04 December 2020

News Flash

कोहलीला स्पष्टीकरण देण्याची नोटीस

आयपीएल सामन्यादरम्यान अभिनेत्री प्रेयसी अनुष्का शर्माशी संवाद साधल्याप्रकरणी विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

| May 21, 2015 06:09 am

आयपीएल सामन्यादरम्यान अभिनेत्री प्रेयसी अनुष्का शर्माशी संवाद साधल्याप्रकरणी विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याप्रकरणी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, ‘‘कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो. कोहलीने खेळाच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, याबाबत चौकशी सुरू आहे.’’
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली  डेअरडेव्हिल्सविरुद्धचा सामना पावसामुळे थांबला असताना कोहलीने अतिविशेष प्रेक्षागृहात जाऊन अनुष्काची भेट घेतली होती. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीने कोहलीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. कोहलीकडून उत्तर आल्यावर आम्ही निर्णय घेऊ. खेळाचे नियम जे सांगतात, त्यानुसार चौकशी होईल. खेळापेक्षा कोणीही मोठा नसतो.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2015 6:09 am

Web Title: all rules followed in virat anushka ipl controversy bcci secretary
टॅग Ipl,Ipl 8
Next Stories
1 ‘कोहलीसाठी कठोर प्रशिक्षकाची गरज’
2 डी’व्हिलियर्सकडून सामनावीराचा पुरस्कार मनदीप सिंगला भेट
3 मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत
Just Now!
X