आपले शरीर! आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये सारखेच असते.  उदाहरणार्थ माझी सहा महिन्यांची भाची, मी आणि अमिताभ बच्चन.. तिघांचे आकारमान वेगळे, पण तिघेही आपापल्या जागी प्रमाणबद्ध आहोत. आमच्या तिघांची उंची डोक्याच्या सातपटच आहे. हाताचे पंजाशी, पंजाचे बोटांशी असलेले गुणोत्तर माझे व अमिताभचे सेमच आहे (येस्स!!!). शेवटी सजावट ही कोणासाठी असते तर माणसांसाठी. इथे आपल्या शरीराचा रेशो तुमच्या वास्तुरचनेत, फíनचरमध्ये उतरला नाही तर उपयोग काय? लोकांना वाटते रुंदीला जास्त असणारा सोफा जास्त आरामदायी होईल. पण तसे नसते. भारतीयांची सरासरी उंची लक्षात घेऊन खुच्र्या व सोफ्यांची रुंदी ठेवली तर पाय हवेत तरंगणार नाहीत व ९० टक्केभारतीय जनतेच्या पायांना मुंग्या येणार नाहीत. प्रत्येक देशातील लोकांच्या शारीरिक ठेवणीनुसार तेथील वास्तुरचना व फíनचर केले जाते. लहानखुऱ्या जपानी लोकांचे पलंग धिप्पाड जर्मन लोकांना कसे पुरणार? अशा वेळी प्रत्येक देशातील लोकांच्या शारीरिक ठेवणीनुसार तेथील फíनचरची, ओटय़ाची मापे थोडीफार बदलतात.

हे झाले प्रमाणबद्ध रचनेबद्दल. पण चांगली प्रमाणबद्ध रचना केव्हा म्हणतात? त्यासाठे थोडे मागे म्हणजे बाराव्या शतकात जावे लागेल. त्या काळी युरोपमध्ये लेओनाडरे फिबोनाची (Fibonacci) म्हणून गणितज्ञ होऊन गेला. त्याने केलेल्या संशोधनानुसार निसर्गातील बहुतांश गोष्टींच्या निर्मितीमध्ये नियमित असा एक क्रम दिसून आला. थोडे खोलात शिरल्यावर हा क्रम फुलांच्या पाकळ्यांमध्ये, कोबीच्या पानांमध्ये, झाडाच्या फांद्यांमध्ये एवढेच नाही तर आपल्या शरीरात, चेहऱ्यातपण आढळून आला. या रचनेमध्ये वेगवेगळ्या भागांच्या मोजमापांचे एकमेकांशी असलेले गुणोत्तर बहुतेक वेळा १.६१ येत असे. हेच गुणोत्तर पुढे ‘गोल्डन रेशो’ म्हणून प्रसिद्ध झाले, जे ग्रीक-रोमन वास्तूंमध्ये प्रकर्षांने वापरले गेले. हे गुणोत्तर निसर्गात बहुसंख्य वेळा दिसून येत असल्याने आपला मेंदू, आपली नजर साहजिकच या गुणोत्तराला आदर्श मानते. सजावटीमध्ये ही प्रमाणबद्धता आणण्यासाठी याचा वापर कसा करू शकतो? तर कपाट, पलंग यांच्या लांबी-रुंदीच्या गुणोत्तरामध्ये, िभतीची लांबी व त्यावर लावलेल्या पेंटिंग्जच्या गुणोत्तरामध्ये, फुलदाणीमधील फुलांच्या मांडणीतपण करू शकतो (म्हणजे पाच लाल गुलाब तर तीन पिवळे गुलाब, आठ ग्लॅडिओला तर पाच लिलीची फुले वगरे. यामध्ये संख्यांचे गुणोत्तर महत्त्वाचे. पाच-चार किंवा आठ-सहा पेक्षा वरील रचना जास्त संतुलित वाटते.)

याचा अर्थ असा आहे का की एखाद्या रचनेचे गुणोत्तर १.६१ नसेल तर ती रचना /कला चुकीची आहे? असे नाही. नाही तर अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ससारखी कला किंवा प्रख्यात चित्रकार पिकासोची चित्रे लोकांनी डोक्यावर घेतलीच नसती. पण आपण काही पिकासो नाही की सगळे नियम धुडकावूनदेखील समतोल साधू शकू. कधी कधी काही केल्या सजावट मनासारखी होत नाही. काही तरी चुकल्यासारखे वाटते. कधी ती खूप रिकामी, तर कधी खूप भरगच्च वाटते. अशा वेळी हे गुणोत्तर आपल्या कामी येते. याच्या जवळपास येणारी रचना केल्यास सजावटीत बराच फरक पडू शकतो.

वरील गोष्टींची थोडी काळजी घेतल्यास हातात चांगल्या सजावटीचे ‘प्रमाणपत्र’ मिळेल हे बाकी नक्की!!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com