19 September 2020

News Flash

स्टोक्स संपूर्ण ‘आयपीएल’ला मुकणार?

स्टोक्सचे वडील जेरार्ड यांना मेंदूचा कर्करोग झाला असल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

इंग्लंडचा प्रतिभावान अष्टपैलू बेन स्टोक्स इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी १३व्या हंगामाला पूर्णपणे मुकण्याची शक्यता आहे. स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती अद्यापही स्थिर नसल्यामुळे त्याच्या संयुक्त अरब अमिरातीतील आगमनाविषयी अद्यापही संभ्रम कायम आहे, अशी प्रतिक्रिया राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक अँड्रय़ू मॅक्डोनाल्ड यांनी व्यक्त केली.

२९ वर्षीय स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध ऑगस्टमध्ये झालेल्या कसोटी मालिकेतून मध्यातूनच माघार घेत न्यूझीलंडला रवाना होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेलाही त्याला मुकावे लागले. स्टोक्सचे वडील जेरार्ड यांना मेंदूचा कर्करोग झाला असल्याचे गेल्या वर्षी उघडकीस आले होते.

‘‘स्टोक्सच्या वडिलांची तब्येत अधिक बिघडल्याचे मला गेल्या आठवडय़ात कळले. परंतु सध्या स्टोक्स कुठे आहे किंवा त्याच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे की नाही, याविषयी मला खात्रीने सांगता येणार नाही. त्याच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची आम्हाला जाणीव असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याला पुरेसा वेळ देण्याचे ठरवले आहे,’’ असे मॅक्डोनाल्ड म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:21 am

Web Title: ben stokes miss the upcoming 13th season of the ipl abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : यंदा एकही सामना गमवायचा नाहीये ! दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचं स्वप्न
2 IPL : भारतीय प्रशिक्षकांना अधिक संधी देण्याची वेळ आलेली आहे – दिलीप वेंगसरकर
3 IPL 2020 : बेन स्टोक्सच्या खेळण्याबाबत अद्याप नेमकी माहिती नाही – मुख्य प्रशिक्षक अँड्रू मॅक्डोनाल्ड
Just Now!
X