01 October 2020

News Flash

सलामीवीरांनी चांगली खेळी करणे महत्त्वाचे -पॉन्टिंग

मी आणि सचिन तेंडुलकरच्या खराब फॉर्मचा फटका मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर पडत आहे. आम्ही दोघेही सलामीवीर आम्हाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत नाही. आयपीएल चषकावर नाव

| April 19, 2013 03:38 am

मी आणि सचिन तेंडुलकरच्या खराब फॉर्मचा फटका मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर पडत आहे. आम्ही दोघेही सलामीवीर आम्हाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत नाही. आयपीएल चषकावर नाव कोरायचे असल्यास, मी आणि सचिनला चांगली कामगिरी करावी लागेल, असे मत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले.
‘‘गेल्या काही सामन्यांत केलेल्या खराब कामगिरीमुळे माझ्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आम्ही तिन्ही आघाडय़ांवर खराब खेळ केला. त्यामुळे खेळपट्टीला दोष देणे चुकीचे ठरेल. राजस्थानचे आव्हान पार करताना आम्हाला डावपेचानुसार फलंदाजी करण्यात अपयश आले. पुढील सामन्यांसाठी आम्ही फलंदाजी क्रमवारीत बदल करणार आहोत. त्यामुळे तळाच्या फलंदाजांना वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल,’’ असे संकेतही पॉन्टिंगने दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2013 3:38 am

Web Title: good start by opener is important ponting
टॅग Ipl,Sports
Next Stories
1 श्रीशांतला वगळण्यामागे ‘थप्पड’ प्रकरण नाही -द्रविड
2 रॉयल्स नंबर १!
3 पंजाबचे बल्ले-बल्ले!
Just Now!
X