21 September 2020

News Flash

दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई उत्सुक

पहिला-वहिला विजय नोंदवल्यानंतर आता दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ उत्सुक आहे. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सला कामगिरीमध्ये सातत्य राखता आलेले नाही.

| April 23, 2015 04:06 am

पहिला-वहिला विजय नोंदवल्यानंतर आता दिल्ली जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ उत्सुक आहे. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सला कामगिरीमध्ये सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे सलग दुसरा विजय नोंदवण्यासाठी मुंबईचा संघ उत्सुक असेल.
सलग चार पराभवानंतर मुंबईला अखेर पाचव्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात विजय गवसला. त्यामुळे आता एकामागून एक विजयाची मालिका सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस असेल. हरभजन सिंग हा चांगल्या फॉर्मामध्ये दिसत आहे. कर्णधार रोहित शर्माला अजूनही सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. पण किरॉन पोलार्डने आपली चमक दाखवून दिली आहे. लसिथ मलिंगासारखा वेगवान गोलंदाज संघात आहे, पण त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही.
चार अटीतटीच्या सामन्यांमध्ये दिल्लीला दोन सामने गमवावे लागले आहेत, पण गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केल्यावर त्यांचे मनोबल उंचावलेले असेल. कर्णधार जे. पी. डय़ुमिनी आणि युवराज सिंगसारखे नावाजलेले खेळाडू संघात असले तरी त्यांना अजूनही सूर गवसलेला नाही. पण श्रेयस अय्यर आणि मयांक अगरवाल हे युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.

प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स- रोहित शर्मा (कर्णधार), कोरे अँडरसन, एडन ब्लिझार्ड, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, र्मचट डि लॉन्ज, आरोन फिंच, श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, जोश हेझलवूड, सिद्धेश लाड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, अभिमन्यू मिथुन, प्रग्यान ओझा, हार्दिक पंडय़ा, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड, नितीश राणा, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स, जगदीश सुचित, पवन सुन्याल, आदित्य तरे, विनय कुमार, अक्षय वाखरे.
दिल्ली डेअरडेव्हिल्स-जेपी डय़ुमिनी (कर्णधार), युवराज सिंग, क्विंटन डि कॉक, मयांक अगरवाल, श्रीकर भरत, नॅथन कोल्टिअर नील, डॉमिनिक जोसेफ, चिदम्बरम गौतम, ट्रॅव्हिस हेड, इम्रान ताहीर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, केके जियास, झहीर खान, अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, अल्बी मॉर्केल, शाहबाद नदीम, गुरिंदर संधू, मार्कस स्टोनिअस, मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकत, जयंत यादव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:06 am

Web Title: dd vs mi
टॅग Ipl
Next Stories
1 जॉन्सन आणि अक्षर आमच्या विजयाचे शिल्पकार – सेहवाग
2 योग्य समन्वय हेच यशाचे गमक – धोनी
3 सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय
Just Now!
X