05 July 2020

News Flash

कोलकातासमोर चेन्नईचे कडवे आव्हान

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आत्तापर्यंतच्या प्रवासात समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे.

| April 28, 2015 01:56 am

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आत्तापर्यंतच्या प्रवासात समाधानकारक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असणार आहे. मंगळवारी चेन्नईला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमविण्याचे लक्ष्य कोलकातासमोर असेल. कोलकाता सध्या तीन विजय, दोन पराभव आणि एक सामना रद्द झाल्यामुळे गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे, तर चेन्नईने सहा सामन्यांत केवळ एकच पराभव स्वीकारून दुसरे स्थान राखले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई संघ घरच्या मैदानावर वरचढ कामगिरी करण्यात यशस्वी झालेला आहे. त्यांनी शनिवारी एम.ए. चिदम्बरम् स्टेडियमवर झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९७ धावा राखून दणदणीत विजय साजरा केला होता. चेन्नईकडे ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅक्क्युलम, सुरेश रैना आणि धोनी हे मोठे खेळाडू आहेत, तसेच गोलंदाजीतही त्यांच्याकडे उपयुक्त पर्याय आहेत. आशिष नेहरा आणि ईश्वर पांडे यांचे सातत्य हे चेन्नईच्या विजयाचे गमक आहे. रवींद्र जडेजा झगडत असला तरी पंजाबविरुद्ध त्याने ३ विकेट्स घेत फॉर्म मिळवला आहे.
दुसरीकडे, कोलकाताला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत पावसामुळे समान गुणावर समाधान मानावे लागले होते. या लढतीपूर्वी त्यांना हैदराबाद सनरायझर्सकडून पराभव पत्करावा लागला होता. कोलकाताचे फलंदात सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत.
गोलंदाजांचीही तीच परिस्थिती असल्यामुळे कोलकाताची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. चेन्नई आणि कोलकाता आत्तापर्यंत १४वेळा समोरासमोर आले असून त्यात चेन्नईने १० विजय मिळवले आहेत.

प्रतिस्पर्धी संघ
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, आशिष नेहरा, बाबा अपराजित, ब्रेंडन मॅक् क्युलम, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, फॅ फ डू प्लेसिस, ईश्वर पांडे, मॅट हेनरी, मिथुन मन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सॅम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकेल हस्सी, राहुल शर्मा, कायले अबॉट, अंकुश बैन्स, इरफान पठाण, प्रत्युष सिंग, अ‍ॅण्ड्रू टीए, एकलव्य द्विवेदी
कोलकाता नाईट रायडर्स : गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, आंद्रे रसेल, युसूफ पठाण, सुर्यकुमार यादव, जोहान बोथा, पीयूष चावला, सुनील नरिन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, रियान टेन डोएचॅट, अझर महमूद, पॅट कमिन्स, ब्रॅड हॉग, के.सी. करिअप्पा, आदित्य गर्हवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमीत नरवाल, वीर प्रताप सिंग, वैभव रावल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2015 1:56 am

Web Title: inconsistent kolkata knight riders face stiff chennai super kings challenge
Next Stories
1 बंगळुरूचा रं‘गेल’ विजय!
2 पावसाचा खेळ..
3 आता प्रत्येक विजय मोलाचा!
Just Now!
X