स्पॉटफिक्सिंग प्रकरणात संशयित म्हणून पकडण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाच्या एस. श्रीशांत, अजित चंडेला व अंकित चव्हाण यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे व त्यांच्याबरोबर केलेला करार रद्द करण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्सचे अध्यक्ष रणजित बर्थाकूर यांनी जाहीर केले. ते म्हणाले, आम्ही या तीनही खेळाडूंविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार नोंदविली आहे.
दरम्यान आम्ही आगामी सामन्याकरिता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्ल्यानुसार सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणार आहोत. तसेच आम्ही दिल्ली, जयपूर व मुंबई येथील पोलिसांबरोबर सतत या प्रकरणी पाठपुरावा करीत आहोत. वेळोवेळी पोलिसांना जी माहिती लागणार आहे, ती माहिती आम्ही तत्परतेने दिली आहे आणि यापुढेही देणार आहोत.