10 April 2020

News Flash

अव्वल स्थानासाठी शर्यत!

आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ रविवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

| May 10, 2015 02:29 am

आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ रविवारी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. सध्याच्या घडीला दोन्ही संघांचे समान १४ गुण असून चेन्नई अव्वल स्थानावर आहे, त्यामुळे त्यांनी हा सामना जिंकला तर त्यांचे अव्वल स्थान अबाधित राहू शकते. राजस्थानने हा सामना जिंकला तर त्यांना अव्वल स्थानावर पोहोचता येणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा असेल.
गेल्या सामन्यामध्ये चेन्नईला मुंबईकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात चेन्नईच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने डाव सावरला होता. पवन नेगीने धडाकेबाज फलंदाजी करत संघाला १५८ धावा करून दिल्या असल्या तरी त्याच्या १९व्या षटकात तब्बल ४ षटकार खेचत मुंबईने विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नईला या सामन्यासाठी संघाला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आशिष नेहरा आणि ड्वेन ब्राव्हो यांनी आतापर्यंत सातत्यपूर्ण भेदक मारा केला आहे.
राजस्थानने १२ सामन्यांमध्ये सहा विजय मिळवले आहेत. यामधील दोन सामने रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात १४ गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. हा सामना जिंकल्यास त्यांना अव्वल स्थान पुन्हा एकदा पटकावता येणार आहे. अजिंक्य रहाणे चांगल्या फॉर्मात असून तो त्यांच्या फलंदाजीचा कणा आहे. स्टीव्हन स्मिथ आणि जेम्स फॉकनर यांनी गेल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांच्याकडून मोठय़ा कामगिरीची अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये मात्र राजस्थानला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2015 2:29 am

Web Title: csk vs rr 3
टॅग Ipl,Ipl 8
Next Stories
1 मुंबईकडून पराभवाची परतफेड
2 आव्हान टिकवण्यासाठी दिल्ली-हैदराबादमध्ये चढाओढ
3 ईडन गार्डन्सवरील अखेरच्या लढतीसाठी कोलकाता सज्ज
Just Now!
X